(सामाजिक विचार!)
"अनन्य" व "अन्य" यातील फरक समजणे, ही काळाची गरज!"!
मानवीय जीवनात वावरत असतांना, आजच्या वर्तमान काळात "अनन्य"या विचाराला फारच समजून घेण्याची गरज आहे, नव्हेतर फारच आवश्यकता निर्माण झालेली आहे,
"अनन्य"म्हणजे अभिन्न, अद्वितीय, एकमात्र,असे अर्थ पाहावयास मिळतात,
अनन्य" हा विचार लौकिक संसारीक कुटुंबातील जीवनात कुटुंबाला वैभव प्राप्त करून देणारा आहे,कारण कुटुंबातील सर्व सदस्य एकमेकांशी "अनन्य"असतील एवं चिटकून असतील,तर त्या कुटुंबाचा प्रभाव समाजावर निश्चितच पडतांना दिसत असतो,असे "अनन्य" विचाराने चालणारेच कुटुंब लौकिक क्षेत्रात सतत प्रगती करतांना दिसत असते,
तद्वत गाव, देश, पंथ, धर्म,लौकिक दृष्टीने अनन्य" असेल,
तर विश्वामधे आधीक प्रभाव पडलेला निश्चित दिसेल,
हि "अनन्य"विचाराची ताकद,'एवं सामर्थ्य आहे,
समाजात वावरताना"अनन्य" विचार अंगी बांधून वावरले,
तर इतर"अन्य"विचार म्हणजे विनाशकारी विचार कुटुंबात प्रवेश करीत नसतात,म्हणून लौकिक जीवनात "अनन्य"हा विचार समजून घेण्याची फार अवश्यकता आहे,हा झाला लौकिक दृष्टिकोनातून अल्पसा विचार!
"अनन्य"म्हणजे ज्या विचाराने मन,बुद्धी, चित्त"अभिन्न राहाते,
एवं शुद्ध राहाते,तो विचार म्हणजे "अनन्य"!
आजच्या वर्तमान काळात,
असा कोणता विचार आहे की,जो माणसाला "अनन्य" ठेवू शकतो,तो विचार माणसाने करण्याची गरज आहे,
मग लौकिक क्षेत्रातील संसारीक विचार माणसाला अनन्य"ठेवू शकतो का?किंवा पररमार्थीक क्षेत्रातील विचार माणसाला "अनन्य" ठेवू शकतो,या दोहितील कोणता विचार"अनन्य" ठेवू शकतो,याच विचार करण्याची, एवं चिंतन करण्याची मात्र गरज आहे,
तसे पाहिले तर "अनन्य"हा विचार माणसाला शांती, समाधान,प्रसन्नता, मनाला, बुद्धीला,तथा चित्ताला एका स्थितीत ठेवणारा आहे,
"अनन्य"हा विचार फक्त परमार्थातून मिळू शकतो, परमार्थीक विचारच माणसाला अनन्य" ठेवू शकतो,हे मात्र तितकेच खरे आहे,आणि विवेकशील व्यक्ती कधीच नाकारू शकत नाही,
कारण या सृष्टीतील जो पवित्र आहे,शुद्ध आहे,अशा भगवंताचा शुद्ध विचार, माणसाच्या मनाला, बुद्धीला, अनन्य" ठेवणारा मात्र निश्चितच आहे,तसेच परमेश्वराचा विचार माणसाच्या मनाला, बुद्धीला ताण तनावातून मुक्त करणारा आहे,
असा भगवंताचा त्रिगुणातीत विचार श्रीमद्भगवद्गीतेत सांगितलेला आहे.हा पवित्र विचार माणसाला ताणतनावातून निश्चित दुर करणारा आहे,
लौकिक क्षेत्रात वावरताना जर बुद्धीला मनाला "अनन्य"ठेवले, तर मन,बुद्धी तरतरीत राहाते,
लौकिक व्यवहारातून कौटुंबिक विचार केला,एखाद्या व्यक्तीचा विवाह झालेला आहे,आणि विवाह झाल्या नंतर पत्नी जशी पतीसी "अनन्य"एवं एक निष्ठ असते, तद्वत पती देखील पत्नीसी "अनन्य"असतो,
तर लौकिक संसारात कोणतीच समस्या निर्माण होत नाही,
पती पत्नी जर "अन्य"झाले, म्हणजे स्वैर विचारी झाले,तथा मनमानी झाले,आणि पती,पत्नी एकमेकांशी जर"अनन्य"राहिले नाही,तर कुटुंबामधे अनेक समस्या निर्माण होऊन कुटुंबाची राख रांगोळी होते,
आध्यात्मिक दृष्टीने विचार केला तर "अन्य "म्हणजे इतर विचार,एवं संसारीक विचार! मग तो लौकिक संसार उन्नतीचा असो!किंवा स्वार्थी,मतलबी, लोभी, स्वैराचारी, हावडे पणा,मग पद,प्रतिष्ठेचाअसो!हे सर्व विचार"अन्य"या विचारात मोडतात,
आध्यात्मिक क्षेत्रातील दोन व्यक्ती एकत्र आल्यावर ते जर परमार्थाच्या संदर्भातील विचार मांडत असतील,मग त्या विचारामधे साधुसंताची भेट,स्थान दर्शनाला जाण्याचा विचार, परमार्गाचा विचार, शास्राचा विचार,घरतील आध्यात्मिक मार्गाचा विचार, आदि विचार मांडत असेल,यावर जर चर्चा होत असेल, तर त्याला"अनन्य" विचार म्हटले आहे,कारण "अनन्य" विचाराने माणसाची "स्वस्थता"कधीच भंगत नसते,तर विचारांमध्ये गंभीरता निर्माण होते,
परंतु"अन्य "विचारांनी म्हणजे त्रिगुण विचारांनी मात्र सतत स्वस्तता भंग पावते, मन सदा अस्थीर होत असते, मग त्या संसारातील स्वार्थ्याच्या गोष्टी असो,किंवा राजकीय क्षेत्रातील ढवळाढवळीच्या गोष्टी असो!किंवा उद्योग व्यवसायातील नुकसान भरपायीच्या गोष्टी असो!किंवा एकमेकांच्या टिकाटवाळी गोष्टी असो!
या सर्व गोष्टींना"अन्य" गोष्टी म्हणतात,या गोष्टींनी माणसाची स्वस्तता निश्चित नष्ट होत असते,
या"अन्य"गोष्टी मात्र माणसामधे ताणतनाव निर्माण करीत असतात, टेन्शन वाढवीत असतात, दवाखान्यात जाऊन पैसा खर्च करायला लावीत असतात, तर कधीकधी जीव गमावण्या पर्यंत नेत असतात,
हे "अन्य"गोष्टीचे दुष्परिणाम पाहावयास मिळतात,
म्हणून "अन्य" गोष्टी टाकाव्यात.