संस्कृत-सुभाषित-रसग्रहण-Sunskrit-Subhashit
शकटं पंच हस्ते दश हस्तेन वाजिनम् ।
हस्ति शतस्तेन देशत्यागेन दुर्जनम् ।।
अर्थ :- सुरक्षित अंतर बैलगाडी पासून पाच हात , घोड्या पसून दहा हात आणि हत्ती पासून शंभर हात दूर रहावे. आणि दुर्जना पासून सुरक्षेसाठी मात्र तो भागच ( देश ) सोडून दूर जावे.
प्रश्न :- या सुभाषिताबद्दल शंका आहे निरासन करा. दुर्जना पासुन पळुन का जायचे? हा भेकड पणा नाही का? सकारात्मक विचार का नाही? हि शंका आहे.
उत्तर :- सुभाषितं ही सूत्ररूप असतात.. त्यातील शब्दांचे अर्थ तारतम्याने.. स्थळ काल व्यक्ति स्थिति सापेक्ष.. लावावे लागतात.. सारे वेळा शब्दांचे वाच्यार्थ लागू पडत नाहीत.. अशावेळी लक्ष्यार्थ व व्यंग्यार्थ ध्यानात घ्यायचे असतात.
प्रस्तुतच्या सुभाषितातला दुर्जन हा आपल्यापेक्षा सर्वार्थाने प्रबळ असेल तर त्याच्यापासून दूर राहणंच हिताचं असतं... सर सलामत तो पगडी पचास या न्यायानं अशा दुर्जनाचा प्रतिकार करण्यात आपला शक्तिकालबुद्धी इ.चा अपव्यय करण्यापेक्षा तात्पुरती माघार घेऊन यथायोग्य स्थळी काळी योग्य प्रकारे त्याचा यशस्वीपणे प्रतिकार करणं शहाणपणाचं ठरतं.शक्ति जेव्हा लागू पडत नाही तेव्हा युक्तीचा वापर करणं शहाणपणाचं ठरतं.. म्हणून देशत्यागेन दुर्जनम् हे योग्य वाटतं!
तुमची शंका योग्य आहे काही सुभाषित हे तत्कालीन परिस्थिती वर अवलंबून असतात (भाग वा देश म्हणजे) परिसर त्याच्या परिसराजवळ ही भटकू नये पण सुभाषितकारांनी त्याला संपवू नये असे कुठे म्हटले नाही अर्थात तो संपविलाच पाहिजे आठवा शिवाजी महाराज - अफझलखान व प्रथम तीन हे त्या प्राण्यांच्या चपळाई व विध्वंस शक्तीच्या परिघाच्या बाहेर राहण्याचे संकेत वा व्यवहारिक सूचना आहेत म्हणजे ज्याचा भरवसा नाही त्याला कसे हाताळावयाचे हे सुभाषितकार सुचवत आहे.
सुभाषित रसग्रहण
घृतं न श्रूयते कर्णे दधि स्वप्नेऽपि दुर्लभम् ।
मुग्धे दुग्धस्य का वार्ता तक्रं शक्रस्य दुर्लभम् ॥
हिंदी अर्थ :- घी का नाम भी कानों ने सुना नही होगा, दही तो स्वप्न में भी मिलना दुर्लभ है; हे प्रिये! दूध की तो क्या बात करनी? और इंद्र को भी न मिलने वाला छाछ तो दुर्लभ ही है।
मराठी अर्थ :- तुपाचे नांव पण कानावर पडले नसेल आणि दही तर स्वप्नांत मिळणे पण दुर्लभ आहे. हे प्रिये! दूधाचे तर काय सांगणे, इंद्राला पण प्राप्त नाही असे ताक तर मिळणे असंभवच आहे.
अभिवादनशीलस्य नित्यं वृद्धोपसेविन: !
चत्वारि तस्य वर्धन्ते आयुर्विद्या यशो बलम्! ।। (मनुस्मृति)
अभिवादनशीलस्य (अभि+ वद् (to greet) वंदनीय व्यक्तींना नमस्कार करण्याची सवय असलेल्या), नित्यं (नेहमी) वृद्धोपसेविन: (वृद्ध + उप + सेविन् = वयोवृद्ध व्यक्तींची सेवा करणार्या, त्यांच्या नेहमी सहवासात रहाणार्या (व्यक्तीच्या) चत्वारि (चार गोष्टी) वर्धन्ते ( वृद्धिंगत होतात, वाढतात)
१) आयु: ( आयुष्य),
२) विद्या ( ज्ञान),
३) यश: ( कीर्ती)
४) आणि बलम् (सामर्थ्य).
हा श्लोक मनुस्मृतीतला आहे. श्रुति आणि स्मृति अशी पवित्र ग्रंथांची विभागणी केली जाते. जे ग्रंथ ऋषींनी ऐकले ते वेद म्हणजे श्रुती आणि जे त्यांच्या लक्षात राहिले ते धर्मशास्त्रीय ग्रंथ म्हणजे स्मृती. भारतीय संस्कृतीमध्ये हे दोन्ही ग्रंथ प्रमाण मानले आहेत.
समाजात कसं वागावं ते सांगण्याचं काम धर्मशास्त्रीय ग्रंथ करतात. वृद्ध व्यक्तींना सन्मान देणं हे तरुणांचं, विशेषत: विद्यार्थ्यांचं कर्तव्य आहे असा नियमच धर्मशास्त्रीय ग्रंथात केला. अनेक पावसाळे पाहिलेल्या व्यक्तींच्या अनुभवाचा उपयोग तरुणांनी करून घ्यावा हाच या नियमामागचा हेतू आहे.
डॉ.सौ. निर्मलाताई कुलकर्णी (पुणे)
संस्कृत सुभाषित रसग्रहण
एकचक्रो रथो यन्ता विकलो विषमा हया: !
आक्रमत्येव तेजस्वी तथाप्यर्को नभस्तलम् !!
रथ: एकचक्र: ( एकच चाक असलेला रथ),
यन्ता (सारथी )
विकल: (पंगू),
विषमा: ( विषम संख्येचे )
हया: (घोडे ),
तथापि ( असे असले तरीही)
तेजस्वी अर्क: ( सूर्य)
नभस्तलम् ( आकाशावर)
आक्रमति एव ( चढाई करतोच).
अमुक नाही म्हणून माझी प्रगती झाली नाही असे उद्गार आपण नेहमीच काढत असतो. आपल्या अपयशाचे कारण बाह्य गोष्टींमध्ये कधीच नसते. स्वत:मध्ये कुवत असेल तर इतर गोष्टींवर सहज मात करता येते हे तत्त्व सूर्याचं उदाहरण देऊन स्पष्ट केलं आहे.
सूर्याकडे स्वत: ची तेजस्विता सोडली तर दुसरं काहीही नाही. त्याचा रथ एकच चाकाचा. बारा आरे असलेलं संवत्सर (वर्ष) हे सूर्याच्या रथाचं चाक. अरुण हा त्यांचा सारथी, त्याला एक पायच नाही. म्हणून 'अनूरू' (मांडी नसलेला) असं अरुणाचं दुसरं नाव आहे. सूर्याच्या रथाला सात घोडे ,म्हणजे विषम संख्येचे. आक्रमणासाठी अशा अनेक गोष्टी पोषक नसताना देखील सूर्य नभोमंडलावर आक्रमण (चढाई) करतोच.
निराशग्रस्त मनाला आत्मविश्वास देण्याचं काम अशी अनेक सुभाषिते करतात.
डॉ.सौ. निर्मलाताई कुलकर्णी
सुभाषित रसग्रहण
दामोदरकराघात विह्वलीकृतचेतसा ।
दृष्टं चाणूरमल्लेन शतचन्द्रं नभस्तलम् ॥
हिंदी अर्थ :- दामोदर कृष्ण के मुठ्ठी का प्रहार होने पर हक्काबक्का बने हुए चाणूर मल्ल को चक्कर आनेसे उसने ‘आकाश में एक के बदले सौ चाँद देखे।’
मराठी अर्थ :- दामोदर कृष्णाच्या मुष्टीप्रहारामुळे आकुळव्याकुळ बनलेल्या चाणूर मल्लाला चक्कर आल्यामुळे त्याने ‘आकाशात एका ऐवजी शंभर चंद्र पाहिले.’
चलत्तरङ्गरङ्गायां गङ्गायां प्रतिबिम्बितम् ।
सचन्द्रं शोभतेऽत्यर्थं शतचन्द्रं नभस्तलम् ॥
हिंदी अर्थ :- प्रवाहित गंगा की तरंगों में आकाश के चांद का प्रतिबिंब गिरने से (हिलती हुई तरंगो सें सौ प्रतिबिम्ब दिखने से) आकाश सौ चांद से भरा हुआ शोभित होता है।
मराठी अर्थ :- गंगेच्या अतिशय हालणाऱ्या लाटांच्या तरंगावर आकाशातला चंद्र प्रतिबिंबित झाल्या मुळे [हालणाऱ्या लाटांमुळे शंभर प्रतिबिंबे पडल्यामुळे] आकाश शंभर चंद्र असल्याप्रमाणे अतिशय शोभून दिसते.
विधे पिधेहि शीतांशुं यावन्नायाति मे प्रियः ।
आगते दयिते कुर्याः शतचन्द्रं नभस्तलम् ॥
हिंदी अर्थ :- हे ब्रह्मदेव! मेरा प्रियकर आने तक इस चाँद को छिपा दे। (नायिका को चांद के दर्शन से विरह की पीडा होती है) मेरा प्रियकर आने पर भले ही आकाश में सौ चाँद लेकर आना ।
मराठी अर्थ :- हे ब्रह्मदेवा! माझा प्रियकर येई पर्यंत चंद्राला लपव [नायिकेला चंद्राच्या दर्शनाने विरहाचा त्रास जास्त होतो. म्हणून चन्द्र नाहीसा करायला ती सांगते.] मग तो आल्यावर वाटल्यास आकाशात शंभर चन्द्र घेऊन ये.