महानुभाव पंथ धर्म संवर्धन mahanubhav-panth-history

महानुभाव पंथ धर्म संवर्धन mahanubhav-panth-history

 महानुभाव पंथ धर्म संवर्धन mahanubhav-panth-history



'यत् धारयते तत् धर्म' त्यांचे संवर्धन करणे प्रत्येक मानवाचे आद्य कर्तव्य आहे. मानवी जीवनाचे सर्वश्रेष्ठ अंतिम इप्सित प्राप्तव्य वा ध्येय, विशुद्ध ईश्वर आनंदप्राप्ती. त्यासाठी महानुभाव आचार्य पूर्वजांनी महानुभाव पंथासाठी अनेक संघर्ष केले. 

काहींनी स्वतःच्या जीवनापेक्षा धर्माला जास्त महत्त्व दिलेले आहे. उदाहरण सांगायचे झाल्यास सुंदर बोल्हाईसाने "धर्मभंगापसि आत्मघात चांग" (महानुभाव अन्वयस्थळ) असे समजून स्वतः बिडकीन, जि. औरंगाबाद येथील जीवनकुपिकामध्ये आत्मसमर्पण केले; पण आपला धर्म परक्याच्या हातात जाऊ दिला नाही. 

अनेक स्मृत्यांचे आदर्श आपल्या दृष्टीपुढे आहेत. श्री नागदेवाचार्यांनी अटणास मनाई केली असताना रामदेव म्हणाले, “गोसावियांनी म्हणितले ते करू की, तुम्ही म्हणितले ते करू...." हा मी मरणासाठीच जातोय, असे म्हणून मरण स्वीकारले; पण धर्म भंगू दिला नाही. श्री दंतेगोपाळबास यांनी तर, “माझा आचार आहे, जिथे भिक्षा केली तिथेच बसून भोजन करू नये, भिक्षान्न नाही मिळाले तरी चालेल; पण मी माझा धर्म भंगू देणार नाही." शेवटी तिसऱ्या दिवशी अन्नाविण मेले; परंतु धर्म भंगू दिला नाही. 

भट्टोबास धर्म निरूपण करीत असताना “एकाशी प्रसाद आलंबन, एकाशी साधा आलंबन, एकासी मी आलंबन..." ऐसा कवण मायेच्या पोटी उपजेल जो देशावर खांडे काढून जाए...” तेव्हाच, तेवढ्याच आवेशाने कोथळोबास उठले, "हा नव्हे कोथळा..." अशा वेळी कोथळोबासांची प्रशंसा भट्टोबास करतात. 

नाती नागाइसा हिने विचार केला, जे माझे गुरूवर्य आचार्य भट्टोबास यांनी मला मनाई केली होती, “अधिकारावांचून छिन्नस्थळीची .लीळा कव्हणाप्रती न सांगावी" ती गुरूआज्ञा मी भंग करून आचार्य कवीश्वरबासाला लीळा सांगितली, आता उत्कृष्ट वैराग्य करून, देह क्षेपल्यावांचून उपयोग होणार नाही. असे समजून सप्तशृंगी, ए. वा. छत्रसिंगी पर्वतावर देह क्षेपला. 

अशा अनेक आदर्श स्मृती आहेत ज्या आम्हाला धर्माला धर देण्यास सांगतात.

चितळे इतिहास पेज नं. २२० ते २२८ व्या आधारानुसार आणि महानुभावीयांचे अन्वयस्थळ या नुसार “रिद्धपूर येथील यवनाची मशीद" औरंगजेब बादशहा इ.स. १६५४ ते १६५७ या काळात दोनदा दक्षिण महाराष्ट्राच्या सुभेदारीवर होता. छत्रपती शिवाजींच्या मृत्यूनंतर दोन वर्षांनी १६८२ मध्ये दक्षिणेस उतरला. त्याने आदिलशाही (विजापूर), कुतुबशाही (बीदर) यांच्या राज्यावर स्वारी केली. त्यावेळी इ. स. १६८७ हिजरी १०९६ म्हणजे शके १६०९ मध्ये तो रिद्धपूरला आला आणि ऋद्धपूर येथील अन्य देवतांच्या काही मूर्त्या फोडल्या. त्यानंतर महानुभावीयांच्या राजमठात शिरला. त्यावेळी रिद्धपूर राजमठाचे पुजारी, गृहस्थ श्री. किसनराव होते. महत्त्वाचे असे की, आज राजमठातील मूर्ती श्रीप्रभूंच्या संबंधित आहे.

राजमठातील नृसिंहाच्या मूर्तीला फोडण्याकरिता मूर्तीला छन्नी (छडी) लावली; पण छन्नी लावताच त्या मूर्तीतून प्रकाश निघाला. ते पाहून औरंगजेबास आश्चर्य वाटले आणि "यहा पर मेरे अल्ला का अधिष्ठान है।" असे समजून मूर्तीस नमस्कार करून त्या जागेवर नमाज पडला आणि तिथून निघून गेला. 

दुसऱ्याचं चांगलं ते माझ्या बापाचं म्हणण्याची परंपरा भारत वर्षात अन्य लोकांची फार पूर्वीपासूनच आहे. औरंगजेब बादशहा तिथून निघून गेल्यावर तेथील मुस्लिमांनी औरंगजेबाचे अनुकरण करून राजमठात नमाज पडण्यास सुरूवात केली. मग काही दिवसांनी हे आमच्या अल्लाचे स्थान आहे म्हणून जबरदस्तीने “महंमदशहा" या मुस्लिमांने राजमठातील नृसिंहाच्या मूर्तीच्या जागेवर मशीद बांधली; पण मुख्य नृसिंह मूर्तीला स्पर्श केला नाही. 

मशीद बांधते वेळी विदारनृसिंह व योगनृसिंह अशा दोन मूर्त्या मशीदीच्या कॉलममध्ये दाबल्या गेल्या, त्यावर इमारत उभी केली. इ. स. १६८७ म्हणजे शके १६०९ पासून त्या मशीदीत मुस्लिम नमाज पडू लागले, परंतु त्यांच्या मशीदीचा दरवाजा राजमठातून होता. मुस्लिम पायात पादत्राणे घालून मशीदीमध्ये जायचे. म्हणून शके १८८० मध्ये महानुभावीय मंडळींनी उपाध्य आम्नाय आचार्य श्री हरिराज बीडकर बाबांच्या नावे अमरावती कोर्टात कार्यवाही केली, तिथे यवनांचा पराभव झाला. 

मुस्लिमांनी महानुभावीयांना विनंती केली. तेव्हा त्यांची दया करून आचार्य श्री. हरिराज बीडकरबाबा यांनी शके १८२४ म्हणजे इ. स. १९०२ मध्ये राजमठाच्या पूर्वेकडून भिंत बांधली; पण नरसिंहाची मूर्ती आजच्या राजमठात घेतली, आपला राजमठ वेगळा केला, जो आज आहे. मशीद मात्र श्रीप्रभूंच्या काळातील राजमठाला घेऊन आहे. 

नरसिंह मूर्तीच्या जागेवरच आहे. भविष्यातील हिंसाचाराला सन्मुख जायचं नाही, रक्तपात होऊ द्यायचा नाही, असा विचार करून महानुभाव पूर्वजांनी संघर्ष केला आणि आपले धर्मसंवर्धन केले.

इ. स. १९०७ साली एणगाव पूर्व खान्देश येथील कीर्तनकार विष्णुबुवा जोग. महानुभाव पंथाच्या उत्पत्तीबाबत खोडसाळ विधाने करून पंथास बदनाम करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांच्याविरूद्ध जळगाव येथील कोर्टात 'मि. बोलस सर यांच्या कोर्टात खटला आपल्या महानुभावीयांतर्फे रा. न. आपटे हे वकील होते. तसेच माननीय श्री. लोकमान्य टिळक हे आपल्या पक्षाकडून होते. 

तेव्हा कोर्टाने जोगावर, इं. पि. कोड ५०० अन्वये दावा दाखल केला; परंतु त्याचवेळी मुंबईतील एक युरोपियन सॉलिसिटर जनरल तिथे हजर झाले. त्यांनी इंपिरियल गॅझेटिअर व्हालूम १२, पृ. क्र. ८२ मध्ये महानुभाव पंथाविषयी जी खोटी माहिती होती ती त्याने कोर्टासमोर आणून दिल्यामुळे जोग निर्दोष सुटला. ही खोटी माहिती सरकारच्या नजरेत कोणी आणून दिली? प्रश्नच पडतो..

त्यावेळी पूर्व खान्देश (जळगाव) जिल्ह्याचे त्यावेळचे कलेक्टर मेहेरबान "मि. सिन्क्रॉक्स" यांच्याकडे तपासणी अर्ज करण्यात आला. इंपिरिअल गॅझेटिअर व्हालूम १२, पान ८२ मध्ये महानुभाव पंथाविषयी दिलेला मजकूर सपशेल खोटा आहे असे ठरवून त्या ऐवजी सदरील पंथाची साधार माहिती प्रसिद्ध केल्यावाचून या वादाचा कायमचा निकाल लागणार नाही, असा अँड. केशव आप्पा पाध्ये यांनी तत्कालीन महानुभाव महंतास सल्ला दिला. 

त्यानुसार प्रथम महानुभाव महंतांनी आपले धर्मग्रंथ वकील श्री. केशव पाध्ये साहेबांकडे दिले. त्यांच्या मदतीने 'हेमाडपंत ग्रंथाचे लेखक श्री पाध्ये यांनी इंग्रजी भाषेत लेख तयार केला. त्यावेळी मुंबईचे कलेक्टर ए. एम. टी. जॅक्सन या नावाचे एक सिव्हिलीयन होते. त्यांचे मराठी आणि संस्कृत भाषेवर प्रभुत्व होते. त्यांनी "Folklore" नावाचे पुस्तक लिहिले होते. अॅडव्होकेट श्री. पाध्ये साहेबांनी तो लेख "जॅक्सन" साहेबांना दाखविला. त्यांनी महानुभाव ग्रंथातील समर्पक उतारे वाचून निबंधातील मजकुराच्या खरेपणाबद्दल खात्री करून घेतली. 

इंपिरियल T गॅझेटिअरमधील महानुभाव पंथासंबंधी प्रसिद्ध झालेला खोडसाळ मजकूर काढून टाकण्याबद्दल श्री. पाध्ये साहेबांनी मे. एन्थोव्हेन साहेबांना शिफारसपत्र लिहून विनंती केली. विनंतीला मान देऊन एन्थोव्हेनने हे सर्व काम केले, परंतु दुसरा खरा मजकूर लिहिण्याचे काम डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांनी केले. त्यांनी डॉ. एन्थोव्हेन यांच्या मदतीने एथ्नालॉजिकल इ. स. १९०९ च्या सर्वेतील मोनोग्राफ १३१ नंबरमध्ये महानुभाव पंथाबद्दल खरी माहिती देण्यात आली. 

ही माहिती महानुभाव ग्रंथ संग्रहालयात मिळेल. कवी हरदास यांच्या शब्दात सांगायचं झाल्यास "गणेश बोले बहु आदराने। उंदीर नेला मुनी मांजराने ॥” असे मात्र महानुभावीय आचार्य पूर्वजांनी होऊ दिलं नाही. प्रस्तुत सर्व महानुभाव आचार्य पूर्वजांचे धर्मसंवर्धनाचे प्रयत्न फारच मोलाचे आहेत.

सुमारे पाचशे वर्षांपूर्वी महंत श्री. मुरारमल्लबाबा आणि उपाध्य महंत श्री. संतराजबाबा बीडकर यांच्या काळात खूपच दुष्काळ होता. अशा परिस्थितीमध्ये आपल्या पंथाला मोलाचे सहकार्य करणारे खान्देशातील वीरवाडे या गावची सौ. कुकाई आवा पाटलीण यांनी महानुभाव पंथाला द्रव्य, धान्य, पैसा, पासोडी (वस्त्र) देऊन तथा

अर्ज करण्यात आला. इंपिरिअल गॅझेटिअर व्हालूम १२, पान ८२ मध्ये महानुभाव पंथाविषयी दिलेला मजकूर सपशेल खोटा आहे असे ठरवून त्या ऐवजी सदरील पंथाची साधार माहिती प्रसिद्ध केल्यावाचून या वादाचा कायमचा निकाल लागणार नाही, असा अँड. केशव आप्पा पाध्ये यांनी तत्कालीन महानुभाव महंतास सल्ला दिला. 

त्यानुसार प्रथम महानुभाव महंतांनी आपले धर्मग्रंथ वकील श्री. केशव पाध्ये साहेबांकडे दिले. त्यांच्या मदतीने 'हेमाडपंत ग्रंथाचे लेखक श्री पाध्ये यांनी इंग्रजी भाषेत लेख तयार केला. त्यावेळी मुंबईचे कलेक्टर ए. एम. टी. जॅक्सन या नावाचे एक सिव्हिलीयन होते. त्यांचे मराठी आणि संस्कृत भाषेवर प्रभुत्व होते. त्यांनी "Folklore" नावाचे पुस्तक लिहिले होते. अॅडव्होकेट श्री. पाध्ये साहेबांनी तो लेख "जॅक्सन" साहेबांना दाखविला. त्यांनी महानुभाव ग्रंथातील समर्पक उतारे वाचून निबंधातील मजकुराच्या खरेपणाबद्दल खात्री करून घेतली. 

इंपिरियल T गॅझेटिअरमधील महानुभाव पंथासंबंधी प्रसिद्ध झालेला खोडसाळ मजकूर काढून टाकण्याबद्दल श्री. पाध्ये साहेबांनी मे. एन्थोव्हेन साहेबांना शिफारसपत्र लिहून विनंती केली. विनंतीला मान देऊन एन्थोव्हेनने हे सर्व काम केले; परंतु दुसरा खरा मजकूर लिहिण्याचे काम डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांनी केले. त्यांनी डॉ. एन्थोव्हेन यांच्या मदतीने एथ्नालॉजिकल इ. स. १९०९ च्या सर्वेतील मोनोग्राफ १३१ नंबरमध्ये महानुभाव पंथाबद्दल खरी माहिती देण्यात आली. ही माहिती महानुभाव ग्रंथ संग्रहालयात मिळेल. कवी हरदास यांच्या शब्दात सांगायचं झाल्यास "गणेश बोले बहु आदराने उंदीर नेला मुनी मांजराने ॥” असे मात्र महानुभावीय आचार्य पूर्वजांनी होऊ दिलं नाही. प्रस्तुत सर्व महानुभाव आचार्य पूर्वजांचे धर्मसंवर्धनाचे प्रयत्न फारच मोलाचे आहेत.

सुमारे पाचशे वर्षांपूर्वी महंत श्री. मुरारमल्लबाबा आणि उपाध्य महंत श्री. संतराजबाबा बीडकर यांच्या काळात खूपच दुष्काळ होता. अशा परिस्थितीमध्ये आपल्या पंथाला मोलाचे सहकार्य करणारे खान्देशातील वीरवाडे या गावची सौ. कुकाई आवा पाटलीण यांनी महानुभाव पंथाला द्रव्य, धान्य, पैसा, पासोडी (वस्त्र) देऊन तथा`संपूर्ण मार्गमंडळीला स्वत:कडे चातुर्मासाला ठेवून पंथाला आधार दिला. सौ. कुकाई आवा पाटलीण ही उपदेशी होती. 

त्याच काळात देवपंत पेशवे औरंगाबाद हे उपदेशी आणि श्रीमंतही होते. त्यांनी आपल्या द्रव्य, बुद्धीच्या बळावर आणि धान्य देऊन महानुभाव पंथाला आधार दिला, तसेच त्यांनी मुस्लिम लोकांच्या त्रासातून गोवर्धन (नाशिक) येथील जैतमाळी पाटील यांनाही तुरूंगातून सोडवून वाचविलं. कारण जैतमाळी पाटील उपदेशी असून, महानुभाव मार्गमंडळी चातुर्मासासाठी त्यांच्याकडे होते. त्यानंतर महानुभाव पंथाला पूर्ण संरक्षण मिळालं. 

आपले पूर्वज कष्टाने शास्त्र लिहून पोथ्यांचं ओझं डोक्यावर घेऊन वागवायचे. त्यात स्वत:चे तथा शास्त्रांचा संरक्षण करीत अटण विजन, भिक्षा, भोजन नित्य तथा निमित्त विधी आचरीत धर्माचं संवर्धन करीत होते. सौ. कुकाई आवा पाटलीण वीरवाडे खान्देश यांची चातुर्मास संपल्यानंतर महानुभाव गुरूकुल पुणतांबा इथे आले. तिथेही धान्याची तथा द्रव्याची मदत लागली तेव्हाही सौ. कुकाईबाईने मदत केली.

 कुकाई बाईकडे धान्याची तथा द्रव्याची मदत मागण्याकरिता महात्मा श्री. बाळापूरकरबाबा तथा श्री. दत्तोबास जामोदेकर दोघेही द्रव्य घेऊन येताना मार्गात चोरांनी लुटू नये म्हणून भणंगत्वे भिकाऱ्यापेक्षाही खालच्या दर्जाचे, स्वतःच्या पायाला चिंध्या बांधून, अंगाला काळं करून धान्य द्रव्याचे ओझे घेऊन आले आणि मार्गाचे रक्षण केले. महानुभाव पंथ टिकवून धर्मसंवर्धन केलं म्हणून महानुभाव पंथ त्यांच्या ऋणाला कधीही उतराई होऊ शकत नाही. या संपूर्ण आचार्य गुरूकुल महानुभाव परंपरेला कोटी-कोटी विनम्र दंडवत, ज्यांनी धर्मसंवर्धन केलं.

ज्ञानवैराग्यसंयुक्ता भक्तिभावसमन्विताः वंद्याः सर्वजनैर्नित्यं महानुभावाः

अशा ज्ञान, भक्ती, वैराग्याने परिपूर्ण जे संपूर्ण गुरूकुळाला मान्य झालेल्या आचार्य पूर्वज परंपरेला पुनश्च दंडवत प्रणाम.

लेखक :- ई. श्री. प्रेममुनी शास्त्री महानुभाव 


Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post