अक्षय संपत्ती आणि नाशिवंत संपत्ती
मानवी जीवनात चार पुरुषार्थ मानले आहेत. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, या चार पुरुषार्थामध्ये अर्थ हा पुरुषार्थ अति महत्वाचा आहे, ज्याच्या जवळ अर्थ (पैसा) आहे. त्याच्या जीवनात जीवन जगण्यात अर्थ आहे. ज्याच्याजवळ अर्थ नाही त्याचे जीवन व्यर्थ आहे, त्याला दारिद्र्याचे मरणप्राय दुःख भोगावे लागते, दारिद्र्याचे दुःख जो दारिद्री आहे त्यालाच माहित किती दुःख आहे, भक्त सुदाम्याचे दारिद्र्यच कवीने अतीशय सुरेखपणे वर्णिले आहे. सुदाम देव आपले दारिद्र दुःख श्रीकृष्ण भगवंताला सांगू इच्छित नाहीत. त्यांना माहिती आहे, हा आपल्या पूर्वकर्माचा ठेवा आहे. मित्रप्रेमात या दुःखाचे प्रदर्शन करून कमीपणा आणू इच्छित नाहीत. पण पत्नीच्या आग्रहास्तव श्रीकृष्णाची भेट घेतात. श्रीकृष्ण भगवंत देखील सुदामदेवाची परीक्षा घेतात आपला बालमित्र आपल्या मैत्रीचा फायदा घेऊन मदत मागतो काय? पण सुदामदेव आपल्या मित्रप्रेमात आपले दुःख आड येऊ देत नाही. श्रीकृष्ण सर्वज्ञे सर्व मनोभाव जाणतात. हा अनार्जित दाता आपल्या पंगतीला सुदाम्याला जेवावयाला बसवतो, भोजनापूर्वी चंदनाचा टीळा सुदामाच्या कपाळावर रेखाटतांना भिक न मागावे हे अक्षर लिहतो, हे सुदाम देवालाही माहित नसते.
सुदाम वीप्रा भाळी विधीने लिहले की भिक मागावे ।
ते अक्षर मोडूनी प्रभूने लिहले की भिक न मागावे ।।
हे अनार्जित दान मिळवण्यासाठी सुदामदेवाने श्रीकृष्ण भगवंताला काय दान केले होते.
ऋण तरि मुष्ठी पोहे : त्याच्या व्याजात हेम नगरी ती'
मुदलांत मुक्ती देणे : हे कोण्या सावकाराची रिती”
श्रीकृष्ण भगवंताच्या कृपेने सुदाम्याचा सुदामदेव झाले, सुवर्णनगरीचे र्थ मालक झाले, लक्ष्मी अलंकृत झाले. आजच्या विसाव्या शतकात तर चे लक्ष्मीपुत्राचाच सन्मान होतो. तुम्हाला सुखमय जीवन जगावयाचे असेल तर त्याला पैशाची गरज आहे. पैश्याविना जीवन जगणे मनुष्य म्हणून शक्यच नाही, म्हणून प्रत्येक मनुष्य पैशाच्या मागे लागला आहे. आर्थिक परिस्थितीचे आघात आणि आव्हाने मानवी जीवनाचे अविभाज्य घटक आहेत. त्यांना कोणीही टाळू शकत नाही. आर्थिक परिस्थितीशी संघर्ष सतत चालू असतील या संघर्षात माणूस यशस्वी झाल्यास त्याला आनंद वाटतो. त्याची प्रगती होते. बरोबरी झाल्यास समाधान आणि स्थैर्य लाभते. अपयशी ठरल्यास तो दुःखी होतो. त्याची अधोगती होते व प्रसंगी विनाशही होतो. परिस्थिती सहज हाताळण्यासारखी असल्यास परिस्थितीची आव्हाने व्यक्तीच्या उन्नतीची कारणे ठरतात. मात्र ही आव्हाने अत्यंत गंभीर असाध्य आणि पेलण्याच्या बाहेरची असल्यास व्यक्तीचे व्यक्तिमत्व ढासळते, परिस्थितीच्या आघाताचा जोर हा एका बाजूस आणि माणसाची कुवत (शक्ति, संयम, धैर्य) ही दुसऱ्या बाजूस अशा सामन्यात प्रत्येकाच्या बलाबलावर नैतिकतेवर, प्रयत्नांवर, धैर्यावर आणि संताच्या आशीर्वादावर, परमेश्वराच्या कृपेवर यश अवलंबून असते.
प्रयत्नांची पराकाष्टा करणारा, परमेश्वराची उपासना करणारा एखादा पैश पुरूष निर्व्यसनी राहून आर्थिक डबघाईला आलेली परिस्थिती सहज भूमी हाताळतो, तो या संकटातून बाहेर पडतो. हिच परिस्थिती हाताळणाऱ्या पुरुष दुसऱ्या पुरुषाला ज्याला परमेश्वराचे साह्य नाही त्याला पराकोटीचे कष्ट करावे लागतात तर तिसरा पुरुष ज्याच्याजवळ नैतिकता नाही, धैर्य नाही, स्वा संयम नाही, निर्व्यसनीपणा नाही असा पुरुष आर्थिक संकटातून बाहेर देत येण्यास अपयशी ठरतो. म्हणून झालेल्या संकटाला धैर्याने सामोर जायला पाहिजे, धैर्य खचू देता कामा नये, निराश, हताश होता कामा नये.
पैशाचा मोह कोणाला नाही, पैशाचा मोह प्रत्येक व्यक्तीला आहे. स्वतःला ज्ञानी समजणार्याला आहे, अज्ञानाला आहे, स्त्रीला आहे. पुरुषाला आहे, पैशाच्या मोहातून सर्वसंग परित्याग करून संन्यास घेतलेली व्यक्तीही त्य सुटू शकत नाही, पैसा कमावण्याच्या मोहातून आजच्या वर्तमानकाळात यां कितीतरी उच्च पदस्थ व्यक्तीनी भ्रष्टाचार केला आहे. त्यांनी भ्रष्टाचारातून प्रश किती व कसा पैसा कमावला आहे. हे पेपरमधून वाचावयाला मिळते. शि करोडो रुपयाचा घोटाळा करणारे, करोडो रुपयाचा काळाबाजार करणारे, त्य भ्रष्टाचाराच्या मार्गाने करोडो रुपये जमा करणारे, कशासाठी हा पैसा या जमा करत आहेत. त्याच्यापासून त्यांना नेमके कोणते सुख मिळते हे ध समजत नाही. दिवसभर कष्ट करून घाम गाळून, कष्टाच्या कमाईची स्त्र भाजी भाकरीखाऊन कष्टकरी सुखाने झोपतो. याउलट वाममार्गाने करोडो सं रुपयांची माया जमवणारा सुखाने खाऊ शकत सुखाची झोपही अ त्याला येत नाही. तरीही हा प्राणी पैश्याच्या मागे लागलेला आहे.
पैशाच्या मागे न लागता, उलट पैशाचा त्याग करणारे महात्मा या भूमीवर होवून गेले पैशाचा खरोखर त्याग करणारा एकच अवतारी पुरुष या विश्वात होवून गेला. हा आदर्श आहे, स्वामी श्री चक्रधरांचा. भडोच येथे असतांना जुगाराचे व्यसन स्विकार करून निमित्त करून स्वामी श्री चक्रधर अक्षरशः आपली सर्व संपत्ती गोरगरिबांवर उधळून देत होते. राज्य वैभवाचा त्याग करून रामयात्रेला जाताना अंगावरील अलंकार व वस्त्र याचा देखील त्यांनी त्याग केला. श्रीप्रभुला अनुसरण्यापूर्वीच त्यांनी द्रव्याचा सर्वस्वाचा त्याग केला. स्वामी श्रीचक्रधराप्रमाणेच आद्यगद्य मराठी ग्रंथ लेखक म्हाईंभटानी देखील स्वामींचा आदर्शसमोर ठेवून श्री प्रभूला अनुसरण्यापूर्वीच आपल्या गर्भ श्रीमंतीचा त्याग केला. स्वामी श्री चक्रधरांना अनुसरणाऱ्या खेई गोई (दोघी बहिणी) यांनी देखील अनुसरणापूर्वीच धनकनाचा, त्याग केला. त्यांच्या त्यागाची प्रशंसा स्वतः स्वामी श्री चक्रधरांनी केली. स्वामी श्री चक्रधरांचे प्रथम शिष्य निळभट भांडारेकार यांनी देखिल अनुसरण्यापूर्वीच सर्वस्वाचा त्याग केला. महानुभाव पंथात असे आदर्श महापुरुष होवून गेले. आजमात्र याच्या उलट परिस्थिती आहे. महानुभाव पंथातील पुरुषाप्रमाणे, इतरही धर्म संप्रदायात धनकनाचा स्त्री पुत्राचा त्याग करून संन्यास घेतलेले स्त्रीपुरुष होवून गेले. समाजाच्या उत्कर्षासाठी, उन्नतीसाठी स्वधर्म रक्षणासाठी संत रामदासाप्रमाणे अनेकांनी आपले जीवन समर्पण केले. स्वतः निष्कंचन असणाऱ्या या महापुरुषांनी अक्षय धन (ज्ञानसंपत्ती) लोकांना दिली. जीवन सार्थक करण्याचे धन दिले.
आजच्या या विसाव्या शतकातही महात्मा गांधी आचार्य विनोबा भावे, देशासाठी संपत्तीदान करणारे मोतीलाल नेहरू, पंतप्रधान पदावर असूनही द्रव्यहीन असणारे लालबहादुर शास्त्री, वर्तमानकाळात असणारे वि अटलबिहारी वाजपेयी असे कितीतरी भारत मातेचे सुपुत्र सांगता येतील स या थोर पुरुषांच्या आदर्शाला तिलांजली देवून त्या त्या क्षेत्रातील पुरुषांनी द्रव्यप्राप्तीसाठी काय काय केले. हे ऐकून व पेपर मध्ये वाचून मन अती दुःखी होते. माणसाला पैशाची गरज आहे पण किती? याचा विचार प्रथम करावयाला पाहिजे. यासाठी शास्त्रकारांनी चार आश्रम सांगितले आहे. ब्रम्हचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ व संन्यास या आश्रम धर्माप्रमाणे कर्तव्यपालनासाठी कमी अधिक प्रमाणात द्रव्याची संपत्तीची धनधान्याची गरज आहे आणि त्या त्याप्रमाणेच द्रव्याचा व धान्याचा संग्रह करावयाचा आहे. आज प्रत्येक व्यक्ती संपत्ती जमवण्याच्या मागे लागला आहे. त्यासाठी तो कमाई करत आहे. नुसती कमाई करत नसून वरची कमाई ही करत आहे.. वरच्या कमाईचा भोग येथे जीवाची मुंबई करून घेत असेल तर फेडमात्र वर गेल्यावरच करावी लागेल, यांची जाणिव ठेवत नाही. यासाठी वाल्मीक ऋषीचे उदाहरण देता येईल. धन कमवण्यासाठी मनुष्य काय काय करतो.हे बघून व ऐकून अंगावर सरकन काटा उभा राहतो. दुसऱ्याच्या जीवनाची होळी करून, दुसऱ्याच्या जीवनाचा नाश करून, प्रसंगी बळी देवून लोक धन कमवतात. धन कमवणाऱ्याला एक तत्त्व माहिती आहे. काहिही करून पैसा कमवायचा व सुखभोग घ्यायचा, पैसा फेकावयाचा आणि हवे ते मिळवावयाचे.
या जगात आजमितीपर्यंत लाखो करोडो धनवान होऊन गेलेत, वर त्यांनी जमा केलेली संपत्ती पाहून डोळे दिपून जात होते, आजही या रे विसाव्या शतकात धनवान आहेत. धनवानांची संपत्ती ऐकून व बघून सामान्य मनुष्य आश्चर्य चकीत होतो. या भौतिक सुखसंपत्तीचा हेवा नी सर्वांना वाटतो. ज्याच्याजवळ धन आहे. आशा व्यक्तीचा मान सन्मान ती होतो. धनामुळे ते पद व सन्मान प्राप्त करून घेतात. लोकही धनवानाची हांजी हांजी करतात. त्याच्यापुढे लाचारी पत्करतात. धन हे सर्वस्व नव्हे ले हे लोक जाणत नाही. आधम लोक हेच धनाची इच्छा करतात.
निस्पृहः वृत्तीने पाहिल्यास धन संपत्तीची किंमत कांहीच नाही. धनाची किंमत लोभी मनुष्याला असते, जो खरोखर अंतर बाह्य विरक्त आहे. त्याला धन तृणवत आहे. परंतू काही महाभाग वैराग्यवृत्तीधारण करूनही पैशाच्या मागे लागलेली दिसतात. त्याच्यातून त्यांना काय कमवावयाचे आहे ते त्यांनाच माहिती आहे. स्वामींनी सांगितले आहे. धनाने ईश्वर प्राप्ती होत नाही.
खरे सुख धनात आहे का समाधानात आहे? लोभी माणसे धन कमवण्याच्या मागे लागलेली असतात. धनाच्या कमाईसाठी वाट्टेल ते करण्याची त्यांची तयारी असते. त्यांची तृष्णा कधीही कमी होत नाही. धन लोभामुळे सदैव ते दुःखी असतात. खरे सुख धनात नसून समाधानात आहे. "ठेविले अनंते, तैसेचि राहावे, चित्ती समाधान असो द्यावे.” आपल्या अर्जकानुसार जे मिळेल त्यात
समाधानी असावे - दुसऱ्याचे मन दुःखवून मिळवलेले धन कधीही सुख प्राप्त होवू देत नाही. खरा धनवान कोण आहे?
या जगात धनवान हा खरा धनवान नसुन खरा धनवान तो आहे, जो प्रभु चक्रधरांच्या वचनाला अनुसरला. षडरिपूचा त्याग करून मान सन्मानाचा त्याग करून प्रभूंच्या चतुर्विध साधनाला शरण गेला. चतुर्विध साधनावर बुध्दी ठेवून नामस्मरणात जीवनाचा वेळ घातला व योग्यता जोडली, पात्रता जोडली तो खरा धनवान त्याने अक्षयसंपत्ती जोडली. नाशीवंत जगामध्ये नाना प्रकारची सोंगे घेऊन लोक संपत्ती कमवतात त्यात नवल काहीच नाही. सामान्य स्त्रीयाही धन कमवतात. हि सर्व असंपत्ती आहे. ही नर्काला नेणारी संपत्ती आहे. जीवाची खरी संपत्ती कोणती? हे प्रभू श्रीचक्रधरांनी आपल्या अनुसरलेल्या साधकाला सांगितली आहे. जीवाची खरी कमाई धनसंपत्ती, सुख, वैभव, जीवाचे खरे हित परमेश्वर जोडणे आहे. चतुर्विध साधन जोडणे हीच खरी कमाई आहे. प्रभूच्या वचनाचे पालन करणे, हिच अक्षय संपत्ती जोडणे आहे.
प्रभूच्या नामस्मरणाने जोडलेली योग्यता पात्रता या धनाचा कधीही नाश होवू शकत नाही. हे धन कमवतांना कुठल्याही प्रकारचे भांडवल लागत नाही. कोणाच्या सहकार्याची गरज नाही, कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार करण्याची गरज नाही, कोणत्याही प्रकारचे कठीण कर्म व कष्ट करण्याची गरज नाही. लाचारी पत्करण्याची गरज नाही असे अक्षय धन सर्वांना सहज कमवता येणारे असूनही लोक नाशिवंत धन कमवण्यातच आनंद मानतात. आश्चर्याची गोष्ट आहे. ज्याच्याजवळ हि अक्षय संपत्ती आहे. जो अक्षय धन कमवत आहे. त्याला असे वाटत नाही. मी धनवान आहे. आथवा लोकही त्याला धनवान समजत नाही. पण ज्ञानदृष्टीने पाहिले असतांना खरा धनवान तोच आहे. ज्याच्या धनाचा कधीही क्षय होत नाही. ज्या संपत्तीमुळे तुम्ही नरक यातना चुकवून परम सुख प्राप्त करून घेऊ शकता, ही खरी अक्षय संपत्ती आहे. याउलट नाशिवंत धन कमवताना व सांभाळतांना काय दुःख होते ते पाहा.
अर्थानां मार्जनं क्लेशः तथा च परिपालनम् ।
क्षय दुःख, व्ययं दुःखंः द्वीगस्थाने क्लेश कारकम् ।”
पैसा मिळविण्यासाठी कष्ट, संभाळ करण्यासाठी कष्ट, कोणी चोरून नेला तरी दुःख, खर्च करतांना दुःख, पैशाच्या लोभामुळे स्वतःचा मृत्यू, वडीलाच्या मृत्यूला कारण होतो. म्हणजेच पैश्यापासून सुख थोडे दुःख जास्त आहे म्हणून माझी विनंती आहे या नाशिवंत धनाच्या मागे न लागता स्वतःला द्रव्यहिन न समजता, "महादाईसा सारखे स्वतःला राजकुमर समजा" स्वामी श्री चक्रधर महाराज आपल्या साधकाला म्हणतात “बाई : तुम्ही राजकुमार आहात या चराचर विश्वाचा मालक आहे, राजा आहे ज्याचे राज्य अजरामर आहे, त्रिकाल सत्य आहे, शाश्वत आहे, त्या महाराजाचे तुम्ही राजकुमार आहात. तुम्ही स्वतःला हीनदीन रंक समजता कामा नये. या वचनाला अनुसरून तुम्ही कमाई करा, तुम अमोल असा धन संचय करा. या धनाच्या पाठीमागे लागा. या धनाच्या कमाईच्या मागे लागला तर दृष्टपर सुदाम देवासारखे तुमचेही भाग पालटेल, प्रा लक्ष्मीकान्त अनंत हाताने तुम्हाला तो धनकन स्त्रीपुत्र कनाशीच्या ब्राम्हणाप्रमाणे देईल. सुदाम देवाप्रमाणे देईल. तो चिन्तामणि चिन्तीले ते देईल, तुमच्या आर्जकत्वाला असेल तरी ही देईल, आणि नसेल तरीही देईल. दृष्टपर देईलच पण अदृष्टपर सकळ देवतांचे सुखफळही देईल. एव्हढेच नव्हे तर कैवल्यपदाचे राज्यही देईल. म्हणून नामस्मरणाचे धन कमवा, स्वामी श्री चक्रधरांच्या प्रत्येक वचनाचे पालन ही कमाईच आहे, ही कमाई सकळ नर्कापासून मुक्त करणारी कमाई आहे. या उलट करणीय करणाच प्रयोजन नसतांना स्व स्वार्थासाठी जो कमाई करतो, धन संचय करतो तो या कमाईच्या मागे लागून आपला नाश करून घेत आहे. ज्याच्यामुळे न ईश्वरास घोर खंती येत आहे. त्याच्यामुळे ईश्वरप्राप्ती दुरावत आहे. अशी धन कमाई कोणीही करू नये. जीवन चरितार्थ चालविण्यासाठी स्वकष्टाने कमवलेला पैसा जीवन जगण्यासाठी योग्य आहे. आवश्यकतेनुसार कमाई करावी म्हणजे अंश मात्र निरालंबी या वचनाची योग्यता मिळेल, वाममार्गाने कमवलेला पैसा, भ्रष्टाचाराने कमवलेला पैसा, अनेकांची मने दुःखवून कमवलेला पैसा, नानाप्रकारचे सोंगे घेऊन कमावलेला पैसा तुमचे जीवन सुखी करू शकणार नाही, या पैशाच्या मागे अनेक दुःख तुम्हाला प्राप्त होतात. अनेक दुःखाला भोगाला जन्म देणारा पैसा कमवू नका. ज्या धनाने तुम्ही सकळ नरकापासून मुक्त होवून परमसुखाला प्राप्त व्हाल असा धन संग्रह अवश्य करा हि नम्र विनंती.
मनुष्याच्या जीवनातील खरी संपत्ती कोणती? व खरे दुःख संकष्ट कोणते? हे खालील श्लोकांतून पाहावयास मिळते.
संपदो नैव संपदः विपदो नैव विपदः ।
विपद् विस्मरणं विष्णोः संपन्ना नारायण स्मृति ॥
ज्याला आपण संपत्ती समजतो, खरी संपत्ती नाही व ज्याला आपण खरे संकष्ट समजतो, ते खरे संकष्ट नाही. परमेश्वराचे नाम विसरणे. उदा. छर्दोबासाप्रमाणे "हे काह्याचे रे; म्हणे नागदेव राऊळाचे; एथचे नाम हि नाहीः” हे खरे संकष्ट आहे, आलेले दुःख संकष्ट प्रभूच्या नामस्मरणाने दूर होईल. पण नामच जर विसरले तर यापेक्षा मोठे संकष्ट कोणते? संपन्नता एवं श्रीमंती हि नाम स्मरणाची ठेव हिच खरी संपत्ती आहे म्हणून मनुष्याने या मायावी संपत्तीच्या मागे न लागता अक्षय संपत्तीच्या मागे लागावे. ही संपत्ती प्रत्येकांनी जीवनात मिळवायलाच पाहिजे. जो ही संपत्ती कमवणार नाही त्याच्यासारखा दारिद्री, अष्ट दारिद्री नव्हे. महादारिद्री तोच आहे. तोच खरा करंटा आहे, या दारिद्र्याचा ठसा आपल्या जीवनावर उमटू देवू नका.
कै. महंत पाथरीकर बाबा