महाभारतात 'राधा ' विषयी उल्लेख का आढळत नाही ?

महाभारतात 'राधा ' विषयी उल्लेख का आढळत नाही ?

 राधा हे काल्पनिक पात्र श्रीकृष्ण चरित्रात कसे आले?

*प्रश्न : महाभारतात किंवा भागवतात 'राधा' विषयी उल्लेख का आढळत नाही ?*

भगवान श्रीकृष्ण आणि श्रीकृष्णाचे जीवन समजून घेण्यासाठी तीन महत्वाचे ग्रंथ आहेत.

१) महाभारत
२) हरिवंश
३) श्रीमद्भागवत

कौरवं पांडव हे महाभारताचे मुख्य नायक आहेत, महाभारत ही मुळात त्यांची कहाणी आहे. असें असले तरी श्रीकृष्णा शिवाय महाभारत अपूर्णचं वाटते. श्रीकृष्ण प्रथम प्रवेश करतो तो द्रौपदी स्वयंवराच्या प्रसंगी. त्यानंतर श्रीकृष्ण महाभारतात ठाई ठाई आहे. पण त्याअगोदर श्रीकृष्ण चरित्र महाभारतात नाही. श्रीकृष्ण पूर्व चरित्र समजून घेण्यासाठी हरिवंश वं भागवत हे ग्रंथ अभ्यासालां लागतात. पण या चार ही ग्रंथातं राधा यां पात्राचं वर्णन किंवा नाव ही येत नाही .

राधा हे परिपूर्ण भक्तीप्रेमाचं एक मोहक रूप आहे, रूपक आहे. श्रीकृष्ण एक व्यक्ति आहे तर राधा एक प्रवृत्ती आहे. राधा म्हणजेच प्रेमाची परिपूर्ण धारा. धारातूनचं आली राधा. कृष्ण म्हणायच्या आधीच राधा येते,…राधाकृष्ण…इतकी ती एकरूप झाली आहे. जयदेव नावाचे एक महाकवी होऊन गेले त्यांनी "गीतगोविंद" नावाचे महाकाव्य निर्माण केले, त्यात राधा हे एक कल्पित पात्र आहे.

महाभारत या ग्रंथातील एकूण एक लाख श्लोकांपैकी साधारण वीस हजार श्लोकांत श्रीकृष्णाचा उल्लेख आहे. मात्र श्रीकृष्णचरित्राशी अविभाज्य अशी 'राधा' या व्यक्तिमत्त्वाचा एकाही श्लोकात उल्लेख नाही. राधा खरोखरच अस्तित्वात होती की, श्रीकृष्णाच्या चरित्राच्या परिपूर्णतेसाठी ग्रंथकारांनी 'राधा' निर्माण केली ? या प्रश्नाचा शोध घेतला असता 'गीत गोविंद' या महाकाव्याद्वारे प्रश्नाचे उत्तर सापडले. 

सातव्या शतकात भारताच्या पूर्व उत्तर खंडात (सध्याचे ओरिसा/बिहार प्रांत) 'जयदेव' नावाचे महाकवी होऊन गेले. त्यांनी 'गीत गोविंद' नावाचे सर्वांगसुंदर महाकाव्य निर्माण केले. जयदेवांनी 'प्रेम' ही संकल्पना युगंधर श्रीकृष्णाच्या अभिव्यक्तित कशी एकटवली आहे. ते रेखाटताना विलक्षण कल्पकतेनं व अभिनव पद्धतीनं सांगण्याचा यशस्वी प्रयोग केलेला दिसून येतो. श्रीकृष्णासारखा तत्त्वज्ञ आणि त्याच्याठायी रुजलेल्या प्रेमाचे विविध विभ्रम यांचा सुंदर मिलाप म्हणजे जयदेवांचे 'गीत गोविंद' होय. 

'गीत गोविंद' मध्ये साकारलेली राधा ही सौंदर्यवती आहे. श्रृंगारकलेतील आस्वादक आहे. तितकीच एक स्त्री म्हणून सौजन्यमूर्तिही आहे. ती श्रीकृष्णाची केवळ प्रेयसीच नाही तर पालकही आहे. त्याला सांभाळणारी, जपणारी आहे. (असाही उल्लेख सापडतो की राधा श्रीकृष्णापेक्षा वयाने मोठी होती, तसेच विवाहितही होती.) अमेय (अहिमही) हे तिचे पती होते.

सर्वात रोमांचकारी मिथक. महाभारत, हरिवंश, भागवत आणि विष्णू पुराण या कशातच राधेचा उल्लेख नाही. प. वि. वर्तक म्हणतात, 'राधा ही गीतगोविंदकार जयदेवाची निर्मिती आहे. राधा हे कल्पित पात्र आहे, हे कुणालाही खरं वाटणार नाही इतकी ती जनमानसात रुजली आहे. राधेशिवाय गोकुळीच्या श्रीकृष्णाचा कुणी विचारही करू शकणार नाही. 

आपण समाजात वावरताना, जगताना समाजाचे काही नियम, काही बंधने पाळावी लागतात. काही वेळा काही जणांना ती इतकी काचू लागतात, पण ती तोडून मनमुक्त जगण्याचे धैर्य त्यांच्याकडे नसते. या साऱ्या असोशीचे राधा हे प्रतीक आहे. निर्मळ, अशारीरी, विकाररहित अशी संबोधने वापरत त्या असोशीचे, प्रेमाचे उदात्तीकरण केले जाते.'

देवाला राधा प्रिय आहे म्हणजे भक्ती प्रिय आहे. राधा शब्द आराधना म्हणजेच भक्तीवाचक संस्कृत भाषेत आलेला आहे. तात्पर्य राधा नावाची कुणी स्त्री होऊन गेली हा समज चुकीचा आहे. राधा हा गीतगोविंदकारांचा कल्पनाविलास आहे. म्हणून महानुभाव पंथिय काव्यातही कुठे राधा नावाचे पात्र आढळत नाही. 

मुळ महाभारतात राधा नावाची कुठलीही स्त्री वा गोपी अस्तित्वात नाही. १२ व्या शतकात ओडीसा राज्यात जन्मलेला जयदेव नावाच्या कवीने गीतगोविंद हे शृंगारकाव्य लिहीले. शृंगारासाठी किमान एक तरी पुरूष व स्त्री पात्र लागते. त्यामुळे कवींनी एक कल्पनेतील पात्र राधा हिला जन्म दिला. हे कविराज बंगाल मधील अंतिम नरेश लक्ष्मणसेन यांच्या दरबारी राजकवी होते.

खरं पाहिलं तर कृष्णाने १२ व्या वर्षी वृंदावन मथुरेला जाण्यासाठी सोडले. गीतगोंविदातील राधा तरूण यौवन होती. म्हणजे ती किमान २० ते २२, तिशी पर्यंतही असू शकते, १२ वर्षाचा किंवा त्याहून लहान मुलगा व पंचवीस तिशी तील राधा यांचा सुरत प्रणय कसा रंगू शकतो हे त्या महान कवीला माहीती.

महाभारतात असं कुठलंही पात्र अस्तित्वात नाही. 


श्रीकृष्ण भगवंतांनी आठ मुख्य राण्या आणि 16100 इतर राण्या होत्या. त्याच्या आठ राण्यांची नावे पुढीलप्रमाणे – रुक्मिणी , सत्यभामा, जांबवती, सत्य, कालिंदी, लक्ष्मणा, मित्रविंदा आणि भद्रा. भगवान श्रीकृष्णाने भौमासुराच्या (नरकासुराच्या) बंदीगृहात बंदिस्त असलेल्या १६१०० राजकन्यांना मुक्त केले तेव्हा त्या सर्वांना वाचवण्यासाठी त्यांनी त्या कन्यांचे पाणीग्रहण केले. एकूण श्रीकृष्णांना सोळा हजार एकशे आठ पत्नी होत्या. प्रत्येक पत्नीपासून त्याला दहा मुलगे झाले. अशा प्रकारे त्याच्या सर्व पुत्रांची संख्या एक लाख एकसष्ट हजार ऐंशी झाली. त्याच्या सर्व मुलांची नावे सांगणे शक्य नाही, परंतु त्याच्या आठ मुख्य राण्यांच्या मुलांची नावे खाली दिली आहेत. श्रीकृष्ण जी त्यांच्या राण्यांसह

१. रुक्मिणी: प्रधुम्ना, चारुदेष्णा, सुदेष्णा, चारुदेह, सुचारु, चारुगुप्त, भद्रचारु, चारुचंद्र, विचारू आणि चारू.

2. सत्यभामा: भानू, सुभानू, स्वरभानू, प्रभानु, भानुमान, चंद्रभानू, वृहदभानू, अतिभानू, श्रीभानू आणि प्रतिभानु.

3. जांबवंती: सांब, सुमित्रा, पुरुजित, शतजित, सहस्त्रजित, विजय, चित्रकेतू, वसुमन, द्रविड आणि क्रतु.

4. सत्या : वीर, चंद्र, अश्वसेन, चित्रगु, वागेना, वृष, आंबा, शंकू, वसु आणि कुंती.

5. कालिंदी: श्रुत, कवी, वृष, वीर, सुबाहू, भद्रा, शांती, दर्श, पूर्णमास आणि सोमक.

6. लक्ष्मणा: प्रघोष, गात्रवान, सिंह, बाल, प्रबल, उर्ध्वाग, महाशक्ती, साहा, ओज आणि अपराजित.

7. मित्रविंदा: वृक, हर्ष, अनिल, गृहधर, वर्धन, अन्नद, महंस, पावन, वहनी आणि शुधि.

8. भद्रा: संग्रामजित, वृहतसेन, शूरा, प्रहरण, अरिजित, जय, सुभद्रा, वाम, आयु आणि सत्यक.


Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post