ही ३० लक्षणे धर्मवानच मनुष्याच्या ठिकाणी असतात 30 symptoms of Dharma

ही ३० लक्षणे धर्मवानच मनुष्याच्या ठिकाणी असतात 30 symptoms of Dharma

 ही ३० लक्षणे धर्मवान मनुष्याच्या ठीकाणी असतात

 30 symptoms of Dharma


नारद मुनि युधिष्ठीर राजाला धर्माचे निरूपण करताना म्हणतात :- 

  • सत्यं दया तप: शौचं तितिक्षेक्षा शमो दम: ।
  • अहिंसा ब्रह्मचर्यं च त्याग: स्वाध्याय आर्जवम् ॥ ( श्रीमद्भागवत महापुराण ७.११.८ )

१. सत्य : यथार्थ भाषण, नेहमी खरे बोलणे. 

२. दया : - अंतःकरणात इतरांचे दुःख दूर करण्याची भावना असणे.

३. तप : शरीर वाचिक मानसिक त्रिविध तप करणे. परब्रम्ह परमेश्वराने सांगितलेले असतिपरीचे आचरणे

४. शौच : मनाचे पवित्रपण. अंतर्बाह्य शुद्धता

५. तितिक्षा : शीत उष्ण सुख-दुःख लाभ हानि जय-पराजय सहन करणे. 

६. ईक्षा : योग्य-अयोग्य विधि-निषेध, विहित - निषिद्ध याची जाणीव असणे

७. शम : मनाचा संयम असणे, क्रोध आणि काम याविषयी मनावर ताबा असणे याला शम असे म्हणतात

८. दम : बाह्य ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रियांवर विजय प्राप्त करणे, दहाही इंद्रियांवर विजय मिळवणे. 

९. अहिंसा : सर्व भूतहिते रताः कुणालाही दुखवू नये कुणालाही त्रास देऊ नये दुःख देऊ नये अशी भावना. 

१०. ब्रह्मचर्य : - ब्रह्मचर्य पाळणे, विषय भावनेने कोणाही स्त्रीचा अभिलाष न करणे. 

११. त्याग : घरादाराचा पुत्र, बायको, संपत्तीचा त्याग करणे. आणि हळूहळू वैराग्य करून सर्व दोषांचा त्याग करणे. 

१२. स्वध्याय : ब्रह्मविद्या शास्त्राचा अभ्यास करणे, पाठांतर करणे, मनन करणे. किंवा स्वाध्याय म्हणजे अहर्निश नाम मंत्राचा जाप करणे

१३. आर्जव : मनाची ऋजुता, मनात कपटभाव नसणे, मनाचा सरळपणा. 


  • सन्तोष: समदृक्सेवा ग्राम्येहोपरम: शनै: ।
  • नृणां विपर्ययेहेक्षा मौनमात्मविमर्शनम् ॥ 
  • ( श्रीमद्भागवत महापुराण ७.११.९ )

१४. सन्तोष : देववशात् जे प्राप्त झालेले आहे त्यातच संतोष मानणे. 

१५. समदृक् सेवा : सर्वांविषयी जे समदर्शी आहेत, असे देवाचे भक्त त्यांची सेवा करणे अर्थात परमार्गाची सेवा करणे 

१६. शनैः ग्राम्येहोपरमः वासनिक अवस्थेत हळूहळू गृहस्थ धर्मापासून निवृत्त होणे, सांसारिक कर्मांपासून मन काढणे. आणि संन्यास घेतल्यावर ११  विधींव्यतिरिक्त इतर सगळ्या कर्मांमधली रुची काढणे

१७. नृणा विपर्ययेहेक्षा : मनुष्यासाठी जे निषिद्ध कर्म आहेत त्यांच्या विरहित होणे, कर्मरहाटीतील सर्व कर्मांपासून निवृत्त होणे, देवता भक्ती ही वासनिका-नामधारकांसाठी निषिद्ध आहे, देवतेचा प्रसाद खाणे निषिद्ध आहे, फक्त श्रीकृष्ण देवाची भक्ती करणे हेच विहित आहे, त्या भक्ती व्यतिरिक्त इतर सर्व कर्मांचा त्याग करण्याची इच्छा

१८. मौन :- निरर्थक बडबड न करणे, कामाव्यतिरिक्त न बोलणे, ब्रह्मविद्या शास्त्राच्या कथनाविषयी मौन असणे

१९. आत्मविमर्शन : परमेश्वराच्या गुणाचे ज्ञान आणि आपल्या दोषांचे ज्ञान त्याविषयी विमर्शन करणे, आपण आधी किती दोषवान् होतो? आणि संन्यास घेतल्यानंतर आपले दोष किती दूर झाले? याविषयी सतत विमर्शन असणे


  • अन्नाद्यादे: संविभागो भूतेभ्यश्च यथार्हत: ।
  • तेष्वात्मदेवताबुद्धि: सुतरां नृषु पाण्डव ॥ 
  • ( श्रीमद्भागवत महापुराण ७.११.१० )

२०. अन्नाद्य आदि का संविभाग :- अन्न वस्त्र द्रव्य इत्यादी पदार्थांनी अवंचकपणे परमार्गाचे भजन करणे, थोर पात्री थोर क्रिया सान्या पात्री सानी क्रिया

२१. सर्व प्राणीमात्रांविषयी क्षमेचा भाव असणे, सर्वे सुखिनः सन्तु अशा प्रकारचा उदात्त भाव


  • श्रवणं कीर्तनं चास्य स्मरणं महतां गते: ।
  • सेवेज्यावनतिर्दास्यं सख्यमात्मसमर्पणम् ॥ ( श्रीमद्भागवत महापुराण ७.११.११ )

२२. परमेश्वर भक्तांना परमेश्वराच्या गुण, लीळांचे श्रवण करणे 

२३. श्रीकृष्ण भगवंतांच्या लीलांचे गुणांचे वर्णन करणे, 

२४. स्वरूप : भगवंतांच्या श्रीमूर्तीचे ध्यान करणे

२५. परमेश्वराची तथा परमेश्वर भक्तांची निर्हेतुकपणे सेवा करणे

२६. पूजा अर्घ्य : परमेश्वराचे अथवा परमेश्वर भक्तांचे षोडशोपचारी अथवा पंचोपचारी भजन करणे

२७. अवनति : नमस्कार, दण्डवत् प्रणाम आदि अष्टांग नमस्कार करून नम्रतेने वर्तणे  

२८. दास्य : परमेश्वराचे, परमार्गाचे सेवा दास्य करणे, स्थानाचे सेवादास्य करणे

२९. सख्य : देवावर अत्यंत दृढ विश्वास असणे, दृढ प्रतीती असणे 

३०. भगवंताला पूर्णपणे आत्म समर्पण करणे


  • नृणामयं परो धर्म: सर्वेषां समुदाहृत: ।
  • त्रिंशल्लक्षणवान् राजन्सर्वात्मा येन तुष्यति ॥ 
  • ( श्रीमद्भागवत महापुराण ७.११.१२ )

हेच धर्माचे ३० लक्षण वर्णन करून पुढे नारद मुनी धर्मराजाला म्हणतात, हे राजा हा तीस प्रकारचा धर्म सर्व मनुष्यांना विहित आहे हा धर्म आचरल्याने सर्वांचा आत्मा असलेला परमेश्वर संतुष्ट होतो

या ३० लक्षणांमध्ये सदाचार, पवित्रता, सेवा, पूजा, भक्ति आणि तत्त्वज्ञान इत्यादी प्रकारचे सर्व उत्तमोत्तम धर्म येऊन जातात त्यामुळे जिवाचे परम कल्याण होते. 

इतर ग्रंथांमध्ये ही धर्माचे वर्णन आलेले आहे परंतु श्रीमद्भागवत पुराणात विस्तृत वर्णन आलेले आहे

जसे की याज्ञवल्क्य स्मृतीत धर्माचे नऊ लक्षण सांगितलेले आहेत

  • अहिंसा सत्यमस्तेयं शौचमिन्‍द्रियनिग्रह:।
  • दानं दमो दया शान्ति: सर्वेषां धर्मसाधनम्॥‌ 
  • ( याज्ञवल्क्य स्मृति १.१२२ )

१. अहिंसा, 

२. सत्य, 

३. चोरी न करणे 

४. मनाची स्वच्छता, पवित्रता

५. इन्द्रियांना वश ठेवणे 

६. दान  

७. संयम 

८. दया 

९. शान्ति


मनुस्मृतीत धर्माचे १० लक्षण सांगितलेले आहेत

  • धृतिः क्षमा दमोऽस्तेयं शौचमिन्द्रियनिग्रहः। 
  • धीर्विद्या सत्यमक्रोधो दशकं धर्मलक्षणम्॥
  • ( मनु स्मृति ६.९२ )

१. संतोष, समाधान 

२. क्षमा, 

३. संयम, 

४. अन्यायाने कोणाचीही वस्तू द्रव्य न घेणे

५. शारीरिक, मानसिक पवित्रता, 

६. दश इंद्रियांचा निग्रह, दश इंद्रियांवर संयम 

७. बुद्धि म्हणजे भगवंतावर निश्चयात्मक प्रतीती 

८. विद्या :- संपूर्ण ब्रह्मविद्येचा अभ्यास 

९. सत्य :- नेहमी खरे बोलणे 

१०. क्रोधावर संयम कधीच क्रुद्ध न होणे

  ये धर्म के दस लक्षण हैं।


महात्मा विदुराने महाभारतात धर्माचे आठ लक्षण सांगितलेले आहेत

१. नामयज्ञ, भगवंत पूजा आदि,

२. ब्रह्मविद्या शास्त्राचे अध्ययन, 

३. दान:- अवंचकपणे परमार्गाचे भजन 

४. तप :- असतिपरी तप, गीतेच सांगितलेले वैराग्य आचरणे 

५. सत्य, 

६. दया, 

७. क्षमा, 

८. अलोभ :- कशाचाही लोभ न धरणे


पद्मपुराणात ही धर्माचे दहा लक्षण सांगितलेले आहेत

  • ब्रह्मचर्येण सत्येन तपसा च प्रवर्तते।
  • दानेन नियमेनापि क्षमा शौचेन वल्लभ॥
  • अहिंसया सुशांत्या च अस्तेयेनापि वर्तते।
  • एतैर्दशभिरगैस्तु धर्ममेव सुसूचयेत॥

१. ब्रह्मचर्य, 

२. सत्य, 

३. तप, 

४. दान, 

५. संयम, 

६. क्षमा, 

७. शौच, 

८. अहिंसा, 

९. शांति, 

१०. चोरी न करणे , हे दहाही लक्षण असले तरच धर्माची ऋद्धी होते. 

अधर्माची १० लक्षणे वाचण्यासाठी खालिल लिंकवर क्लिक करा 👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/04/dharma-10-symptoms-of-adharma.html


Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post