विसर, संचार, व्यभिचार घडू न देणे, हि खरी साधकाची आध्यात्मिक साधना महानुभाव पंथिय ज्ञान सरिता

विसर, संचार, व्यभिचार घडू न देणे, हि खरी साधकाची आध्यात्मिक साधना महानुभाव पंथिय ज्ञान सरिता

 विसर, संचार, व्यभिचार घडू न देणे, हि खरी साधकाची आध्यात्मिक साधना 

मानवी जीवनामध्ये चालत असतांना विसर पडण्याने निश्चितच नुकसान होत असते, हे कोणीच नाकारू शकत नाही. मग तो विसर लौकिक क्षेत्रातील  असो! किंवा विसर आध्यात्मिक क्षेत्रातील  असो!

लौकिक दृष्टिकोनातून जर विचार केला,तर शालेय विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षेचा वेळी प्रश्न पत्रीकेतील प्रश्नांची उत्तरे जर लिहिता आली नाही, आणि परीक्षेच्यावेळी विद्यार्थ्यांना अध्ययनाचा विसर पडलेला असेल, तर परीक्षेत नापास होण्याची दाट शक्यता असते, विसरण्यामुळे पूर्ण वर्ष, वेळ, तथा पैसा वाया जात असतो, तसेच विद्यार्थ्यांचे आत्मबल देखील काहीअंशी कमी झालेले आपल्याला पाहावयास मिळते, कारण विद्यार्थ्यांच्या बुद्धिमधे अध्ययना व्यतिरिक्त अन्य एवं इतर गोष्टींचा संचार झालेला असल्यामुळे अशी परिस्थिती निर्माण होत असते,

अध्यात्मामधे देखील शास्त्र आध्ययनाच्या बाबतीत तथा भक्तीच्या बाबतीत अनन्य असणे अतिशय महत्वाचे असते, ज्या परमेश्वराची आपण अनन्यभावे भक्ती करीत आहे, किम्बहूना एक निष्ठेने आठवण करीत आहो, आणि त्या परमेश्वराच्या आठवणीचा पुढे चालून जर विसर पडत असेल, तर त्या साधकाच्या ठिकाणी निश्चितच अन्यचा म्हणजे इतर त्रिगुणात्मक भौतिक गोष्टींचा निश्चित संचार झालेला आहे, अशा गोष्टीला आध्यात्मामधे व्यभिचारू या नावाने  संबोधलेले आहे, अशा गोष्टीला व्यभीचारु भक्ती म्हणतात,

या तात्त्विक दृष्टीने पाहाता परमेश्वराची "भक्ती" अव्यभीचारी तथा एक निष्ठ असली पाहिजे, "अनन्य" असली पाहिजे,

परमेश्वर चिंतनाचा विसरू पडू न देणे,हि खरी साधकाची तप साधना आहे, परमेश्वराच्या आठवणी विषयी विसर पडू न देणे, तसेच इतर त्रिगुणात्मक गोष्टीचा संचार होऊ न देणे, भक्तीतला व्यभिचार घडू न देणे, याची साधकानी काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. म्हणून साधकाने सतर्क राहून परमेश्वराची एकनिष्ठ भक्ती  करणे, अतिशय महत्त्वाचे आहे.म्हणून म्हटलेले आहे,

ऐसा आठवणे पडे वीसरु,

तेथ होये अन्याचा संचारु,

या नावे वीभीचारुः

बोलीजे तो!

महंत श्री जयराज शास्त्री ![साळवाडी]

====+=======


"बदल"

"बदल" हा शब्द बहुतांशी सर्वांच्या चांगलाच परिचयाचा आहे,

"बदल" शब्दात मोठे गूढ रहस्य दडलेले असते, "बदल" शब्दाच्या गर्भात शिरल्यावर तेथील अंतर्गत  शक्ती तथा ताकद पाहावयास मिळते, म्हणून लौकिक क्षेत्रात सतत "बदल" पाहावयास मिळतो,

उदाहरणार्थ - शाळेचा एखादा  गणवेष कोणाच्या तरी व्यक्तीच्या कल्पनेतून असतो. तो गणवेष आपण बरेच दिवस पाहात असतो, मग आपण पक्के ध्यानात ठेवतो, हा गणवेष आमक्या शाळेचा आहे.

पून्हा काळांतराने एखाद्या बलशाली धनशाली व्यक्तीची शाळा समितीवर निवड झाली की, तो समिती प्रमुख  शाळेच्या गणवेषाच्या रंगाचा बदल करतो. दुसऱ्या रंगाचा गणवेष मुले परिधान करतात. कारण हा "बदल" निवड झालेल्या व्यक्तीच्या "पावर" बलावर झालेला असतो.

"बदल" शब्दातच मुळात गूढ दडलेले आहे.

 "बदल" शब्दाकडे आपण सूक्ष्म दृष्टीने पाहूया! "बदल" शब्दातील "द" हा वर्ण बाजूला काढला की, "बल" हा शब्द शिल्लक राहातो, "बल" शब्दाचा अर्थ ताकद , शक्ती, मग धनशक्ती, ज्ञान शक्ती या जोरावर समाजात साम्राज्य निर्माण करतो,

"बदल" शब्दातील. ब" हा वर्ण काढला तर "दल" शब्द शिल्लक राहातो, दल" शब्द हा समूह दर्शक आहे. अशा समूहाच्या जोरावर बदल" करण्याचा कार्यक्रम तयार होत असतो. म्हणून समाजात लौकिक क्षेत्रात वरवरचा "बदल" सतत दिसणार आहे, आणि होत राहाणार आहे.

पण तत्त्वज्ञानात  चार नित्य पदार्थ आहे.यांच्यात मात्र बदल" असंभव आहे, हे मात्र तितकेच त्रीवार सत्य आहे. म्हणून लौकिक क्षेत्रातील बदल "बळ, दल, दब, या बाबींवर होत असतात. वरचा रंग बदलला पण मूळचा रंग मात्र बदलणे फारच कठीण असते, असो!

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post