गंधर्व प्रेमकथा - love story in marathi

गंधर्व प्रेमकथा - love story in marathi

 गंधर्व प्रेमकथा - love story in marathi

जीमूतकेतू नावाचा एक गंधर्व राजा होता त्याचा मुलगा होता जिमुतवाहन जीमूतकेतू म्हातारा झाला तेव्हा त्याने आपले राज्य आपल्या मुलावर टाकून स्वतः वानप्रस्थाश्रमात प्रवेश केला. आणि मुलाला राज्याभिषेक केला. 

परंतु जीमुतवाहन पितृभक्त होता त्याचे लक्ष राजभोगांत किंवा राज्यकारभारात कोठेच लागत नव्हते म्हणून राज्याचा सर्व भार मंत्र्यांवर टाकून तो सुद्धा आपल्या आई-वडिलांच्या बरोबर वनात गेला त्यांनी सर्वांनी मिळून वनात एक चांगलीशी जागा पाहिली आणि झोपडी बांधून तेथे राहू लागले..

आई-वडिलांच्या सेवेत काही दिवस गेले पुढे ते राहत होते त्या रानातील कंदमुळे संपुष्टात आली ते पाहून जमतके तुने आपल्या मुलाला मलय पर्वतावर चांगली जागा शोधून येण्यास सांगितले वडिलांच्या आज्ञेने जमत वाहन आपल्या अत्रेय नावाच्या मित्राला बरोबर घेऊन निघाला.

मलय पर्वतावर एक गौरी आश्रम नावाचा आश्रम होता तेथे ते दोघे जाऊन पोहोचले आसपासची शोभा पाहून आत शिरणार तोच किरट्या आवाजात मधुर संगीताचा स्वर त्यांच्या कानावर पडला. दोघेही मुग्ध होऊन बाहेर उभे राहून गाणे ऐकू लागले. आत विश्वावसू नावाच्या गंधर्वाची कन्या मलयवती देवीची स्तुती करीत होती गायन संपल्यावर तिची सखी तिला म्हणाली, “ मलयवती अगत्या कुमारीकेची आराधना करून का तुला योग्य वर मिळणार आहे?”

एक कुमारीकाच योग्य वर मिळावा म्हणून देवीची प्रार्थना करीत आहे, तेव्हा तिला पाहण्यास काहीच हरकत नाही असा विचार करून जमत वाहन आत शिरला. दोघांची दृष्टादृष्ट झाली दोघांचे मुखचंद्र रक्तवर्ण झाले पण कोणाच्याही तोंडून एक शब्दही निघाला नाही. घरून निरोप आल्यामुळे मलवती आपल्या सखी बरोबर घरी निघून गेली. थोड्याच दिवसात जीमूतवाहन आपल्या आई-वडिलांना गौरी आश्रमात घेऊन आला.

जीमूतवाहनावर पहिल्यापासून मलयवती त्याच्या प्रेमामुळे झुरू लागली होती. एक दिवस अंगाला चंदन लावून केळीच्या पानाने वारा घेत मलाई वती चंदन वनात बसली होती त्याचवेळी जीमूतवाहन आपल्या मित्रांबरोबर तेथे गेला. त्यांना पाहताच त्या दोघीजणी संगमरमरीच्या चबुतऱ्यावरून उठून आत निघून गेल्या. 

त्याच दगडावर जीमूतवाहनाने आपल्या प्रियसीचे चित्र काढीले होते. परंतु त्यावर मलवतीची नजर गेली नव्हती  तिने एवढेच ऐकले होते की, जीमूत वाहनाचे एका मुलीवर प्रेम आहे. तिच्या मनाला ही गोष्ट टोचत होती “मी ज्याच्यावर इतके प्रेम करीत आहे त्याने दुसरीवर प्रेम करावे” याचा विचार करून ती दुःखी होई  व आपल्या दैवाला दोष देई.

जीमूतवाहन ज्यावेळी त्या संगमरवरी कबुतऱ्याजवळ आला त्याच वेळी मायावतीचा भाऊ मित्रवसु जीमूतवाहनाचा शोध करीत करीत तेथे आला त्याबरोबर जीमूतवाहनाने आपण काढलेले चित्र केळीच्या पानाखाली लपविले व त्याच्याशी बोलू लागला. कोण कोठील वगैरे चौकशी झाल्यावर मित्र बसू म्हणाला आमच्या वडिलांनी आमची बहीण मलयवती आपणास देण्याचे ठरविले आहे. 

यावर जीमूतवाहन म्हणाला “या नातेसंबंधाने मला खरोखर फार आनंद झाला असता परंतु काय करणार माझे मन माझ्या हाती नाही ते परक्याचे झाले आहे.” जिमुतवाहनाचे बोलणे मलयवती आडून ऐकत होती त्याचा नकार कानी पडताच ती घेरी येऊन खाली पडली. आणि त्याच्या म्हणण्याचे काय एवढे महत्व त्याच्या वडिलांनी सांगितले म्हणजे तो येईल वळणावर असा विचार करीत मित्रवसू तेथून निघून गेला. 

त्या अवधीत तिच्या सखीने पाणी वगैरे शिंपडून तिला सावध केले डोळे उघडताच मलई वतीने आपल्या सखीस भाऊ आहे का गेला हे पाहून येण्यासाठी म्हणून पाठवले आणि ती स्वतः खुप दुःखी होऊ लागली आणि पुन्हा बेशुद्ध झाली. 

ते पाहून तिची सखी “वाचवा धावा” म्हणून मोठ्याने ओरडली. जीमुतवाहन बाहेरच उभा होता तो तात्काळ धावत आला. अनेक उपायांनी त्याने मलयवतिला सावध केले. व थोड्या वेळाने त्याला ओळख पटली की मगाशी आलेला माणूस तो हिचाच भाऊ आहे. मलयवतीने देखील संगमरमर दगडावरील जीमूतवाहनाच्या प्रेयसीचे चित्र पाहिले. ते चित्र दुसऱ्या कोणाचे नसून तिचेच होते ते पाहून तिला फार आनंद झाला पुढे यथाविधी दोघांचे लग्न झाले.



Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post