बदल घडवणाऱ्या १२ गोष्टी - 12 things that make a difference

बदल घडवणाऱ्या १२ गोष्टी - 12 things that make a difference

 बदल घडवणाऱ्या १२ गोष्टी


काही गोष्टी मनाला आनंद देणाऱ्या असतात. मन प्रसन्न करणाऱ्या असतात. दुसरीकडे काही गोष्टी शरीराला ऊर्जा, उत्साह देणाऱ्या असतात. शरीराला निरोगी बनवणाऱ्या असतात. या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणजे माणसाची एकंदरित कार्यक्षमता व उत्पादकता वाढते. हे घडून येण्यासाठी अगदी छोट्या छोट्या गोष्टी करत राहिल्यामुळे कालांतराने व्यक्तिमत्त्वात आणि शकतात. जीवनात मोठे बदल घडून येतात.

१. पॉडकास्ट ऐका. शक्यतो पुस्तक वाचावे. कुठेही जाताना आपल्याबरोबरील बॅगमध्ये पुस्तक ठेवावे. पुस्तक वाचणे किंवा पॉडकास्ट ऐकणे यातून मनाची जडणघडण होत असते. मनाला पौष्टिक खाद्य मिळत असते.

२. दररोज एखाद्या अनोळखी व्यक्तीशी गप्पा मारा हे एक आत्मविश्वास बुस्टर आहे.

३. सकाळी जितके शक्य असेल तेवढे आणि रात्री कमी कमीत खा.

४. चार लाइन कविता किंवा शायरी लिहा. त्यामुळे तुमची विचारप्रक्रिया विकसित होण्यास मदत होते.

५. आपल्या पालकांना स्वतःहून कॉल करा. त्यांच्या कॉलची वाट पाहू नका. भविष्यात कल्पना करा की आपली मुले आपल्याला कॉल करीत नाहीत आणि फक्त हम्म, ठीक आहे, नाही, होय मध्ये बोलतायत!

६. नियमित व्यायाम करा. ध्यान, योगासने, चालणे, धावणे, सूर्यनमस्कार, पोहणे असे विविध प्रकारचे व्यायाम आळीपाळीने करता येऊ शकतात

७. आपल्याला याबद्दल सर्व काही माहीत असूनही आपण काही समस्या सोडवू शकत नाही, असे आपल्याला वाटत असल्यास. मनाला थोडी विश्रांती द्या. समस्येवर उपाय सापडेल.

८. आपल्या भूतकाळ भविष्याबद्दल स्वतःशी बोला. स्वतःशी बोलणे म्हणजे प्रगतीच्या दिशेने पाऊल टाकण्यासारखे असते.

९. आपल्या यशाची कल्पना करा. हे आपल्याला कारवाई करण्यास प्रवृत्त करेल.

१०. अपयशातूनच माणूस शिकत असतो. अपयश आले म्हणजे फार काही चुकीचे घडले अशा समजातून बाहेर पडा. अपयशातून आपण काय धडा घेतो हे महत्त्वाचे असते.

११. आपण सोशल मीडिया कसे आणि का वापरता याबद्दल स्वतःला प्रश्न विचारा.

१२. दिवसभराच्या कामाची यादी करा. संध्याकाळी त्यातील किती पूर्ण झाली याचा आढावा घ्या.

         प्रयत्न आणि निर्णय आपलेच असतात

    आपण नियती बदलू शकत नसलो, तरीही आपण घेतलेला निर्णय हा आपले नशीब मात्र नक्कीच बदलू शकतो. फक्त हा निर्णय आपला आहे आणि पूर्ण विचारांती आपण तो घेतलेला आहे, हे मनाशी पक्के असले पाहिजे.

    नियती हा शब्द किंवा ही संकल्पना आपल्याकडे अनेकदा वापरली जाते. कथा-कादंबरी, नाटक-चित्रपट यासह इतरही ठिकाणी हे उल्लेख असतात. त्यात बहुताश वेळा असे म्हटलेले असते की, नियती ही आपल्या नियंत्रणात नसते. साहजिकच, ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणाबाहेर असल्याने हाती आल्या नाहीत त्याबद्दल बोलताना अनेक लोक हे नियतीने साथ दिली नाही, असे म्हणतात.

अर्थात, हे सगळ्यांना मान्य होतेच असे नाही. त्यांचे म्हणणे असे असते की, नियती भलेही आपल्या बाजूला नसेल, तरीही प्रयत्न आणि निर्णय तर आपलेच असतात. म्हणूनच त्यात बिलकुल कसूर करू नये. ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही त्याचा हसतमुखाने स्वीकार करावा आणि ज्या आपण नक्की बदलू शकतो, त्याचा आग्रह धरायला हवा. निर्णय आपणच घ्यायला हवेत. त्यासाठी नियतीवर अवलंबून असू नये. निर्णय घेताना, पूर्ण सकारात्मकता आणि आपल्या क्षमताची जाणीव हवी.

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post