शिक्षक दिवस - Teacher's Day Speech
शिक्षक हा समाज घडविणारा एक मुख्य दिपस्तंभ !
गुरुचा विषय आला की द्रोणाचार्यांच्या एकलव्याच्या संदर्भातील पक्षपाती व्यवहार डोळ्यापुढे उभा राहातो. एकलव्यला अंगठा मागून पक्षपाती धोरण स्विकरण्याची वृत्ती सोडली पाहिजे. आज शिष्याकडून पराभवाची अपेक्षा शिक्षकांनी ठेवली उदार मनानी ठेवली पाहिजे. हा सार्वकालिक विचार मांडताना.. एक सुभाषितकार म्हणतो.
प्रीतिर्यस्य
सदैव ज्ञानग्रहणे वृत्तिस्तु संशोधने ।
द्रोणाचार्य
कृतेश्च नानुसरणं ज्ञानप्रदाने कदा ।।
शिष्यादेव
पराजयस्य मनिषा द्रव्यस्थ ना लालसा ।
सर्वेषां
गुणमण्डितं हि सततं प्रत्यादशे शिक्षकम् ।।
अर्थात ज्ञान ग्रहणावर प्रेम करणारा, संशोधनाची वृत्ती ठेवणारा, द्रोणाचार्यंचे अनुकरण न करणारा, शिष्याकडून पराभवाची अपेक्षा बाळगणारा त्यांच्या कडून द्रव्याची अपेक्षा न ठेवणारा, असा गुणी शिक्षक हा नेहमीच समाजात पुजनीय ठरतो. अशा शिक्षकांची आजच्या काळात विशेषत्वाने आवश्यकता आहे. प्राचीन काळापासून भारतात गुरुला मानाचे स्थान आहे. तसे पाहिले तर कार्यामुळे तो या सन्मानाला पात्र आहे. त्यामुळे प्रत्येक शिक्षक आदर्श असतोच. तो निस्वार्थवृत्तीने आपणासमोर बसलेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवितो. कारण विद्यार्थी हेच शिक्षकाचे सर्वस्व असतात. आदर्श शिक्षकाच्या अंगी कोणते गुण असावेत या बाबतीत एक सुभाषित आहे.
"सद्वर्तनं च विद्वत्ताच तथाsध्यापन कौशलम् ।
शिष्यप्रियत्वमेतध्दि
गुरोर्गुणचतुष्टयम् ।।
चांगले आचरण
विद्वदत्ता शिकविण्यातील कुशलता आणि शिष्यांमधे प्रिय असणे. या चार गोष्टी
गुरुच्या गुणांचा समुदाय आहेत. हे सर्व गुण शिक्षकांच्या आंगी असावेत. या
व्यतिरिक्त इतर गुणांचा अंगीकार केला पाहिजे. सद्वर्तनी शिक्षक समाजापुढे आदर्श ठेवू शकतो.
उक्ती आणि कृती सम्य असले तरच समाज शिक्षकांचे गुण गौरव करतो. अध्यापन हा
शिक्षकाचा आत्मा असला पाहिजे. शिकविण्याच्या त्याच पध्दती ऐवजी नाविण्यापूर्ण
पद्धतीचा अवलंब केला पाहिजे. विषेशतः पाठटाचण, पाठ तयारी गृहपाठ वर्गपाठ या
सर्वबाबतीत विवधता आणली पाहीजे. या सर्व प्रयत्नातून शिक्षकाची विद्वत्ता वाढिस
लागते.
आजच्या
काळात शिक्षकांनी आत्मचितंन केले पाहिजे. नैतिकता, निस्वार्थ वृत्ती,
त्याग, सचोटी, प्रामाणिकपणा,
इ. मुल्यांची जोपासना विद्यार्थ्यांत कशी करता
येईल. याकडे जाणीव पूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे. शिक्षकाचे कर्तव्य कोणते? जबाबदारी कोणती? याची जाणीव शिक्षकाने नेहमीच ठेवावी,
समाज म्हणजे आरसा असतो. आपल्या एखाद्या कृतीचे प्रतिबिंब समाजात
लवकर दिसते, त्यामुळे शिक्षकाने दैनंदिन जीवनात दक्ष राहिले
पाहिजे.
शिक्षक हा
राजकारणापासून अलिप्त असावा, असे मानले जाते. पण व्यवहारात याच्या उलट
दिसत आहे. प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या पक्ष- संघटना, दल,
गट, इ. संबंधित आहे. यातून केवळ शिक्षकाचा
स्वार्थ साधला जात आहे. पण ज्या भावनेने आपण शिक्षकव्रत स्विकारले तीच मूलतः नष्ट
होत नाही. केवळ एखाद्या मंडळावर वर्णी लागावी, आपणाला
पूरस्कार प्राप्त होआवा, आपल्याला एखादे पद प्राप्त होआवे. या
करता राजकारण करणारे अथवा राजकीय पक्षाच्या निगडीत असणारे अनेक जण आहे. यांनी
कुठेतरी आपल्या पेशाची जाणीव ठेवावी, मुठभर अशा लोकांनमुळे
समाज शिक्षकांना त्या दृष्टीने पाहात आहे.
शिक्षक
- या शब्दातून आशयपूर्ण अर्थ निघतो.
शि- शिलवान
क्ष-
क्षमावान
क-
कर्तृत्ववान
हा अर्थ
समजला तर शिक्षकाकडून अयोग्य कार्य होणार नाही. भारताला आदर्श शिक्षकांची फार मोठी
परंपरा लाभलेली आहे. आपल्या देशाला सदाचाराचे धडे देण्याचा कामाच्या बाबतीत
गुरुंचे स्थान अत्यंत महत्वाचे आहे.
"मन्त्र यदा हि गुरूणं लवणमिवास्ति ।
छात्रास्तदासमदुग्धं
विकृतं भवन्ति ।।
तेषां
परं हि वचनं खलु शर्करास्ति ।
नित्यं
हि ते मधुरदुग्धसमो प्रियं यै ।।
एकंदरीत काय
तर- गुरुचा सल्ला जेंव्हा (विद्यार्थ्यांला) मिठाप्रमाणे असतो. त्यामुळे विद्यार्थी दुधाप्रमाणे विकृत (नासतात) बनतात. पण
गुरुचे बोलणे जेव्हा साखरेचे असते. तेव्हा ते विद्यार्थी मधुर दुधाप्रमाणे सर्व
लोकांना प्रिय होतात. म्हणून शिक्षक प्रक्रियेत शिक्षकाला मानाचे स्थान आहे ते
केवळ विद्यार्थ्यामुळे आहे. सर्व समस्या, अडचणी, आव्हाणे, स्विकारून उद्याचे निर्व्यसनी, सक्षम, निस्वार्थी नाकरिक घडविण्याचे कार्य आज
शिक्षकावर आहे.
[ हे
विचार वर्तमान पत्रात वाचायला मिळाले.]
शब्दांकन.. महंत
जयराजशास्री [साळवाडी]