" वंदे श्रीचक्रधरम्"
प्रायश्चित म्हणजे आत्मकल्याणासाठी केलेली "आंघोळ"! महानुभाव पंथिय ज्ञान सरिता-Mahanubhavpanth dnyansarita
"प्रायश्चित" हा शब्द लौकिक क्षेत्रात सर्वसाधारण लोकांच्या चांगलाच परिचयाचा आहे, "प्रायश्चित" हा शब्द उच्चारल्या बरोबरच सर्व साधारण माणसाचे लक्ष पूर्वीच्या काळी महाराष्ट्रातील घडलेल्या एका घटनेकडे जाते, तसेच जाणे देखील सहाजिकच आहे, त्या काळी घडलेल्या या घटनेने सर्वसाधारण माणसाच्या मनाला पोखरून टाकलेले आहे,कारण त्याकाळी काही तथाकथित मंडळींनी महाराष्ट्रातील नामवंत संतांच्या पिताश्रींना देहान्त प्रायश्चित दिले होते, त्यामूळे प्रायश्चित" म्हटले, की सर्व साधरण माणसांच्या मनाचा थरथरकाप होतो,
म्हणून सर्वसाधारण माणसाला एवढेच कळते, प्रायश्चित" म्हणजे ज्याच्या हातून पाप घडले, त्याला प्रायश्चित" प्रमाणे शासन मिळते, असे सर्व साधारण लोक हा विचार लौकिक क्षेत्रात करतांना पहावयास मिळतात, पण हा तथाकथित लोकांचा विचार लौकिक दृष्टीने मानवतेला शर्मनाक करणारा होता.
खऱ्या अर्थाने "प्रायश्चित" त्याला म्हणतात, स्वतःचे दोष शोधून त्याची भगवंताकडे साधू संताच्या माध्यमातून दुःख पूर्वक माफी मागणे, त्याला "प्रायश्चित" म्हणतात. अशा "धार्मिक प्रायश्चित विधी" महानुभाव पंथात देहान्त होण्याचा अगोदर करतांना बहुतांशी साधूसंत दिसत असतात. "प्रायश्चित" शब्दाचा अर्थ होतो. १) परिशोध, २) पापनिष्कृति, ३) पापाचा नाश करण्यासाठी केलेली धार्मिक साधना,
महानुभाव पंथात "प्रायश्चित" विधीला फार अनन्यसाधारण महत्त्व आहे, पुढिल जन्माचे भले करून घ्यावयाचे असेल, तर "प्रायश्चित विधी" करणे अतिशय महत्त्वाचे आहे.
"प्रायश्चित " म्हणजे घडलेल्या दोषांची माफी मागणे, प्रायश्चित म्हणजे - मनासहीत सर्व इंद्रियांना घातलेली "आंघोळ" म्हणजे प्रायश्चित, ज्या प्रमाणे शरीराला दररोज स्नान घातल्याने शरीराची शुद्धता होते,आणि शरीराच्या ठिकाणी तरतरी येथे, तद्वत दररोज प्रसव देवापूढे किंवा अधिकरणाच्या जवळ जाऊन मोडला, तर अंतकरणाच्या ठिकाणी अलौकिक प्रसन्नता प्राप्त होते.
"प्रायश्चित" म्हणजे पूर्वी घडलेल्या तसेच वर्तमान काळात घडत असलेल्या दोषावर चित्ताची नजर फिरवून एवं अतिशय सूक्ष्म दोषांचा शोध घेऊन त्या पापाचा नाश करण्यासाठी धार्मिक साधना करणे, एवं अनुष्ठान करणे, असे धार्मिक अनुष्ठान केल्यावर पापाचा एवं दोषाचा नाश होतो, हे मात्र तितकेच महत्त्वाचे आहे,
कारण मनुष्य जन्म लाभलेल्या व्यक्तीच्या हातून कोणतेना कोणते अनेक दोष घडत असतात, मग ते सप्त व्यसनांचे असतील, कारण हा जीव अनंत सृष्टी पासून दोषाने भरलेला आहे,
सर्वज्ञ श्रीचक्रधरस्वामी म्हणतात-
पृथ्वीची पाटी केली, डोंगराची लेखनी केली, समुद्राची शाई केली, तरी जीवाचे दोष उरलेलेच आहे, एवढा जीव दोषाने भरलेला आहे, म्हणून दोषाचे प्रायश्चित करने अत्यंत आवश्यक आहे.
हिंसा दोष - ग्रहस्थाश्रमात असेल तर झाडे तोडणे, गवत कापणे, सारवणे, प्राण्यांची हिंसा साप, विंचू मारणे, शेतीची कामे करातांना प्राण्यांना मारझोड करणे, एखाद्याला विष देणे, किंवा स्वतः विष खाणे, शस्त्राने एखाद्याची हत्या करणे, किंवा दुसऱ्या करवी सुपारी देऊन घातपात करणे, किंवा स्वतः आत्महत्या करणे, अशा दोषाने हिंसक पापं घडत असतात, अशा हिंसा दोषांचा ऊल्लेख अधिकरणा जवळ करायचा असतो.
आणि अधिकरण जीवाचे दोष नासण्यासाठी देवाला प्रार्थना एवं विनंती करीत असतात.
विकारदोष - स्त्रीयांकडे किंवा स्त्रीयांनी पुरूषाकडे वासना दृष्टीने पाहाणे, ग्रहस्थाश्रमी असेल, तर आपली पत्नी सोडून, दुसऱ्या स्रीकडे आकर्षित होणे, किंवा एखाद्या स्त्रीला द्रव्ये आदीने फूस लावणे, सतत विकार वासनेच्या गोष्टी करणे, आदि दोषांचा अधिकरणांच्या समोर उक्त करुण प्रसव मोडणे, म्हणजे त्या दोषांचा नाश होतो, व पुढिल सृष्टीतील जन्मात अडथळे ठरत नाही,
विकल्प दोष - परमेश्वर भक्ती सोडून देवता भक्ती करणे, मंत्र तंत्र करणे , देवतेचे मंत्र उतरविणे, गंडे, धुपारे करणे, दुसऱ्याची प्रगती सहन न झाल्यामूळे "करणी" आदी करणे, देवतेची निंदा करणे, हे विकल्प दोष जर परमेश्वर भक्ताने केले, परमेश्वर अतिशय उदास होतात, अशा दोषांचा उल्लेख करून अधिकरणा जवळ प्रायश्चित करणे, म्हणजे पूढिल जन्मी हे दोष उभे राहात नाही.
तथा
१) मानसीक दोष,
२) वाचीक दोष,
३) शारीरिक दोष,
अशा वरील दोषांच्या संदर्भात लीळाचरित्रात बरेच उदाहरण पाहावयास मिळतात.
मानसिक " दोषाच्या संदर्भात सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी छिन्नस्थळी येथे विराजमान असतांना, सर्वज्ञांच्या भोवती बर्याच स्त्रीया बसलेल्या आहे, स्वामींचे निरोपण चालले आहे, स्वामींच्या दर्शनाला सारंगपंडीत दर्शनाला आलेले आहे, आणी स्वामींच्या भोवताली बसलेल्या स्त्रीयांना पाहिले, आणि मनात दोषरुपी भावना मनात झाली.
"कैसीया गुलगुलीया सातसीया परवडी वेढूनि बैसलीया असति आवघीया नेऊन घालावीया तेलंगदेशी मग कांडवावे कोंदे" आपण असिजे गोसावीयांच्या सन्निधानी” असा मनात विकल्प केला,असे म्हणत म्हणत स्वामीपासी आले, स्वामी सांरग पंडीताला म्हणतात, "यासि करा गा ते"
जीः जीः मीची आपणेयासी करीन" जे वस्त्र नेसून स्वामींच्या दर्शनाला आले होते, त्या वस्त्रानीशी पाण्यात बसले, असा मानसीका" दोषाच्या संदर्भात प्रसंग पाहावयास मिळतात, जीवन प्रवासात माणसाच्या मनात अनेक दोषरूप मानसिक उल्लेख होतात, त्या उल्लेखांचा उल्लेख करून मनाला प्रायश्चित रूपी आंघोळ घालणे.
[ली.च.उ,१०१]-
वाचीक दोष .. वाचेच्या द्वारे घडणारे दोष, मग जाणून-बुजून बुजून चेष्टेने स्वार्थी बुद्धीने कोणाला टोचून बोलणे, या संदर्भातील पुर्वार्धात लई. क्र, ३७५]
["प्रमाण अनुभव-
नामकरणी पदुनाभी
सीक्षापण"]
"हा दोष! वाचीक दोषाच्या संदर्भात पाहावयास मिळतो, परमाणुभवदेव मोठ्या मान्यतेचे पूरुष होते, मोठ्या किंमतीच्या पानांचा विडा खाण्यासाठी लागत होता
स्वामी शिष्य पदुनाभी (पद्नाभी )नागझरीकडे कपडे धुण्यासाठी गेले होते, तेथे परमानुभव देवाचे शिष्य आले होते, पद्नाभीने त्याला विचारले आपल्या गुरूचे नाव काय?
तेव्हा तो म्हणाला, प्रमाण अनुभवदेव! पद्मनाभीने शब्दछल केला, पद्नाभी म्हणाला, तुमच्या गुरुचा अनुभव काई परमाणु इतकाच, त्याने आपल्या गुरूला जाऊन सांगितले, त्यांना पद्मनाभीचा अतिशय राग आला.
इकडे पद्मनाभी बिढाराला आले, स्वामी बाइसाला म्हणतात, पद्मनाभीला आतमधे येऊ देऊ नका, दरवाजे बंद करा, बाइसा स्वामींना म्हणते, का बाबा? स्वामी म्हणतात. हा प्राणीयाचे चैतन्य पोळून आला असे, याचे एथोनी याचे मुख न पाहिजे.
मग बाईसाने दरवाजे बंद केले, इतक्यात पद्नाभी आले, दरवाजे बंद पाहिल्यावर दुःख करु लागले, बाइसाला प्रेम निर्माण होऊन, देवाला विनंती करते, आतमधे येऊद्या बाबा, मग स्वामी म्हणतात, पद्नाभीने शेणमाती अंगाला लावून प्रमाणअनुभदेवा पूढे जाऊन, "प्रायश्चित" करावे, ते जर त्यांना घेऊन आले, तरच घरात घेऊ!
मग बाईसाने सर्व वृतांत पद्मनाभीला सांगितला, त्या पद्धतीने पद्मनाभीने प्रायश्चित केले, असा घडलेला वाचीक दोष दूर केला.
["घोडाचुडीसीक्षां
सांगातु"ली, पु, ३६"
शारीरिक दोष --
["जोगरेया अनुतापानुवादु ] ली.क्र,उ.-५१३,
पुर्वाध -३५ पंचकुळ आचार्य ग्रहो नीवृति.. विषाच्या संदर्भात ..
काळबोटा...उ, ली. २४४/
["बाइसाकरवी काळबोटा दवडणे,"]
चोरी संदर्भातील,
["मार्कंड मोदक चोरी प्रगटीए करणे "]
लई, उ, २४१
म्हणून प्रायश्चित" हे एक माणसाच्या शाश्वत कल्याणाची "आंघोळ" आहे.
हि प्रायश्चिताची आंघोळ" प्रत्येक माणसाने अधिकरणा जवळ जाऊन, अधिकरणाला प्रार्थून "प्रायश्चितरुपी" आंघोळ" करणे अतिशय गरजेचे आहे, म्हणून जीवनात प्रायश्चित करणे अतिशय महत्वाचे आहे.
शाश्वत कल्याणासाठी श्रेष्ठ लाभासाठी प्रायश्चिताची अत्यंत अवश्यकता आहे.
असो!
दंडवत!
महंत श्रीजयराज शास्त्रीजी !(साळवाडी ) पुणे