वय हे मनाला नसतं. शरीराला वय असतं...
(चिंतन लेखसंग्रह)
आजचा लेखन प्रपंच हा अश्याच एका महत्वाचे विषयावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
त्याच कारण असे की...
अनेकदा असं होत.
काही माणसे ही लवकर थकतात.
अचानक आपल्या जीवनाचं ध्येय कुठ हरवुन जातात.
त्यात आपण ही काही कमी नाही.
हो त्याला अनेक उदाहरणं आहेत हे नक्की.
पण...
आपण आपल्या रोजच्या आयुष्यात असे काही व्यक्तिमत्व अनुभवत असतो.
अशीच एक महान व्यक्तिमत्व हे सर्वज्ञ श्रीचक्रधर प्रभू यांच्या आचार विचाराची शिदोरी घेऊन आपली वाटचाल करत आहे.
ज्यांच्या वयाची नव्वदी पार पडलेली असते.
तरी ही त्यांचा कार्याचा आढावा थांबायचं नावच घेत नाही.
मग ते राजकीदृष्ट्या असो.
सामाजिक दृष्ट्या असो.
अगर.
धार्मिक दृष्ट्या असो.
ते त्यांचे माध्यमातून मिळालेल्या संधीचे सोने करतच असतात.
मी उदाहरणे अनुभवलेली आहेत.
त्यातून एकदोन उदाहरणे देण्याचा प्रयत्न करत आहे...
ते असे.
मी आपल्याला एक उदाहरण सांगतो.
जगाच्या पाठीवर अनेक सांप्रदाय, पंथ उदयास आली आहे.
त्यातच सुमारे आठशे वर्षांपूर्वी महाराष्ट्र राज्यात एक पंथ उदयास आला.
ज्या पंथाचे संस्थापक स्वतः परब्रम्ह परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू आहेत.
त्या परब्रम्ह परमेश्वर अवतार यांचा सध्या संपूर्ण भारत भरच नव्हे तर जगभरात त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न त्याचे अष्ठशताब्दी अवतार दिनाच्या निमित्ताने सुरू आहे.
ज्या परमेश्वर अवतार श्रीचक्रधर प्रभू यांच्या परिभ्रमण काळात फिरत असताना त्यांनी आपल्या आचार विचाराची शिकवण देत असताना.
समाजात तत्कालीन रीतिरिवाज तसेच समाजातील भेदभेद नष्ट होण्यासाठी दीनदलीत समाज बांधवांचे सोबत राहून त्याचे सोबत भोजन करून समाजातील विषमता नष्ट होईल अशी शिकवण समजून सांगत असताना...
समाजातील वर्ण व्यवस्था नामशेष केली.
तसेच समाजातील विषमता तर दूर केलीच... त्यांनी सर्वात महत्वाचे कार्य जर केलं असेल तर... स्त्रियांना असलेलं दुयमत्व झुटकरून टाकले.
पुरुषास जितका अधिकार आहे तितकाच अधिकार हा स्त्री देखील दिला .
आणि...
मनुष्य च नव्हे तर या भूतलावरील सर्व प्राणी मात्रा च्या जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्ततेसाठी बहुमोल असा संदेश त्यांनी त्याच्या सूत्रपाठ व लिळा चरित्र तसेच इतर साडे सहा हजार ग्रंथातून दिला...
त्याच ब्रम्हविद्या शास्त्राची शिदोरी सोबत घेऊन समाजातील जीवाचे भले व्हावे यासाठी सतत शास्त्र चर्चा, पोथी प्रवचनातून ज्ञान कार्य करत असलेल्या...
नाशिक घोटी येथे मुंबई आग्रा हायवे तसेच नुकत्याच नव्याने तयार करण्यात आलेल्या समृध्दी हायवे पासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या...
श्रीकृष्ण ज्ञान मंदिर या नावाने ओळखले जाणारे महानुभाव पंथाचे आश्रमात आपल्या शिष्य परिवारास तसेच पंथातील लहान थोर नामधारक वासनिक तसेच नवनवीन संत तपस्वीनी यांच्या साठी ज्ञान सागर म्हणून ज्याच्या कडे बघितल जाते...
ज्याच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील च नव्हे तर भरात भरातील नामधारक वासनिक वर्गाचा ब्रम्हविद्या शास्त्राचे महत्व समजून घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहे...
बाबांच्या माध्यमातून अनेक ठिकाणी पोथी सोहळे, प्रवचन सोहळे संपन्न झालेली आहे...
असे उपाध्य कुलभूषण त्रिडडीयुक्त प पू प म श्री पुजदेकर बाबा महानुभाव -
ज्यांनी अनेक ग्रंथाचे लेखन केलं...
त्यातलं स्मरण महात्म्य हे त्यांचे खूप महत्वाचे विषयावर मार्गदर्शन करणारे ग्रंथ प्रसिद्ध आहे...
तसेच अनेक धार्मिक ग्रंथांचे लेखन केलं...
त्यांना...
जेंव्हा ९१ संपून ९२ वर्ष लागलं तेंव्हा मला असंच मनात आल की...
बाबांचा आज जन्मदिवस आहे...
पंथातील एक उत्तम लेखक व्याख्याते अभ्यासक सर्वात महत्वाचे म्हणजे ज्ञान भक्ती वैराग्य यांचे उत्तम उदाहरण द्यायचं झालं तर बाबांचे नाव नक्कीच आपल्या सर्वांच्या लक्षात येते...
त्यातूनच मला नेहमीच वेगवेगळ्या मार्गात जाण्याचा भेट देण्याचा, भेट घेण्याचा छंद असल्याने मी बाबांना ही अनेकदा भेटीस जात असतो...
बाबांनी फार मोठं कार्य केलेलं आहे तर आपण त्यांच्या ठिकाणी दंडवत करुन यावं. म्हणून मी घोटीला गेलो...
माझ्या सोबत नेहमी प्रमाणे...
पंथीय वासनिक तथा कुटुंबातील सदस्य असतच...
शंभरीकडे वाटचाल सुरू झालेल्या तथा लागलेल्या बाबांना भेटायला जायचं आहे म्हणून मनाची तयारी करुन गेलो...
बाबा वयोमानानुसार अंथरुणावर असतील...
त्यांना जास्त त्रास होऊ नये याची काळजी म्हणून...
आपण एक दोन मिनिटात नमस्कार करावा, बरं वाटतंय ना, काळजी घ्या वगैरे सांगावं आणि परतावं अशा विचाराने गेलो होतो...
पण...
मी ज्यावेळेला गेलो त्या वेळेला बघतो तर ते तिथे त्यांच्या आश्रमातील देव घरातील एका उत्तर कोपऱ्यात बाबांचे याही वयात पंथीय अभ्यासकांसाठी उपयुक्त ठरेल अश्या नाविन्यपूर्ण विषयावर
लेखनाचे कामात दंग होते...
त्या नवीन ग्रंथाची चार सहा महिन्यात छपाई करून वाचकांसाठी उपलब्ध करून देण्यात बाबा व्यस्त असल्याचे दिसून आले...
त्या ग्रंथाचे निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या विविध प्रमाण ग्रंथाचे टिपण तपासणीत व्यस्त हे लक्षात आले...
तुमच्यापैकी जे कोणी लेखक असतील त्यांना प्रुफं तपासणं म्हणजे काय आणि तीसुध्दा संस्कृतची म्हणजे काय ते कळेल. ते काळजीपूर्वक तपासत बसले होते...
मी दंडवत वगैरे केला. मला म्हणाले "मी वाचलं आहे तुमचं साहित्य".
मी घाबरलोच एकदम. "असलं काही लिहिण्यापेक्षा बरं लिहा" अस ओरडतात की काय असं मला वाटलं...
पण...
आजच्या विज्ञानयुगात वावरताना बाबा त्यातही स्वतःस अपूर्ण ठेवलेलं नसल्याचे त्यांच्या माझ्या सोबत केलेल्या चर्चेतून लक्षात आले...
कारण...
मी जे काही लिहीत असतो...
ते सोशीयल मिडियाचे अर्थातच व्हॉट्सप, टेलिग्राम फेसबुक, तसेच आता नव्याने सुरू झालेलं कुटुंब ॲप ...
मला आश्चर्य वाटलं की याही वयात अर्थातच नव्वदी पार करून शंभरी ओलांडन्यास निघालेले बाबांनी या विज्ञान तंत्रज्ञान युगात देखील आपल्या रोजच्या आयुष्यात स्वतःस कमी ठेवले नसेल याची मला कल्पना नव्हती...
बाबा देखील माझं रोजच्या लेखनातून केलेला अल्पसा प्रयत्न तथा साहित्य वाचत असतील असं मला कधीही वाटलं नव्हतं...
ते वाचत असल्यामुळे त्यांना विनोदबुध्दी आहे - म्हणजे तारुण्य आहे हेही माझ्या ध्यानात आलं.
त्याभेटी चे दरम्यान...
ते म्हणाले "आता काय आहे, हे नवीन पुस्तकांची लेखणी सुरू आहे ती जुळवाजुळव तथा प्रुफं करेक्ट करत आहे...
हे काम एकदा झालं की पंथीय असो इतरांना ही पंथातील अनेक महत्वाचे सुंदर मौलिक साहित्य हे आपल्या तरुण पोरांना माहित नाहीत ते मी निवडून काढणार आहे आणि या निवडक विषयावर एक ग्रंथ तयार करणार आहे.
त्यात पुढली एखादे वर्ष जाईल"...
९२ व्या वर्षी पुढल्या काही वर्षांचा कार्यक्रम त्यांच्या हातात होता...
त्यात मग मला पुणे भेटी दरम्यान भेटलेल्या पू. त. माणिक मावशी, त्रिदडीयुक्त आचार्य म श्री चांदोरी निवासी मोठे बाबा असतील...
किंवा...
सध्याचं ज्यांची हिंगोली जिल्हा येथील कुरुंदा येथे आयोजित प्रवचन सोहळ्यात पोथीचे माध्यमातून ज्ञानसत्र सुरू आहे असे म श्री दुतोंडे बाबा असतील...
अशी अनेक मोठी नाव आहेत...
पुष्कळ वेळेला आपण म्हातारे अशासाठी होतो की तुम्ही जगताय कशासाठी या एका प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता येत नाही. फक्त आर्थिक उत्पादनासाठी, महिना पगारासाठी हे उत्तर काही आपलं आपल्यालाच समाधान देत नाही. कशासाठी जगतो त्याला एक उदात्त अशा प्रकारचं काहीतरी प्रयोजन जीवनाला लागतं...
माणसानं ह्याच गोष्टी समजून घेण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे...
माणसाचे मन हे जर स्थिर असेल...
तर...
वय कितीही वाढले तरी माणूस शरीराने थकतो मनाने नाही...
त्यासाठी आपल्याला तत्वज्ञानाची ओळख झाली तरच हे शक्य होणार आहे...
कारण...
जीवनाचे रहस्य उलगडण्यासाठी तत्वज्ञान अंगिकार करण्याची गरज आहे...
ज्यावेळी तुम्ही आम्ही त्या तत्वज्ञानाचे माध्यमातून मिळालेली शिकवण अंगिकारली असेल...
त्यावेळी आपण आपल्या जीवाचे भले व्हावे यासाठी श्वासात श्वास असे पर्यंत नित्य नामस्मरण करत असेल...
तसेच ...
त्या प्रभूच्या वचनाची शिदोरी घेऊन आपली वाटचाल सुरू झाली असेल...
त्यावेळी आपण आपल्या वयाने नक्कीच वर्धक्याकडे जाऊ पण मनाने कधीच म्हातारे किंवा खचून किंवा थकून जाणार नाही हे मात्र नक्की...
म्हणून...
जीवन आनंदमय सुखमय होण्यासाठी स्वतःमध्ये बदल करून आपला प्रवास हा त्या कैवल्य गडाचे दिशेने सुरू राहील यासाठी प्रयत्न केला तर ते शक्य होणार आहे...
त्यासाठी आपल्याला तत्वज्ञानाची ओळख झाली तरच त्यातून नवीन काही तरी वेगळे अनुभवण्यास मिळणार आहे हे लक्षात येते...
म्हणून हे लक्षात ठेवा... वय हे मनाला नसतं. शरीराला वय असतं असं मला वाटत...
आदरणीय बाबा हे येत्या १५ जानेवारी रोजी ९२ वर्षात पदार्पण करत आहे...
बाबाच्या वयाचा विचार करता आपल्या लक्षात येईल हे वय हे फक्त शरीराला च असते मनाला नाही...
कारण...
तरुणाला लाजवेल अशी शरीरयष्टी आदरणीय बाबाजी यांना लाभलेली आहे..
आदरणीय बाबांच्या माध्यमातून मिळालेल्या मौलिक विचार आत्मसात करण्याची संधी मिळत रहावी हीच प्रभू चरणी प्रार्थना दंडवत...
दंडवत माझा देव श्रीचक्रधर...sd
आपलाच... प से सुरेश डोळसे नाशिक
संस्थापक अध्यक्ष श्री प्रतिष्ठान नाशिक
मो नंबर ९४२२७६२९१४