संस्कृत-सुभाषित-रसग्रहण-Sunskrit-Subhashit
सर्वस्य जन्तोर्भवति प्रमोदो
विरोधिवर्गे परिभूयमाने ।
तिरोहिते त्वद्यशसा नरेन्द्र
चन्द्रोदये नृत्यति चक्रवाकी ॥
हिंदी अर्थ :- चन्द्रोदये नृत्यति चक्रवाकी यह चरण समस्या है। हे राजा! आपका शत्रु जब हारने लगा, तब सभी प्राणियों को खूब आनंद हुआ । वैसे ही आपके यशरूपी चंद्र का उदय होने पर आपके शत्रु धुँधले हो गये। और आपके चंद्ररूपी यश का उदय होते देखकर ‘चक्रवाक नाचने लगे हैं।’
मराठी अर्थ :- हे राजा! आपल्या शत्रुचा जेंव्हा पराभव होऊ लागला, तेंव्हा सर्व प्राण्यांना खूप आनंद झाला. तसेच आपल्या यशरूपी चंद्राचा होणारा उदय बघून शत्रुंचा चेहरा म्लान झाला. आपल्या यशरूपी चंद्राचा उदय बघून ‘चक्रवाक पक्षी नांच करू लागले.’
महाभारत सुभाषित
अर्धं भार्या मनुष्यस्य भार्या श्रेष्ठतमः सखा ।
भार्या मूलं त्रिवर्गस्य भार्या मूलं तरिष्यतः ॥
हिंदी अर्थ :- भार्या पुरुष का आधा अंग है। भार्या पुरुष का सबसे उत्तम मित्र है। भार्या धर्म, अर्थ और काम इस त्रिवर्ग का मूल है और संसार सागर से तरने की इच्छावाले मोक्षार्थी पुरुष के लिये भार्या ही प्रमुख साधन है।
न क्वापि रामाहितसंशयाया
विना नमात्वं जनकात्मजायाः।
पुरः सुराणाङ्कपुरःसराणाम्
अङ्गारपूर्णं कमलं प्रफुल्लम्॥
हिंदी अर्थ :- समस्या - ‘अंगारपूर्णं कमलं प्रफुल्लम्।’ सीता ने जब अग्निप्रवेश किया तब भी उनका मुखकमल अत्यंत प्रफुल्लित था। इस प्रसंग को आलेखित करते हुए कवि कहते हैं कि, ‘जिस सीता के लिये अहित द्वेषीजनों कों भी कुछ संशय हो ऐसा नही था, जिस जनक की पुत्री सीता के विषय में माता छोडकर अन्य भाव पैदा नही हो सकता, उस सीता ने देवों के पिता ब्रह्माजी के समक्ष अग्निमें प्रवेश किया । तब उनका मुखकमल अंगारे से परिपूर्ण होने पर भी अत्यंत प्रफुल्लित था।’
मराठी अर्थ :- समस्या - ‘अंगारपूर्णं कमलं प्रफुल्लम्।’ सीतेने जेंव्हा अग्निप्रवेश केला, तेंव्हा त्यांचे मुखकमळ एकदम प्रफुल्लित होते. ह्या प्रसांगाचे वर्णन करतांना कवी सांगतात की, ‘ज्या सीतेसाठी अहित-द्वेषीजनांसाठी पण काही संशय मनात आहे असे नव्हते, ज्या जनकपुत्री सीतेविषयी माता सोडून अन्य भाव उत्पन्न होणे शक्य नव्हते, त्या सीतेने देवांचे पिता ब्रह्मदेवांसमक्ष अग्निप्रवेश केला. तेंव्हा त्यांचे मुखकमळ अंगाऱ्याने परिपूर्ण असतांना पण अत्यंत प्रफुल्लित भासत होते.’
महाभारत सुभाषित
भार्यावन्तः क्रियावन्तः सभार्या गृहमेधिनः।
भार्यावन्तः प्रमोदन्ते भार्यावन्तः श्रियान्वितः ॥
हिंदी अर्थ :- जिनकी भार्या है वही देव, पितृ और ऋषीयों के ऋण से मुक्त होने के लिये यज्ञ इ. क्रिया कर सकते हैं। सपत्निक पुरुष ही सच्चे गृहस्थ है। पत्नीवाले पुरुष ही सुखी और प्रसन्न रहते हैं। तथा जो पत्नि से युक्त है, मानो लक्ष्मी से संपन्न है। (क्योंकि पत्नि ही घर की लक्ष्मी है।
पुञ्जायमानारुणरत्नहारे
कान्तोरसि स्रावदनङ्ग भाति ।
सिध्येदमुष्योपमितिर्यदि स्याद्
अङ्गारपूर्णं कमलं प्रफुल्लम् ॥
हिंदी अर्थ :- इस सुंदर स्त्री के छाती पर जो रत्नों का हार है, उसकी कांती लालवर्ण का पुंज इकठ्ठा हुआ हो ऐसी लगती है, और छाती से अनंग रस बह रहा है ऐसा लगता है. इस तरह हार के बीच रहे हुए छाती की कमल के साथ तुलना करेंगे तो, हार की अंगारे के साथ तुलना करके ‘अंगारे में रहने पर भी कमल प्रफुल्लित है।’ ऐसा कह सकते हैं।
मराठी अर्थ :- ह्या सुंदर ललनेच्या छातीवर जो रत्नांचा हार आहे, त्याची कांती लालवर्णाचा पुंज एकत्र झाल्यासारखी आहे, आणि छातीतून अंगार झरत आहे असा भास होत आहे. अशा तऱ्हेने हाराच्या मध्ये असलेल्या छातीची कमळाशी तुलना करून आणि हाराची अंगाऱ्याशी तुलना करून ‘अंगाऱ्याच्या मध्ये असतांनाही कमळ प्रफुल्लित आहे.’ असे म्हणू शकतो.
महाभारत सुभाषित
सखायः प्रविविक्तेषु भवन्त्येताः प्रियंवदः ।
पितरो धर्मकार्येषु भवन्त्यार्तस्य मातरा ॥
हिंदी अर्थ :- पत्नि ही एकान्त में अच्छे परामर्श देनेवाली सङ्गिनी या मित्र है। धर्मकार्यों में ये स्त्रियाँ पिता की भाँति पति की हितैषिणी होती है। और संकट के समय माता की भाँति दुःख में हाथ बटाती है। तथा कष्ट निवारण की चेष्टा करती है।
कर्णस्त्वचं शिबिर्मांसं जीवं जीमूतवाहनः|
दधौ दधीचिरस्थीनि किमदेयं महात्मनाम् ।। संकीर्ण मराठी अर्थ:- कर्णाने आपली त्वचा म्हणजे कवचकुंडले दान म्हणून दिली. शिबिराजाने आपले मांस दिले. जीमूतवाहनाने आपले प्राण दिले आणि दधीचि ऋषींनी आपल्या अस्थी दिल्या. महान लोकांच्या बाबतीत 'देण्यास अयोग्य' अशी वस्तूच नसते.
कथा:- जन्मतःच कवचकुंडले लाभल्याने कर्ण हा कुणालाही अजिंक्य होता. अर्जुनाचा पराभव होऊ नये म्हणून इंद्राने ब्राह्मणाच्या रूपाने येऊन ती कवचकुंडले मागितली. इंद्र कपटाने आला आहे आणि त्याला कवचकुंडलांचे दान दिले तर आपला सर्वनाश आहे हे कळूनही दानशूर कर्णाने ती दिली.
एका कपोताच्या(कबूतराच्या) मागे ससाणा लागला होता. घाबरलेला कपोत शिबि राजाच्या आश्रयास आला. आश्रयाला आलेल्याचे रक्षण करणे हे राजाचे कर्त्तव्य असल्याने कपोताच्या जागी शिबिने स्वतःच्या शरीरातले मांस कापून ते ससाण्याला देऊ केले.
गरुड़ हा नागांचा शत्रु. सर्व नागांचा नायनाट होऊ नये म्हणून नागांचा राजा वासुकि हा गरुडासाठी रोज एक नाग पाठवू लागला. एक दिवस 'शंखचूड़' नावाच्या नागाची पाळी आली तेव्हा त्याच्या वृद्ध मातेने खूप शोक केला. ते पाहून विद्याधरपुत्र जीमूतवाहन स्वतः वध्यशिलेवर जाऊन उभा राहिला. गरुड़ त्याला तीक्ष्ण चोचेने रक्तबंबाळ करत असतांना तो शांत होता. त्याची ती अलौकिक सहनशक्ति पाहून गरुड़हि चकित झाला. मग त्याने स्वर्गातून अमृत आणून सर्व नागांना जीवंत केले.
दधीचि ऋषींचे तपःसामर्थ्य इतके होते की त्यांच्या अस्थींच्या वज्राने राक्षसांचा नाश होऊ शकणार होता. देवांनी तशी विनंती केल्यावर दधीचीने आपली हाडे म्हणजे आपले प्राणही दिले.
या सर्व उदाहरणांवरून दिसते की मोठे लोक प्राणाचे मोल देऊनही इतरांचे रक्षण करीत असतात.
रे पुत्र सत्यङ्गमवाप्नुहि त्वम्
असत्प्रसङ्गं त्वरया विहाय ।
धन्योऽपि निन्दां लभते कुसङ्गात्
सिन्दूरबिन्दुर्विधवाललाटे ॥
हिंदी अर्थ :- समस्या - ‘सिन्दूरबिन्दुर्विधवाललाटे।’ हे पुत्र! तू दुर्जनों का संग जल्द से जल्द छोडकर सज्जनों का संग प्राप्त कर ले । अच्छा धन्य व्यक्ति भी दुर्जनों का संग पाकर निंदापात्र बन जाता है, जैसे सिंदूर की बिंदी है, जो मंगलसूचक है, लेकिन अगर वह विधवा के ललाट पर हो तो उसकी निंदा ही होती है।
मराठी अर्थ :- समस्या - ‘सिन्दूरबिन्दुर्विधवाललाटे।’ हे पुत्र! तू दुर्जनांचा संग लवकरांत लवकर सोडून सज्जनांचा संग प्राप्त करून घे. कारण की धन्य व्यक्ति पण दुर्जनांचा संग ठेऊन निंदेचे धनी होतांत, जसे सिंदूर ची बिंदी असते, जी मंगलसूचक आहे, परंतु जर ती विधवेच्या भाळी असेल तर तिची निंदाच होते.
महाभारत सुभाषित
कान्तारेष्वपि विश्रामो जनस्याध्वनिकस्य वै।
यःसदारः स विश्वास्यस्तस्माद् द्वारा परा गतिः ॥
हिंदी अर्थ :- परदेश में यात्रा करनेवाले पुरुष के साथ यदि उसकी स्त्री हो तो वह घोर से घोर जंगल में भी विश्राम पा सकता है-सुख से रह सकता है। लोक व्यवहारमें भी जिसके पास स्त्री है, उसीपर सब विश्वास करते हैं। इसलिये स्त्री ही पुरुष की श्रेष्ठ गति है।
श्रिय: प्रदुग्धे विपदो रुणद्धि यशांसि सूते मलिनं प्रमार्ष्टि!
संस्कारशौचेन परं पुनीते शुद्धा हि बुद्धि: किल कामधेनु:!!
मराठी अनुवाद :-
श्रिय: ( संपत्ती) (रूपी)
प्रदुग्धे (दूध देते ).
विपद: (संकटे)
रुणद्धि (रोखून धरते).
यशांसि ( कीर्तीला)
सूते ( जन्म देते),
मलिनं ( पाप)
प्रमार्ष्टि ( पुसून टाकते ) संस्काररूपी पावित्र्याने दुसऱ्याला शुद्ध करते.
हि (कारण),
शुद्धा (शुद्ध, सरळ)
बुद्धी खरंच कामधेनू असते.
कामधेनू ही संस्कृत साहित्यातील एक कविकल्पना, इच्छापूर्ती करणारी धेनू, गाय. कामधेनू आणि सद्बुद्धी या सारख्याच. कामधेनू दूध देते तर सद्बुद्धी संपत्ती, समृद्धी देते. गाय संकटे शिंगांनी आठवते. सद्बुद्धी संकटांशी मुकाबला करण्याची ताकद देते. गाय वासरांना जन्म देते तर सद्बुद्धी कीर्तीला. यशस् या संस्कृत शब्दाचा अर्थ कीर्ती. या श्लोकात यशांसि असे बहुवचन वापरले आहे. सद्बुद्धीच्या जोडीने इतर अनेक सद्गुण मनुष्यामध्ये येतात. त्या अनेक सद्गुणांमुळे तो विख्यात होतो. गोमयाने सारवलेली जमीन स्वच्छ होते तर सद्बुद्धीने विचारांची मलिनता पुसली जाते. सद्बुद्धीचा लाभ फक्त स्वत:लाच होत नाही तर दुसऱ्यालाही होतो. पंचगव्याचा उपयोग दुसऱ्याला पवित्र करण्यासाठी होतो. चांगल्या विचारांचा परिणाम चांगल्या व्यक्तीच्या सहवासातल्या माणसांवरही होतो.
डॉ.सौ. निर्मलाताई कुलकर्णी (पुणे)
तव करकमलस्थां स्फाटिकीमक्षमालाम्!
नखकिरणविभिन्नां दाडिमीबीजबुद्ध्या!
प्रतिकलमनुकर्षन् येन कीरो निषिद्ध:!
स भवतु मम भूत्यै वाणि ते मन्दहास: !!
मराठी अनुवाद :-
हे वाणि, ( सरस्वती),
तव (तुझ्या)
करकमलस्थाम् (हातात असलेल्या)
नखकिरणविभिन्नाम् (नखांचा प्रकाश पडून वेगळ्या दिसणाऱ्या)
स्फाटिकीम् (स्फटिक मण्यांच्या)
अक्षमालाम् (जपमाळेला)
दाडिमीबीजबुद्ध्या (डाळिंबाचे दाणे समजून)
प्रतिकलम् (प्रत्येक क्षणाला)
अनुकर्षन् (आकर्षित करून)
येन( ज्याने)
कीरो निषिद्ध: ( पोपटाला परतवून लावले)
स ( असे )
ते (तुझे)
मंदहास: ( मंद हास्य)
मम ( माझ्या )
भूत्यै (समृद्धीला )
भवतु (कारणीभूत ठरो.)
मराठी भावार्थ :- अतिशय सुंदर कल्पनेवर आधारलेला हा श्लोक आहे. हातात पांढऱ्या मण्यांची जपमाळ घेतलेली आणि मंद स्मित करणारी सरस्वतीची मूर्ती आपल्या परिचयाची आहेच. या दोन गोष्टी लक्षात घेऊन कवीनं एक कल्पना चितारली आहे. सरस्वतीच्या तजेलदार आणि लालसर नखांचा प्रकाश शुभ्र मण्यांवर पडतो आणि ते मणी लाल दिसतात. त्यांना डाळिंबाचे दाणे समजून पोपट झेप घेतो, पण हिरमुसला होऊन परत जातो, पुन्हा येतो, पुन्हा जातो. त्याची फजिती पाहून सरस्वतीही क्षणोक्षणी हसत रहाते.
डॉ.सौ. निर्मलाताई कुलकर्णी (पुणे)
सुतं पतन्तं प्रसमीक्ष्य पावके
न बोधयामास पतिं पतिव्रता ।
तदा ह्यसौ तद्व्रतशक्तिपीडितो
हुताशनश्चन्दनपङ्कशीतलः ॥
हिंदी अर्थ :- समस्या - ‘हुताशनश्चन्दनपङ्कशीतलः।’ (थके हुए पति की सेवा में मग्न पतिव्रता स्त्री का छोटा पुत्र अग्नि में गिर जाता है, लेकिन पति जग जाएगा इस भय से वह पुत्र को बचाती नही। तब सती के प्रभाव से अग्नि शीतल बन जाता है। इसका वर्णन करते हुए कवि कहता है,) अग्नि में खुद के पुत्र को गिरते देखकर भी पतिव्रता स्त्री ने खुद के पति को जगाया नही, तब सती के व्रत के शक्ति से पीडित अग्नि चंदन के किचड जैसा शीतल बन गया ।
मराठी अर्थ :- समस्या - ‘हुताशनश्चन्दनपङ्कशीतलः।’ (थकलेल्या पतिच्या सेवेंत मग्न पतिव्रता स्त्री चा छोटा मुलगा अग्नित पडला, तेंव्हा पती जागा होईल ह्या भीति ने ती पुत्राला वाचवत नाही. तेंव्हा सतीच्या प्रभावाने अग्नि शीतल होतो, त्याचे वर्णन करतांना कवी सांगतो की-) अग्निंत स्वतःच्या मुलाला पडतांना बघून ही पतिव्रता स्त्री स्वतःच्या पतीला जागे करीत नाही, तेंव्हा सतिच्या व्रताच्या शक्तिने पीडित अग्नि चंदनाच्या चिखलासमान शीतल बनला.
महाभारत सुभाषित
संसरन्तमपि प्रेतं विषमेष्वेकपातिनम् ।
भार्यैवान्वेति भर्तारं सततं या पतिव्रता ॥
हिंदी अर्थ :- किसीके सांसारिक लीला के अन्त होने के बाद (मृत्यु पश्चात) नरक में जाने पर उसके उद्धार के निमित्त केवल पतिव्रता भार्या ही साथ होती है।