विडावसर एक धार्मिक, सामाजिक संवेदनशील भावनेचे दर्शन !
विडावसर म्हटले की, आपल्या डोळ्या समोर मंदिरांमध्ये किंवा महास्थानाच्या ठिकाणी, मग ते पांचाळेश्वर असो! वा महास्थान फलटण, माहूर डोमेग्राम, ऋद्धिपूर, पैठण, बेलापूर, हिवरळी, असो! इत्यादी स्थाने आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात.
विडावसराचे स्वरूप ते अशा प्रकारचे असते. विडावसरामधे नारळ, पाने, फुले, सुपारी, बदम, खारीक लवंग, वेलची, फळांमधे सफरचंद, केळी, पपई, पेरू, मोसंबी , संत्री, द्राक्षे , आदि ऐपती प्रमाणे, जास्तच जास्त पंन्नास, किंवा दहा पाच, हे द्रव्य ठेवून, स्थानाच्या ठिकाणी विडा वाहात असतात. विड्यामधे आलेले फळे, त्या पैकी काही फळे प्रसाद" म्हणून विडा" वाहाणाऱ्या भक्ताला देतात.
कदाचित मंदिरात लांबून आलेला भक्त भूकेला असेल, तर मंदिरात मिळालेल्या फळ प्रसादाने पोटाची भूक कमी होऊन, आस्थेची किंवा श्रद्धेची भूक अधीक वाढलेली असते, भाविकाच्या श्रद्धेची भूक वाढविण्याचे सामर्थ्य विडावसरामधे आहे.
विडा हि भावरूप क्रिया आहे, भावानुसार स्थानापती क्रियेचा स्विकार करत असतो. हे झाले धार्मिक भावरूप क्रियेचे दर्शन! विडावसराच्या बाबातीत पूर्वजनांचा दृष्टिकोन अतिशय विशाल, उदार, उदात्त व संवेदनाशील होता.हे मात्र तितकेच खरे आहे. हे मात्र कोणताही विवेकशील व्यक्ती नाकारु शकत नाही.
तसेच मला जे द्रव्य प्राप्त झालेले आहे. ते देखील देवानेच दिलेले आहे. त्यातील द्रव्य मला परमेश्वराला आर्पण करायचे आहे. असा परमेश्वरा विषयी आसलेला श्रेष्ठ भाव प्रत्येक भाविकांने जोपसलेला असतो, अशा उदार भावाने भाविक माझ्या हातून भरपूर दानधर्म घडू दे, असा भाव धरून , विडावसर स्थानावर तथा मंदिरात ठेवतांना आढळतात.
अलीकडच्या काळात काही तथा कथीत लोकांची दृष्टी या बाबतीत वेगळीच पाहाण्याला मिळते. यावर जास्त चर्चा न केलेली बरी आहे, विडावसरामधे धार्मिक, सामाजिक संवेदनशीलतेची भावना कशी दडलेली आहे. हे शोधणे अतिशय महत्त्वाचे आहे
पूर्वीच्या काळी गावपातळीवर पंथाच्या लोकांच्या ठिकाणी ऊजळता राहावी, तथा धर्मशास्त्राची ओळख होआवी, म्हणून मंदिराची निर्मिती केलेले पाहावयास मिळते, पूढेचालून मंदिरात एखादा निस्पृह, विरक्त, विद्वान साधकाची नियुक्ती करून, त्या साधकाच्या माध्यमातून मंदिरात येणाऱ्या अनेक भाविकांना ज्ञानार्जनाचा लाभ होत असे, मग अशा साधूच्या जवळ असलेला परिवार तो देखील त्या मंदिराची पूजार्चा करून परिसरातील तथा गावातील लोकांना चांगले धार्मिक संस्कार, देऊन धर्माची सेवा तथा जागृती करत असत.
अशा मंदिरातील साधूसंताला परिवार चालवंताना आर्थिक चणचण भासू नाही, म्हणून पूर्वीचे गावातील सूजान भावीक लोक मंदिरातील विषेशाला विडा वाहातांना, काही द्रव्ये त्यावर ठेवायचे, कारण हातात द्रव्य दिले, तर ते साधक द्रव्य साधक घेण्याचे नाकारायचे, कारण ते आपली निस्पृह, व निरपेक्ष भाव ठेवण्याची काळजी घेत असे.
पण धर्माची जाणीव असलेले सूजान भावीक आपल्याला काहीतरी क्रिया घडावी, आणि परमार्ग चालावा, म्हणून विड्यावर द्रव्य ठेवून विडा" वाहात असत. देवदत्त मिळालेले, ते द्रव्य म्हणून घेत. त्या जेमतेम द्रव्यातून पूरवठा घेऊन आपला गूजारा करायचे, व आपला देवधर्म नित्यनेमाने करायचे.
मग त्यांना लागणारी पासवडी, आदी वस्तू मिळणाऱ्या द्रव्यातून काटकसर करून आपली जीवन यात्रा निरपेक्षेतून चालावेत. व पंथ प्रचाराची धूरा व्यवस्थित संभाळत. त्या द्रव्यातून मंदीरातील "दिवाबत्ती" उटी, अगरबत्ती, आदि खर्च चालवीत' असा पूर्वजांचा विडा समर्पित करण्या मागचा भाव संवेदनशील होता, व उदात्त विवेकशील दृष्टिकोन होता.
तीच परंपरा अलिकडच्या काळातील भावीक मंडळींनी देखील चालू ठेवलेली आहे. आपण कमावलेले "धन" त्या धनातून काही भाग दानधर्मात खर्च झाला पाहिजे. अशा उदात्त विचाराचे विवेकशील मंडळी आजही समाजात आहे.अशा लोकांना धार्मिक, पंथाच्या सामाजिक संवेदनशीलतेची जाणीव आहे.म्हणून पंथाचे कार्य चालू आहे,
तथाकथित काही लोक विनाकारण दहावीस रुपायावर चर्चा करतांना आढळतात. कारण त्यांना विवेकशील, तथा व्यापक दृष्टी लाभलेली नाही. अशी म्हणावी लागेल. म्हणून पंथाची काही विरासत अर्थावर चालत असते. जेथे अर्थाची गरज आहे. तेथे अर्थ आपण निश्चित समर्पीत केला पाहिजे.
गावात एखाद्या मंदिराचे बांधकाम असेल, किंवा मंदिराची डागडूजी असेल, तेथे अर्थाची गरज आहे. किंवा ग्रंथ प्रकाशण करण्यासाठी धनाची गरज आहे, मोठा पोथी प्रवचणाचा अवसर आहे, तेथे अन्नदानाची अवश्यकता आहे. साधूसंताना निवार्याची गरज आहे, जेथे तरूण साधक बहूत संख्येने विद्या अध्ययन करत आहे, अशा ठिकाणी, पंथातील प्रसाद बांधणी आभिषेक आहे, कोठे स्थानाचे बांधकाम असेल, कोठे एखादा साधक आजारी असेल, किंवा काळानुरूप जी जी अवश्यकता भासेल, अशा वेळी भाविकाने उदार मनाने द्रव्यपूर्तता केली पाहिजे. आणि ते करणे आपले आद्य कर्तव्य आहे.कारण धनाचे स्त्रोत भाविकाकडे असतात, उदार मानाने धन धार्मिक कार्यास लावले पाहिजे, तर महान लाभच होणार आहे, त्या बरोबर पंथाची पारमार्थीक सामाजिक संपदा टिकून राहाणार आहे.
अशी जाणीव ठेवून जो व्यक्ती कार्य करतो, तो परमार्थाच्या बाबतीत संवेदनशील आहे. दैवराहाटीतील कोणतीच क्रीया वाया जात नसते. हे मात्र तितकेच खरे आहे. विडावसर हा पंथाची उत्तम सेवा करण्या साठी वाहात असतात, म्हणून विडा अवसराला धार्मिक, व सामाजिक व्यापक आयाम आहे. हे मात्र तितकेच खरे आहे.
असो दंडवत!
महंत श्री जयराजबाबा शास्त्री तळेगावकर [साळवाडी]