प्रेरणादायक १० सुविचार
या 10 गोष्टी पक्क्या
पाठ करून घ्या !
१) जेव्हा एखाद्या कामाविषयी किंवा
अभ्यास करण्याविषयी तुम्ही सबबी सांगता, ते काम किंवा अभ्यास टाळता तेव्हा तुम्ही स्वतःच्याच
जीवनाशी खेळत आहात. आणि स्वतःचाच घात करत आहात. आत्मप्रतारणा करीत आहात. आणि यश मिळवण्यापासून
स्वतःला दूर नेत आहात.
२) सगळ्यात हुश्शार आणि समझदार व्यक्ती
ती असते. जी कान आणि डोळे उघडे ठेवते. पण तोंड मात्र नेहमी बंद ठेवते.
३) जे लोक नेहमी आपल्या स्वतःच्या
छोट्या - छोट्या चुकांवरही लक्ष ठेवतात. आणि चुका सुधरविण्याचा प्रयत्न करतात. एक दिवस
त्यांची गणना बुद्धिमान लोकामध्ये होते.
४) विचार करा! जर एक लहानसे बी मोठ्या
वृक्षाला जन्म देऊ शकते. तर आपल्या मनात आलेला लहाण्यातला लहान पण चांगला विचारही किती
मोठ्या आनंदाला कारणीभूत ठरू शकतो. म्हणून नेहमी चांगला विचार करा.वा.
५) हे कलियुग आहे, या काळातले लोक
रडणाऱ्याला आणखी रडवतात आणि घाबरणाऱ्याला आणखी घाबरतात. म्हणून कुणासमोरही रडू नका.
खंबीर रहा.
६) कधीच असा विचार करू नका की तुम्ही
एकटे आहात. उलट असा विचार करा की तुम्ही एकटेच सर्व संकटांना, दुःखाना सामोरे जाण्यासाठी
पुष्कळ आहात.
७) खाणे पिणे झोपणे मुले जन्माला
घालणे हे गुण तर प्राण्यांच्याही ठिकाणी आहेत. लक्षात ठेवा आपण मनुष्य आहोत मनुष्याच्या
ठिकाणी अध्यात्मिक ज्ञान, परमेश्वराची भक्ती, परोपकार हे गुण अवश्य असले पाहिजे. जर
हे गुण नसतील तर तो मनुष्य नसून दोन पायाचा पशुच होए.
८) प्रगती ही नुसत्या बाहेरील देखाव्याने
होते नाही. प्रगतीसाठी अंतरीक चांगुलपणा आणि कोणतेही काम मनापासून करणे काम या गोष्टी
आवश्यक असतात.
९) आपले वागणे नकली नसावे. ते सहज
आणि मनापासून असावे. नकली वागणे त्याला संस्कृत मध्ये दंभ असे म्हटलेले आहे. दंभ म्ह.
आपल्या ठिकाणी ज्या गोष्टी नाहीत त्याचा देखावा करणे. माझ्या ठिकाणी खुप ज्ञान आहे
असा आव आणणे.
१०) जे लोक सत्याच्या मार्गावर चालतात
कितीही संकटं आली तरी असत्याचा आश्रय घेत नाही. त्यांना अने त्रास, हालअपेष्टा भोगाव्या
लागतात. पण परमपिता भगवान श्रीकृष्ण त्यांची नाव कधीच बडू देत नाही. शेवटी विजय त्यांचाच
होतो. जसे की पांडव.