आत्मनिरिक्षण : आत्मपरिक्षण : आत्म परिवर्तन !

आत्मनिरिक्षण : आत्मपरिक्षण : आत्म परिवर्तन !

आत्मनिरिक्षण : आत्मपरिक्षण : आत्म परिवर्तन!...

   आपल्या मनोभूमिकेमध्ये चांगल्या वाईट भाव दशा उपजुन आपल्यातून जसे विचार बाहेर प्रकटतील त्या प्रकारचीच आपली व्यक्तिमत्त्वाची संस्कारशीलता निर्माण होते आणि वर्तमानातच आपल्याला त्या प्रकारचे अनुभव येऊ लागतात आपण तसेच आहोत असे आपल्याला प्रत्यय येतात आणि ते एका क्षणातच नाही तर प्रतीक्षणात ते धरून ठेवल्या कारणामुळे त्यांची वाढ होते 

आणि ते आपणच आपल्याला दिलेले जीवन आपल्याला पुढे चालून उपलब्ध होत असते म्हणून आपण कुठलेही वितर्क विपर्यास न बाधू देता विपरीत विचार भाव न बाळगता अभिव्यक्त न करता जागृत राहुन त्याच्या उलट सुतर्क सुपर्यास करित रहावे सुपरीत विचार भाव बाळगून त्या अनुषंगाने जीवन जगण्यासाठी कार्यतत्पर राहावे ही आपणच आपल्याशी केलेली मैत्री असते.

या जगात आपणच आपले मित्र आहोत आणि आपणच आपली शत्रू अन्यथा बाहेर आपला कोणीही शत्रु वा मित्र नाही आपण ज्या दृष्टीने दुसऱ्याकडे पाहणार त्या दृष्टीनेच आपल्याला दुसरा आपला शत्रू व मित्र दिसू लागतो जशी दृष्टी तशीच आपली सृष्टी होऊन बसते दुसरा कोण काय याचे विश्लेषण आणि धारणा भाव करण्यापेक्षा आपण कसे काय असावे याविषयीची वर्तमान आत्मजागृती ही चांगले विचार आणि चांगले भाव बाळगून आणि त्यासाठी त्या पद्धतीनेच जीवन जगण्यासाठी कार्यतत्पर राहून आपणच आपली प्रेमपूर्ण आनंदमय सृष्टी निर्माण करायची असते

देवाचा जो दयाळू मायाळू पणा आहे तो सृष्टी व्यवस्थापनाच्या पद्धतीत जीवांवर त्यांच्या सद्गुणांच्याद्वारा सद्विचार सद्भावना विकसित केल्यामुळे वर्षत असतो आणि ही देवाची सृष्टी संरचनेत न्याय व्यवस्था आहे, ती सुद्धा वस्तू पदार्थांच्या स्वभाव धर्मा नुसार कार्यरूप असते त्यामुळे आपल्याला वाटते की देव कठोर आणि निष्ठुर नाही तो जसा न्यायाळु आहे तसा दयाळू सुद्धा आहे परंतु जीवाने स्वतःसमोर स्वतःच्या जीवनासमोर समग्र सृष्टी समोर आणि देवासमोर... सतत नमून झुकून राहुन मरून जाऊन त्याच्या समर्पणात राहुन दयेला पात्र व्हायला हवे

हे जग एक प्रती ध्वनी आहे आपण इको पॉइंटवर गेल्यानंतर तो एक आवाज देतो अनेक पटींनी आपल्यापर्यंत तो गुंजाराव करून परतत येत असतो....आपण जे पुढील विषयी, कुणाविषयीही दूर्विचार दूर्भाव बाळगतो आणि अवहेलना करतो.... ते आपण कुणाविषयी करत नाही ते आपण आपला परिचय देतो कि आपणच तसे आहोत आपणच आपल्या आत आपले आपणच ते भाव वाढवत असतो,

 कारण एकदा बाळगलेले भाव परत पुढच्या क्षणाला आणि अनेक वेळेला बेहोषीत परत जागृत होतात ते अवचेतन मनात संस्कार निर्माण होऊन बसतात तेच आपले व्यक्तिमत्त्व होत राहते आणि ते अवमूल्यन पुढीलाच होत नसत तर आपल्याच प्रेमपूर्वक सद्भावनांचं अवमूल्यन होत असतं आणि त्याचे तात्काळ वि परिणाम त्याच वेळेला आपल्याला अनुभवाला येत असतात आपल्यातील प्रसन्नता विनष्ट होऊन जात असते आणि आपल्यामध्ये अशांती उदवेग तणाव भरत असतो

सर्वात प्रथम अत्यंत महत्त्वाचे आहे आधी आपण आपल्या स्वतःवरच प्रेम करायला हव आपण जर प्रेम पूर्ण असलो तर आपल्यातून सर्व विश्वाच्या प्रति प्रेमभाव अभिव्यक्त होतात आणि ते विश्वात्मक असलेल्या परमेश्वरापर्यंत पोहोचतात आणि ते विश्वाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत परत येऊन आपल्यात ते वृध्दिगत होत असतात

आणि परमेश्वराची सृष्टी व्यवस्था तटस्थ आहे परमेश्वर आपण जर दूर्विचार दूर्भाव अशांती उद्वेग क्लेश आपल्या बाहेर आपल्या आत बाळगून फेकत राहिलो तर ते अनेक पटीने आपल्यापर्यंत परत पुन्हा येत राहते यावर दुसरा काहीही पर्याय नाही. पर्याय तो आपण स्वतः आहोत आपण आत्मजागृत राहून आपण प्रत्येक क्षणाला कोणत्या प्रकारचे विचार भाव बाळगायचे? 

चांगले बाळगायचे का वाईट बाळगायचे आणि ते आपल्यामध्ये अधिक विकसित करायचे आपल्यातून ते प्रसारित करून अनेक पटींनी आणखी ते विश्वाच्या माध्यमातून परमेश्वराकडून जास्त प्रमाणामध्ये मिळवून घ्यायचे हे सर्व आपल्या स्वतःच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर अवलंबून आहे याच्यात कुणाचा काहीही हात नाही. आपण स्वतः स्वतःचे आपण शत्रू असतो स्वतःअवलंबून आहे याच्यात कुणाचा काहीही हात नाही स्वतः स्वतःचे आपण शत्रू असतो स्वतःचे आपण मित्र असतो अन्यथा या जगात दुसरा आपला कोणीही शत्रू व मित्र नाही

ज्याने आपले मन बुद्धी व इंद्रिय जिंकले आणि जो आत्मजागृत राहून स्वाधीन प्रेमपूर्ण प्रसन्नतेत सद्विचार सद्भाव बाळगून त्या प्रकारचीच भाव अभिव्यक्ती जीवन जगताना आपल्या सभोवावर विश्वामध्ये करीत राहिला तो स्वतः स्वतःचा मित्र असतो आणि ज्याच्या इंद्रियांच्या द्वारा मन बाहेरच्या व्यक्ती वस्तू परिस्थिती घटना प्रसंगांमध्ये आसक्त मोहित होऊन का विरोधात जाऊन उद्वेगात पडते अपेक्षा भंगुन उपेक्षित होते आणि बुद्धी भ्रष्ट होऊन दुर्विचार दुर्भाव बाळगून त्याचा विकास आपण आपल्यात करून आपल्या आतुन तेच आपण बाहेर प्रसारित करतो ते आपल्यापर्यंत विश्व हे प्रतिध्वनी असल्या कारणामुळे तुम्ही जे देणार तेच ईश्वर तुम्हाला परत देणार 

त्या पद्धतीने अनेक पटींनी तुम्हाला मिळत असते हे आपले स्वतःचे प्रत्यक्ष प्रतीतिस आलेले अनुभव असतात याला कोणाला काहीही कोणीही समजून देण्याची काहि गरज नाही ते आपल्या आपण अनुभाने जागृत राहु स्वत:ला सावरावे  हे समजून जो जागृत राहुन स्वत:शी मित्रवत जगतो तो स्वतःचा मित्र आणि न समजता जगला तो स्वत:चा शत्रु आणि समजून सुद्धा नाही स्वतःशी मित्रवत जगला नाहि तो स्वतःचा महामूर्खपणा करणारा महानशत्रू होतो असतो!

लेखक अज्ञात

लेखकाचे नाव कळल्यास कमेंट करा 

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post