वैराग्याला कशाचीच भिती नाही संस्कृत सुभाषित रसग्रहण - sunskrit-subhashit

वैराग्याला कशाचीच भिती नाही संस्कृत सुभाषित रसग्रहण - sunskrit-subhashit

 वैराग्याला कशाचीच भिती नाही 

नीतिशतकम् - neeti-shatak subhashits 

संस्कृत सुभाषित रसग्रहण - sunskrit-subhashit



छंद :- शार्दूलविक्रीडित 

भोगे रोगभयं कुले च्युतिभयं वित्ते नृपालाद्भभयं

मौने दैन्यभयं बले रिपुभयं रूपे जरायाभयम् ।

शास्त्रे वादिभयं गुणे खलभयं काये कृतान्ताद्भयं

सर्वं वस्तु भयान्वितं भुवि नृणां वैराग्यमेवाभयम् ॥

                        - भर्तृहरीकृत वैराग्यशतकम् 

अर्थ :- भोग घेताना रोगाचे भय असते, उच्च कुलात जन्म पावलेल्यास   अपकिर्ती होऊ नये याची काळजी (भय) असते, अधिक धनप्राप्ती झाल्यास राजाचे भय असते (अधिक कर द्यावा लागतो), मौन घरल्यास दीनदुबळा म्हटले जाण्याचे भय असते, बलवान असरणाऱ्यास शत्रुंचे  भय, रूपवानास म्हातारपणाचे भय, शास्त्रपारंगत विद्वानास वाद-विवादाचे भय,शाध्या सरळ गुणी मनुष्यास दुर्जनांचे भय, चांगली शरीरप्रकृती होने असणार्‍यास यमाचे भय, या विश्वामध्ये चांगल्या वाइट सर्व वस्तू भय उत्पन्न करणाऱ्या आहेत. फक्त वैराग्यानेच (विरक्तीनेच) सर्व लोकांना अभय मिळू शकते.

टीप- राजा भर्तृहरीने संसारापासून विरक्ती निर्माण झाल्यावर सर्वकाही त्यागून संन्यासाश्रम धारण केला व वैराग्यशतक लिहिले त्यातील हा एक श्लोक.

प्रख्यात उर्दू शायर गालिबनेही या संसारातील समस्यांना कंटाळून जाऊन लिहिलंय की,

रहिये अब ऐसी जगह चलकर, जहाँ कोई न हो।

हमसुखन कोई न हो और हमज़बाँ कोई न हो।।

बे दरो-दीवार सा, इक घर बनाना चाहिए।

कोई हंसाया न हो और पासबाँ कोई न हो।।

पड़िये गर बीमार तो कोई न हो तीमारदार।

और अगर मर जाइये, तो नोहाखां कोई न हो।।

या संसारात थोडंदेखील सुख नाहीये, चला आता अशा जागी जाऊन राहूयात जिथे कोणीच नसेल. जिथे कोणी आपल्यासमान छंद असलेला नसेल आपली भाषा बोलणारं नसेल. दरवाजा अथवा भिंतीही नसणार एक घर असेल अर्थात ज्गलातच जाऊन राहूयात जिथे संगतीला कोणी नसेल आणि शेजारीही कोणी नसेल, अगदी आजारी पडलं तरी काळजी घेणारं कोणी नसेल आणि मेलो तरी मागे रडणारं कोणी नसेल.   

 टीप : अभिजीत काळे

याच श्लोकाचा मराठी अनुवाद वामनपंडितांने आणि ल. गो. विंझे यांनी केलेला आहे.

मराठी श्लोकानुवाद :- वामनपंडित

भोगां रोगभिती, खुला च्युतिभिती वित्ता नृपाची भिती

 मौना दैन्यभिती, बला रिपुभिती रूपा जरेची भिती ॥

 शास्त्रा वादभिती, गुणा खलभिती देहा यमाचें भय

 वैराग्याविण भूतळीं सकळही वस्तूंस आहे भय ॥

मराठी श्लोकानुवाद :- ल. गो. विंझे 

छंद :- शार्दूलविक्रीडित

भोगाला भय रोग; पातहि कुला, वित्ता नृपाचें भय 

मानाला भय दैन्य, शत्रुहि बला, रूपा जरेचें भय ॥

 शास्त्राला भय वाद, दुष्टहि गुणा, देहा यमाचें भय ।

 भीतिग्रस्तचि सर्व वस्तु जगतीं वैराग्य हें निर्भय ॥

गद्यार्थ- जगांतल्या सर्व वस्तूंच्या मागें, कशाचें तरी भय हे लागलेलेच असतें, व त्यापासून त्यांचा नाशहि संभवतो. उदाहरणार्थ- विषयोपभोग घेणाऱ्याला रोगापासून भय असतें. सत्कुलाला नीतितत्त्वांपासून पतन हे भय असतें; संपत्तीला राजा ती कधीं हरण करील हे भय असतें, स्वाभिमानी स्वभावाला दैन्य स्वीकारण्याचा प्रसंग म्हणजे मरणच ! बलवंताला, शत्रूचें भय असतें; सौंदर्याला वार्धक्यापासून भय भसतें; उच्च शास्त्रज्ञानप्राप्तीस वितंड वाद, जल्पवाद हे भय; गुणाला दुष्ट माणसापासून भय; देहाला मृत्यूचें भय असतें. वैराग्य हेंच एक भयरहित असतें.

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post