।।वंदे श्रीचक्रधरम्।।
।। चिंतन ।।
श्रीचक्रपाणिप्रभु जन्मोत्सव महानुभाव पंथ सण
मुकं करोति वाचालं पङ्गुं लंङ्गयते गिरीम् ।
यत् कृपा तमहं वंदे परमानंद माधवम् ।।
या संसारात अशी एक शक्ती असी आहे की, ती शक्ति म्हणजे परब्रम्ह परमेश्वर! त्या परब्रम्ह परमेश्वराची जर कृपा झाली. तर मुक्याला देखील वाणी प्राप्त होते. पांगळा असेल तर त्याला देखील पाय मिळाल्या शिवाय राहात नाही. म्हणून असा जो परब्रम्ह परमेश्वर आहे. त्या मायापती प्रभुला माझा नमस्कार असो.
वरिल संदर्भातील प्रसंग बर्याच अंशी श्रीचक्रपाणी चरित्रात पाहाण्याला मिळतात.
एक दिवस श्रीचक्रपाणी महाराज महारूद्राच्या देवाळाच्या पूर्व बाजूला खेळक्रिडा करत होते. तितक्यात एक पांगळा राऊळां जवळ आला. आणी राऊळांना हात जोडून विनंती करु लागला! जी.. जी..मला पाय नाही... पाय नाही.तरी देवा मला पाय द्यावे. त्यावर राऊळ म्हणाले! असा काय बसला आहेस? मग राऊळांनी आपुले दोन्ही श्रीचरण पांगुळ्या पायावर ठेवून त्याला ऊभे करु लागले. तेंव्हा मोठ्याने ओरुडू लागला. मग तेथे भरपूर लोक गोळा झाले. लोक म्हणु लागले! राऊळ असे काय करता. राऊळ म्हणाले ! आम्ही याचा ऊद्धार करतो. असे म्हणून त्याला लोटून दिले. मग तो जोरात धावू लागला. नगरजनांना आश्चर्य झाले. मग सर्वलोक राऊळांचा जयजयकार करु लागले.
असाच एक आंधळा रस्ता चाचपडत येत होता. राऊळ त्याच्या जवळ गेले. राऊळ म्हणाले, कोण्या गावी जात आहात? कोण्या गावी जाऊ? मला डोळे नाहीत. मायबाप देखील नाही. आप्तगोत्रातील कोणी संभाळत नाही. काही सुचत नाही. एकाने राऊळाची भेट घेण्यास सांगतली, म्हणून मी राऊळांना शोधत..शोधत.. चाललो आहो. मग राऊळांनी हात धरुन आवारात आणले. मग राऊळ म्हणाले, पूर्विचे कर्म सोडत असाल, तर आम्ही तुम्हास दृष्टी देऊ, अशी अट राऊळांनी घातली. मग त्याने ती अट मान्य केली. राऊळांनी कृपादृष्टीने आवलोकुन पहा म्हटले. मग तो राऊळांच्या दृष्टीकडे पाहू लागला, नेत्राद्वारे राऊळांनी विद्येचा संचार केला. मग स्तुती करु लागला. लोक हितादी कामे करु लागला. अशा आंधाळ्याला दृष्टी दिली.।।
एक दिवस एका माळ्याचा एकुलता एक लाहान मुलगा सरला. तो अतिशय दुःख करु लागला. कोणीतरी त्यांना सुचीत केले. आपल्या नगरात सुर्यकांताच्या मंदिरा जवळ जे पुरुष खेळ क्रिडा करत आहे. त्यांना विनंती करा, ते अनेकांचे दुःख दुर करतात, मग ती माळीन राऊळांच्या जवळ गेली. व राऊळांना म्हणाली!
जी.. जी.. माझ्या मुलाचा आकस्मीक मृत्यू झाला आहे काय करु? असे म्हणून दुःख करु लागली. मग राऊळ तिच्या घरी गेले. मग राऊळांनी त्या मुलाला मांडीवर घेतले. आणी आपल्या कृपादृष्टीने आवलोकीले. श्रीकराने सर्वागांस स्पर्श केला.
लोक तेथे जमलेलेच होते. लोकआप आपसात कुजबूजू करु लागले, म्हणू लागले, मेलेला मुल कसे जिवंत होईल. ही अशक्य गोष्ट आहे. पण माळी आणी माळीनीने अतिशय मनोभावे राऊळांची प्रार्थना केली. राऊळाने देखील त्या प्रार्थनेचा स्वीकार केला. आणी मुलगा डोळे ऊघडे करुन ईकडे तिकडे पाहु लागला. कुमुरू कुमरु.. जियाला! अशी वार्ता साऱ्या नगरात पसरली व सारे नगरजन, माळीन व माळी हर्षभरित होऊन राऊळांचा जयजयकार करु लागले.
पाण पेखणे मंदिरात श्रीचक्रपाणी महाराज दुःखीतांचे दुःख दुर करतात असी कीर्ती सर्वत्र झालेली होती. ती कीर्ती ऐकून, एक महारोगी आंगनात वाट पहात ऊभा राहीला होता. राऊळ बाहेर आले, राऊळांना पहाताच हात जोडून विनंती करु लागला! माझा महारोग नष्ट करावा जी, मग श्रीचक्रपाणी महाराजांनी पाणपेखण्याचे सर्वतिर्थ आणून महारोग्याला दिले. राऊळांनी त्यास पिण्यास सांगितले. व सर्वांगास चोळण्यास सांगितले. आपल्या श्रीकराने महारोग्यास स्पर्श केला. त्याचा महारोग दुर झाला. व त्याला सुंदर रुप प्राप्त झाले. मग तो महारोगी राऊळांना साष्टांग दंडवत घालू लागला. नगरातील सर्व लोक राऊळांची स्तुती करु लागले. व सर्व लोकांना आश्चर्य झाले.
असेच राऊळ दुःखीतांचे दुःख दुर करत होते. नगरीतील एक ब्राम्हणाला वृद्धकाळात एक पुत्र झाला. पण जन्मताच तो मुलगा काही बोलना, तो मुका निघाला. मग तो ब्राम्हण अतिशय दुःखी झाला. त्या मुलाला घेऊन तो ब्राम्हण श्रीकृष्ण मंदिरात आला. राऊळांचे शास्त्र निरोपण चालू होते. राऊळांच्या पुढे त्या मुलाला बसविले. मग तो ब्राम्हण राऊळांना विनवू लागला! जी.. जी.. माझ्या मुलाला वाचा नाही. तरी मुलाला वाचा द्यावी जी ! राऊळांनी त्या मुलाला कृपादृष्टीने आवलोकुन निरोपण करु लागले.
मग राऊळ त्या मुलाला म्हणाले, आम्ही जे निरोपण केले ते म्हणा बर! काय आश्चर्य राऊळांनी जेवढे निरोपण केले. ते सर्व तो म्हणू लागला! सर्वांना आश्चर्य झाले. आणी ब्राम्हणाला आपार हर्ष झाला. राऊळांनी माझ्या मुलाला वाचा देऊन क्षणभरात विद्वान बनवले. आणी त्या ब्राम्हणाला फार आंनद झाला. अशा प्रकारे श्रीचक्रपाणी महाराजांनी अनेकाचे दुःख निवारण करून सुखी केले.
म.श्री जयराज शास्त्री ! तळेगावकर (साळवाडी )