प्रेरणादायक सकारात्मक विचार - नेहमी सकारात्मक रहा - Positive thinking
तुमचे सकारात्मक राहणे का आवश्यक आहे?
सकाळी वृत्तपत्रे वाचा किंवा दिवसभर चालणाऱ्या न्यूज चॅनलकडे नजर टाका. नकारात्मक आणि भीतिदायक बातम्यांनी मनावर परिणाम होतो. अशावेळी स्वतःला सकारात्मक राखणे का आवश्यक आहे ?
नकारात्मकतेला मर्यादित ठेवा : असे म्हणणे सोपे आहे; पण करणे अवघड. प्रसिद्ध लेखक आणि इन्फ्लुएंसर नॉर्मन विन्सेंट पिएल आपले पुस्तक द पॉवर ऑफ पॉझिटिव्ह थिंकिंग मध्ये म्हणतात, 'नकारात्मक घटनांपासून शिकवण घ्या. सावध राहा. नकारात्मक बातम्या तुमच्यावर स्वार होऊ लागल्यास त्याचा अर्थ आहे की, तुम्ही स्थितीला घाबरता. '
याचा सर्वात चांगला उपाय आहे की, दिवसभर बातम्या पाहण्याची वेळ निश्चित करा. चोवीस तास पाहू नका. कोणती बातमी तुम्हाला विचलित करत असेल, तर ती पुन्हा पुन्हा पाहू नका. तुम्ही सोशल मीडिया, ऑनलाइन चॅनल आणि बातम्यांमध्ये पूर्ण दिवस घालवलात, तर तुम्ही तुमच्यामध्ये निगेटिव्ह एनर्जीच भरून घ्याल.
सकारात्मक बातम्यांचा शोध घ्या हे तितके अवघडसुद्धा नाही. सर्वत्र सकारात्मक बातम्या आहेत, फक्त तुम्ही लक्ष देत नाही. घरात नवीन फूल किंवा भाजी उगवणे, रस्त्यावरून जाताना खोडकर मुलांना खेळताना आणि खोड्या करताना पाहणे, दिवसभर चांगल्या कविता वाचणे किंवा लिहिणे, कोणा उपाशी व्यक्तीला भोजन देणे, जुन्या मित्राशी जास्त काळानंतर गप्पा मारणे, आई-वडिलांबरोबर फिरायला जाणे,
अशा अनेक चांगल्या गोष्टी आहेत, ज्यांना आपण महत्त्व देत नाही. त्या आतमध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार करतात. तसेही ओशोंनी म्हटले आहे की, हे जग चांगल्या लोकांमुळेच तयार झाले आहे. तुम्ही आणि आम्ही सर्वजण चांगले आहोत. म्हणून आमच्याविषयी बातम्या तयार होत नाहीत.
नकारात्मकता स्वतःवर लादून घेऊ नका
तुम्ही एखादी वाईट बातमी वाचून किंवा पाहून दु:खी झालात तर हे निगेटिव्ह होणे नाही. तुम्ही एक माणूस आहात दुसऱ्यांच्या दुःखात दु:खी होणे योग्यच आहे. पण हे पूर्ण योग्य नाही. एक वाईट बातमी वाचून तुम्ही संपूर्ण दिवसाचा मूड खराब करून घेऊ शकत नाही. तुमच्या दिवसात केवळ तुम्हीच नाही आहात. तुमचे कुटुंब, तुमचे काम आणि बाहेरचेही आहेत. तुम्हाला तुमच्या भावनांना नियंत्रणात ठेवणे आणि त्यांच्यापासून वेगळे होणे शिकायला पाहिजे.
ध्यान योग करा, परमेश्वराचे नामस्मरण करा. आणि आनंदी राहा
आपल्या ऊर्जेला प्रवाहित करण्याचा सर्वांत चांगला मार्ग आहे, ध्यान आणि योग, तुमच्या शरीराच्या प्रत्येक यंत्रणेला भरपूर प्रमाणात ऑक्सिजन मिळेल आणि मन शांत राहील. आपले मित्र, कुटुंबीयांबरोबर चांगला वेळ घालवा, सद्गुरू म्हणतात की, 'सकारात्मकता आतमधून बाहेर येते आणि नकारात्मकता बाहेरून आतमध्ये तुमच्या आतमधील ऊर्जा तुमच्या सकारात्मकता कायम राखील.
मदतीसाठी तयार राहा
आपल्या आजूबाजूला काही चुकीच्या घटना पाहिल्या, कोणी मदतीसाठी हाक मारताना दिसला, तर मागे होऊ नका. जितकी शक्य असेल तितकी त्यांची मदत करा. समाजातील नकारात्मकता तेव्हाच दूर होईल, जेव्हा आपण सकारात्मक होऊ. अनेक वाईट घटना यासाठी सुद्धा होतात कारण की, आजूबाजूला राहणारे मदतीला येत नाहीत. आपल्याबरोबर राहणाऱ्यांना सबळ बनवा. तुम्ही मदत केल्यास दुसरेसुद्धा तुम्हाला मदत करण्यासाठी येतील.