"वंदे श्री चक्रधरम्"
संस्कृत सुभाषित रसग्रहण
"परोपकारार्थमिदं शरीरम्"
या संसारातील बहुतांशी प्रत्येक चेतन वस्तू आपआपल्या परीने योगदान देतांना दिसत आहे, व चेतन प्राण्या पैकी गायी असेल, किंवा वृक्षापैकी काही वृक्ष फल देणारे असतील, तसेच पाणी देणाऱ्या स्त्रोत मधे नद्या असतील, अशा विविध प्रकारच्या चेतन वस्तू योगदान देतांना दिसत आहे.
पशुप्राण्यापैकी गायीला लौकिक क्षेत्रात अतिशय पवित्र मानलेले आहे. अशी पवित्र असलेली गायी स्वतः कधी दूध पितांना दिसत नाही, गायी सदैव दुसऱ्यांना दूध देताना दिसत आहे.
गायीचे दूध बहुतांशी सरपंच, आमदार, खासदार, मंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती, कुलपती, अध्यक्ष, उपाध्यक्ष, तथा पुजारी, पुढारी, सर, मास्तर, तिकिट मास्तर, डाॕक्टर पितात, पोलीस अधिकारी पितात. वरिष्ठ अधिकारी लोक पितात. फिटर, वेटर, तार्किक, कलर्क पितात. विशेष म्हणजे या पृथ्वीवरील संतमंडळीमधे अन्यसंत, महंत, आचार्य, प्राचार्य, देखील पितात,
विशेष सांगायचे म्हणजे पृथ्वीवर अवतरलेले अवतार देखील दूध पितात. मग परमेश्वर अवतार श्रीकृष्ण महाराज असो! किंवा देवता अवतार राम असो! आदी सर्व अवतार देखील गायीचे दूध पितात. गायीचे दूध बहुतांशी लहान मुला पासून परमेश्वर अवतारा पर्यंत सर्वच पितांना दिसत आहे.
वृक्षाची फळे बहुतांशी सर्वच खातात, नारळाचे खोबरे, सफरचंद, मोसंबी, संत्री, चिंच, द्राक्षे, फणस, सफरचंद, बोरे, मोसंबी, सिताफळे, विशेष म्हणजे अंबा बहुतांशी सर्वच खातांना दिसतात, पण कोणताच वृक्ष स्वताःची फळे स्वतः खातांना दिसत नाही, वृक्ष सतत दुसऱ्यांना फळे देतात, हे वृक्षांचे योगदान कोणीच नाकारू शकत नाही,
विश्वातील नद्यांकडे पाहिले, तर या विश्वातील सर्वच नद्या दुसऱ्याला पाणी पिण्यासाठी देतात, बैल, गायी, म्हैस, हेले, उंट, घोडे, गाढव, डूकरे, लांडगे, कुत्रे , कोल्हे, वाघ, सिंह, सरपटणारे प्राणी साप, पाली, सरडे, कावळे, घुबड, मोर,आदि शाकाहारी तथा मांसाहारी प्राणी पितात.
विशेष म्हणजे साधूसंतमंडळी देखील नदीचे निर्मळ पाणी पितात, "नद्या दुसऱ्यांना पाणी पाजतात, पण स्वतः कधीच पाणी पित नाही. नद्या दुसऱ्यांसाठी पाणी देतात, विशेष म्हणजे या विश्वातील प्राकृतिक संपदा बहुतांशी दुसऱ्याच्या कल्याणा साठी असलेली पाहावयास मिळते.
तद्वद माणसाने शरीरराचा उपयोग परोपकारासाठी केला पाहिजे, कारण माणसाला हे शरीर परोकार करण्यासाठी मिळालेले आहे. पण आजचा माणूस परोपकारा पासून फार दूर चाललेला दिसत आहे,दुसऱ्याच्या मदतीसाठी निष्काम भावनेने धावणारे क्वचितच दिसत आहे, श्रम करण्याची मानसिकता बहुतांशी लोकांन मधी राहिलेली दिसत नाही.
बहुतांशी सर्वच लोक शेठच्या भुमीकेत वावरताना दिसत आहे. क्वचितच लोक आपले शरीर परोपकारार्थ झिझवतांना दिसत आहे.असे लोक समाजात निरोगी असलेले पाहावयास मिळत आहे,हे शरीर माणसाला मिळाले आहे,ते फक्त खाऊन पसरण्यासाठी एवं लोळण्यासाठी मिळाले नाही.
संत मंडळीनी या शरीराचा उपयोग तिर्थ दर्शन तथा ग्रंथ, नवीन मंदीर निर्मिती साठी, कठोर तप साधनेसाठी, समाजाला प्रबोधन करण्यासाठी केला. समाजाला जागृत करण्यासाठी केला. काहींनी या शरीराचा उपयोग देशाची सेवा करण्यासाठी केला, काहींनी या शरीराचा उपयोग दुसऱ्यांना ज्ञान देण्यासाठी केला, काहींनी या शरीराचा उपयोग समाजाची सेवा करण्यासाठी केला.
महत्त्वाचे सांगायचे असेकी, या शरीराचा उपयोग चोऱ्या माऱ्या तथा दुसऱ्यांना लूबाडणे, दरोडे घालणे, दुसऱ्याची हत्या करणे, असे वाईट कृत्य तथा सप्तव्यसन करण्यासाठी मिळालेला नाही, हे प्रत्येक माणसाने समजून घेतले पाहिजे, जितके होईल तितके शरीर समाजाच्या सेवेसाठी खर्च केले पाहिजे. हे मात्र तितकेच शाश्वत खरे आहे.
असो दंडवत!
महंत श्री जयराज शास्त्री [साळवाडी]