वैद्या वदन्ति कफपित्तमरुद्विकारान् ज्योतिर्विदो ग्रहगतिं परिवर्तयन्ति - संस्कृत-सुभाषित-रसग्रहण- हिंदी-मराठी अर्थ - Sunskrit-Subhashit hindi-marathi arth

वैद्या वदन्ति कफपित्तमरुद्विकारान् ज्योतिर्विदो ग्रहगतिं परिवर्तयन्ति - संस्कृत-सुभाषित-रसग्रहण- हिंदी-मराठी अर्थ - Sunskrit-Subhashit hindi-marathi arth

 संस्कृत-सुभाषित-रसग्रहण हिंदी-मराठी अर्थ 

Sunskrit-Subhashit 

आदौ न वा प्रणयिनां प्रणयो विधेयो

दत्तोऽथवा प्रतिदिनं परिपोषणीयः।

उत्क्षिप्य यत्क्षिपति तत्प्रकरोति लज्जां

भूमौ स्थितस्य पतनाद्भयमेव नास्ति ॥

हिंदी अर्थ :- जो प्रेम को निभाने की शक्ति नही रखता, पहले तो उसने प्रियजनों के साथ प्रेम ही नही करना चाहिये। और अगर प्रेम किया तो उसका प्रतिदिन पोषण करते रहना चाहिये। अगर किसी व्यक्ति को उँचे स्थान पर स्थापित कर (अथवा प्रेमपात्र बनाकर) बाद में उसको निचे फेंक दिया, (प्रेम को छेद देते हैं।) तो वह प्रेम करने वाला और प्रेमपात्र दोनों के लिये बहुत शर्मनाक है, इसलिये भूमि पर रहने वालों को, समान स्थिती में रहने वालों को पतन का भय नही होता।

मराठी अर्थ :- ज्याच्याकडे प्रेमाला निभावण्याची शक्ती नाही, प्रथम तर त्याने प्रियजनांवर प्रेम करूच नये. आणि जर तुम्हाला प्रेम करायचेच असेल तर त्याचे दररोज पालनपोषण करत राहावे. जर एखाद्या व्यक्तीला उंचावर बसवून (किंवा प्रियकर बनवून) आणि नंतर खाली फेकले गेले, (प्रेमाला छेद दिला.) तर ते प्रेम करणारा आणि प्रेम मिळविणारा या दोघांसाठी खूप घृणास्पद आहे, म्हणून पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांना, समान स्थितींत असलेल्या लोकांना पतनाचे भय रहात नाही.

वाञ्छैव सूचयति पूर्वतरं भविष्यं पुंसां यदन्यतनुजं त्वशुभं शुभं वा ।

विज्ञायते शिशुरजातकलापचिह्नः प्रत्युद्गतैरपसरन्सरसः कलापि ॥

हिंदी अर्थ :- इन्सान की इच्छा या कामना ही उसके भूत या भविष्य को सूचित करती है। (इन्सान कैसा था और कैसा होगा वह उसके भीतर रही हुई अभिलाषा से पता चलता हैं।)। इन्सान के पूर्व (पहले) शरीर से बने हुए शुभाशुभ कर्म अथवा उसका पाप-पुण्य भी उसकी कैसी कामना है इससे पता चलता है। मोर के बच्चे को भलेही पिच्छ (पीस) का कलाप उगा ना हो, लेकिन सरोवर की ओर उडने वाले मोरों के साथ यह भी उडने लगता है, इससे यह भी कलाप को धारण करने वाला मोर बनेगा ऐसा सूचित होता है।

मराठी अर्थ :- एखाद्या व्यक्तीची कामना किंवा इच्छा ही त्याच्या भूतकाळाची किंवा भविष्याचे संकेत देत असतात. (एखादी व्यक्ती कशी होती आणि कशी असेल हे त्याच्या आतल्या अभिलाषेने प्रकट होते.) एखाद्या व्यक्तीच्या शरीराने अगोदर (पूर्वी) केलेली चांगली-वाईट कर्मे किंवा त्याचे पाप-पुण्यही त्याच्यात कोणत्या प्रकारची इच्छा आहे त्यावरून कळते. मोराच्या मुलाला भलेही पिसारा फुलला नसेल परंतु तलावाच्या दिशेने उडणाऱ्या मोरांसोबत तोही जेंव्हा उडू लागतो, तेंव्हा तो पिसारा धारण करणारा मोर बनणार असल्याचेही संकेत मिळतात.

शस्त्रैर्हतास्तु रिपवो न हता भवन्ति प्रज्ञाहताश्च नितरां सुहता भवन्ति।

शस्त्रं निहन्ति पुरुषस्य शरीरमेकं प्रज्ञा कुलं च विभवं च यशश्च हन्ति॥

हिंदी अर्थ :-  शस्त्रों से मारा गया शत्रु मारा नही जाता। (क्योंकि एक शत्रु के मरने पर उसकी जगह दुसरा उसका अन्य अनुगामी ले लेता है।) लेकिन बुद्धि से मरा हुआ (विचार परिवर्तन कराया हुआ) शत्रु ही वास्तविक रीति से मरे हुए बनते हैं। शस्त्र तो इन्सान के एक शरीर को ही मारते हैं, लेकिन मरी हुई बुद्धि तो संपूर्ण समुदाय को, उसकी सत्ता को, और उसके कीर्ति को मार डालती है।

मराठी अर्थ :- शस्त्राने मारलेला शत्रू मारला जात नाही. (कारण जेंव्हा कधी एखादा शत्रू मरतो तेव्हा त्याची जागा त्याचा दुसरा अनुयायी घेतो.) परंतु बुद्धीने मेलेले (विचार परिवर्तन झालेले) शत्रूच खरे मृत होतात. शस्त्रे एखाद्या व्यक्तीच्या केवळ एका शरीरालाच मारतात, परंतु मेलेली बुद्धिमत्ता मात्र संपूर्ण समुदाय, त्याची सत्ता आणि त्याची कीर्ती नष्ट करते.

स्थानेषु शिष्यनिवहैर्विनियुज्यमाना

विद्या गुरुं हि गुणवत्तरमातनोति।

 आदाय शुक्तिषु बलाहकविप्रकीर्णै

रत्नाकरो भवति वारिभिरम्बुराशिः॥

हिंदी अर्थ :-  शिष्य समुदाय के साथ यथायोग्य रीति से इस्तेमाल की गयी विद्या गुरु के गुणवत्ता को बढा देती है। बादलों से समुद्र के पास से लिया हुआ जल लेकर बरसात के रूप में बरसाया जाता है, तब यह बिन्दु सीप में गिरकर उसमें से निकलने वाले मोतियों की वजह से जल का सागर (समुद्र) रत्नाकर बन जाता है।

मराठी अर्थ :- शिष्य समुदायासोबत योग्य रीतीने वापरलेली विद्या गुरूची महत्ता वाढवते. ढग समुद्राकडून घेतलेले पाणी पावसाच्या रूपाने बरसवतो, नंतर शिंपल्यामध्ये पडणारा हा जलबिंदू त्यातून बाहेर पडणाऱ्या मोती मुळे पाण्याचा (समुद्र) रत्नाकर बनतो.

वार्ता च कौतुककरी विमला च विद्या

लोकोत्तरः परिमलश्च कुरङ्गनाभेः।

 तैलस्य बिन्दुरिव वारिणि दुर्निवारम्

एतत्त्रयं प्रसरति स्वयमेव भूमौ॥

हिंदी अर्थ :- प्रशंसा करने वाली वार्ता, निर्मल विद्या और हिरन के नाभी से निकलेवाली कस्तूरी की लोकोत्तर सुगंधी, यह तीन बातें तेल का बिन्दु जैसे पानी में अपने आप पसर जाता है, वैसे ही अपने आप पृथ्वी पर फैल जाती है।

मराठी अर्थ :- प्रशंसा करणारी वार्ता, निर्मल विद्या आणि हरणाच्या नाभींतून निघणारी कस्तुरीची लोकोत्तर सुगंध, ह्या तीन गोष्टी तेलाचा बिंदु पाण्यावर जसा अलगद पसरतो, तसे पृथ्वीवर आपोआप पसरतात.

अत्यन्तमन्थनकदर्थनमुत्सहन्ते

 मर्यादया नियमिताः किमु साधवोऽपि।

 लक्ष्मीसुधाकरसुधाद्युपनीय शेषे

 रत्नाकरोऽपि गरलं किमु नोज्जगार॥

हिंदी अर्थ :- अत्यंत मंथन (मथन) रुपी त्रास मर्यादा और नियम में रहने वाले साधु को भी गलत कार्य करने में प्रवृत्त कर देता है। समुद्र का मंथन करने पर लक्ष्मी, चाँद, अमृत इ. सब दिये, फिर भी उसका मंथन शुरु ही रखने पर रत्न देने वाले और रत्नों के भंडार ऐसे उस रत्नाकर ने क्या जहर नही पैदा किया?

मराठी अर्थ :- अत्यंत मंथन (खल) रुपी त्रास मर्यादा आणि नियमांत राहणाऱ्या साधुला पण चुकीच्या गोष्टी करण्यास प्रवृत्त करतात. समुद्राने मंथनाचे वेळी लक्ष्मी, चंद्र आणि अमृत इ. सर्व काही दिले, तरीही त्याचे मंथन सुरुच ठेवल्याने रत्न देणाऱ्या आणि रत्नांचे भांडार असलेल्या अशा त्या रत्नाकरानें काय विष उत्पन्न नाही केले?

अर्था हसन्त्युचितदानविहीनलुब्धं

 भूम्यो हसन्ति मम भूमिरिति ब्रुवाणम् ।

जारा हसन्ति तनयानुपलालयन्तं

 मृत्युर्हसत्यवनिपं रणरङ्गभीरुम्॥

हिंदी अर्थ :-  उचित दान न देने वाले लोभी पर उसकी सम्पत्ति हंसती है। 'यह भूमी मेरी है।' ऐसा कहने वालों पर भूमी हंसती है। जार पुरुष से हुए और खुद का मानने वाले (उस बच्चे का लाड प्यार करने वाले) पुरुष को देखकर जार स्त्री हंसती है। और रणसंग्राम में डरपोक जैसे राजा को देखकर मृत्यु हंसता है।

मराठी अर्थ :- योग्य दान न देणाऱ्या लोभी वर त्याची संपत्ती हसत असते. 'ही भूमी माझी आहे.' असे म्हणणाऱ्यावर ही भूमी हसत असते. जार पुरुषाकडून झालेल्या आणि आता स्वतःचा मानणाऱ्या (त्या मुलाचे लाड-प्रेम करणाऱ्या) पुरुषाकडे बघून ती स्त्री हसत असते आणि रणसंग्रामामध्ये डरपोक राजाला बघून मृत्यु हसत असतो.      

वैद्या वदन्ति कफपित्तमरुद्विकारान्

ज्योतिर्विदो ग्रहगतिं परिवर्तयन्ति।

भूताभिषङ्ग इति भूतविदो वदन्ति

 प्रारब्धकर्म बलवन्मुनयो वदन्ति॥

हिंदी अर्थ :- जब इन्सान कोई रोग में अटक जाता है तब, वैद्य 'कफ, पित्त या वायु का विकार है' ऐसा कहते हैं; ज्योतिषशास्त्र 'ग्रह-नक्षत्र के बदल हैं।' ऐसा कहते हैं। भूत-प्रेत निकालनेवाले बुआ 'किसी भूत का प्रभाव है' ऐसा कहते हैं। और मुनी कहते हैं कि, प्रारब्ध कर्म बलवान है।

मराठी अर्थ :- जेंव्हा व्यक्ति एखाद्या रोगांत अडकते तेंव्हा वैद्य हा 'कफ, पित्त किंवा वायु' चा विकार आहे असे सांगतात; ज्योतिषशास्त्र 'ग्रह-नक्षत्रांचा' फेरा आहे असे सांगतात, भूत-प्रेत काढणारे बुवा 'कोण्या भूतप्रेताची बाधा झाली आहे' असे सांगतात आणि मुनिजन सांगतात की, 'प्रारब्ध कर्म बलवान आहे.'

 

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post