फारच सुंदर लेख आहे
हे ईश्वरा !!
कोणताही अर्ज केला नव्हता की, कुणाचीही शिफारस नव्हती,असे कोणतेही असामान्य कर्त्तृत्व ही नाही,
तरीही
डोक्याच्या केसांपासून पायाच्या अंगठ्या पर्यंत 24 तास देवा तु रक्त फिरवतोस...
जिभेवर नियमित अभिषेक करत आहेस.......
अखंडपणे तू माझे हे हृदय चालवतोस....
चालणारे कोणते यंत्र तू फिट करुन दिले आहेस रे देवा .....
पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत विना अडथळा संदेश वहन करणारी प्रणाली ..........
कोणत्या अदृष्य शक्तीने चालते आहे
काही समजत नाही.
हाडांमासा मध्ये तयार होणारे रक्त कोणते जगावेगळे आर्किटेक्चर आहे....
याचा मला मागमूसही नाही.
हजार हजार मेगापिक्सल वाले दोन दोन कॅमेरे अहोरात्र सगळी दृश्ये टिपत आहेत.
दहा दहा हजार टेस्ट करणारा जीभ नावाचा टेस्टर,
अगणित संवेदनांची जाणीव करुन देणारी त्वचा नावाची सेन्सर प्रणाली .....
आणि......
वेगवेगळया फ्रिक्वेंसीची आवाज निर्मिती करणारी स्वरप्रणाली
आणि
त्या फ्रिक्वेंसीचे कोडींग डीकोडींग करणारे कान नावाचे यंत्र........
पंचाहत्तर टक्के पाण्याने भरलेला शरीर... रुपी टँकर आणि हजारो छिद्रे असतानाही कुठेही लिक होत नाही....
स्टॅण्ड शिवाय मी उभा राहू शकतो. गाडीचे टायर झिजतात, पण पायांचे तळवे कधीही झिजत नाही.
अद्भुत अशी रचना आहे.
सांभाळणे, स्मृती, शक्ती , शांती हे सर्व देवा तु देतोस. तुच आत बसुन शरीर चालवत आहेस.
अद्भूत आहे हे सर्व, अविश्वसनीय,
अनाकलनीय.
अशा शरीर रुपी मशीन मध्ये कायम तुच आहे,
याची जाणीव करुन देणारा
देवा तू असा काही फिट बसविला आहे की आणखी काय तुझ्याकडे मागाव......
तुझ्या या जीवा शिवाच्या खेळाचा निखळ, निस्वार्थी आनंदाचा वाटेकरी राहीन.! .......
अशी सद्बुद्धी मला दे.!!
तूच हे सर्व सांभाळतो आहे याची जाणीव मला सदैव राहू दे.!!!
रोज क्षणोक्षणी कृतज्ञतेने तुझा ऋणी असल्याचे स्मरण, चिंतन व्हावे,
हीच तुझ्या चरणी प्रार्थना..