प्रेरणादायी विचार
प्रसन्नता हा प्रभुप्रसाद
मित्रांनो! हसरी मुले सर्वांना प्रीय असतात. मातापिता आपली मुले प्रसन्न व हसरी पाहून स्वस्थ व प्रसन्न असतात. आम्ही परमेश्वराची लेकरे, परमात्म्यालाही आपली मुले प्रसन्न व सुखी असावी असेच वाटत असते. भौतिक जगत उत्पत्ती व लय ह्याने करारबध्द आहे.
ह्या मायेमुळे आम्ही अज्ञानी, दुःखी होत असतो. आम्हाला नष्टता ही मरणप्राय वाटत असते. हीच जीवनाची शोकांतिका आहे. वास्तविक 'बी' चे रूपांतर झाडात होण्यास तिला स्वतःला जमिनीखाली पुरून घ्यावे लागते. गुलाबाला काट्यांशी संबंध ठेवावाच लागतो.
जीवन जगणे ही एक कला आहे. सहज जीवनाचा गुण म्हणजे प्रसन्नता, प्रसन्न असणे हे परमात्म्याकडून मिळालेले वरदान होय. आत्मा शाश्वत आहे. ह्या शाश्वत व सनातन धर्माच्या अज्ञानतेमुळेच आम्हा परमेश्वरी लेकरांना भौतिकतेच्या मायेने अक्षरश: ग्रासून टाकले आहे.
हजारो, लाखो, करोडो वर्षापासून हे अज्ञान नष्ट झालेले नाही. प्रसन्नता, प्रेम, शांतता हा शाश्वत धर्माचा पाया आहे. श्रीकृष्णदेवाच्या चेहऱ्यावरील कोमल हास्य व प्रसन्नतेने आमच्या आत्म्याची वीणा झंकारल्याचा भास होतो. हा भास नसून प्रभुप्रसाद आहे. जेथे सात्विक आनंद, प्रेम व शांतता तेथेच प्रभु विराजमान असतात.
प्रतिकुल परिस्थितीत प्रसन्नतेचा झेंडा उभारा
प्रसन्नतेने आमच्यात सुन्दर विचारांना चालना मिळते. आचरणात निर्मलता येते. विनम्र व सरळस्वभावी लोकांच्या चेहऱ्यांवर स्वाभाविक सौंदर्याची झलक दिसायला लागते. जीवनात येणाऱ्या समस्या, तनाव, कटुता व अध:कार ह्यांना तमोगुणाचा आधार लागतो. ही सर्व भौतिक अप्रसन्नतेची लक्षणे होत.
आईचे बोट धरून राहणे ह्यातच बालकाचे कल्याण असते. आईशिवाय तो क्षणभरही राहू शकत नाही. प्रसन्नता प्रभुप्रसादाला आधार आहे. प्रभुस्मरण त्यावर सर्वोत्तम उपाय आहे. दृढनिश्चयी माणसे प्रतिकुल परिस्थितीतही प्रसन्नतेचा झेंडा रोवू शकतात. येथे सत्संग आवश्यक ठरते.
सत्संग :- सत्संग तिथे आहे, जिथे विझलेले दिवे जळत्या दिव्याकडे सरकून सरकून एक दिवस जळू लागतात. जिथे एका दिव्यात हजारो दिवे जळू लागतात. सत्संगाचा एकच अर्थ आहे, सद्गुरू जवळ बसण्याची कला. सद्गुरू अहंकार सोडवतात. शंका-कुशंकेच्या अज्ञानापासून मुक्तता मिळते.
आयुष्य सुखी व्हावे, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. ती इच्छा पूर्ण होण्यासाठी दोन तत्त्वे सांभाळली पाहिजेत. एक म्हणजे वापर हा वस्तूंचा करावा, माणसांचा नको आणि दुसरे तत्त्व म्हणजे माणसांवर प्रेम करावे, वस्तूंवर नाही.
V नशिबावर अवलंबून राहाणे आपल्याला नैराश्य देते; पण आपल्या कर्तव्यावर, कृतीवर भरवसा ठेवल्यास अपेक्षेहून अधिक यश मिळते.
V कोणीच सर्वगुणसंपन्न नसते. मात्र, आपण इतरांसाठी चांगले गुणग्राहक नक्कीच होऊ शकतो. आपल्यात एखादा गुण कमी असू शकतो. पण इतरांमधील चांगले गुण ओळखण्याची पारख आपल्याला असा वीच.