पाच पांडवांनी एका रात्रीत लेण्या कोरल्या? - सत्य जाणून घ्या पांडव लेणी-pandav leni(caves)

पाच पांडवांनी एका रात्रीत लेण्या कोरल्या? - सत्य जाणून घ्या पांडव लेणी-pandav leni(caves)

 पाच पांडवांनी एका रात्रीत लेण्या कोरल्या? - सत्य जाणून घ्या

पांडव लेणी-pandav leni(caves) 

पाच पांडवांनी एका रात्रीत लेण्या कोरल्या अशी दंतकथा सांगितली जाते. महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पांडव लेणी आहेत. नाशिक जिल्ह्यातही पांडवलेणी आहे. तिथे ७०० वर्षांपूर्वी पाली भाषेत शिलालेख लिहिलेले आहेत. त्या वरून हेच सिद्ध होते की त्या पांडवलेण्याही २००० वर्षांपूर्वीच्याच कोरलेल्या आहेत. पांडवांचा त्या लेण्यांशी काही संबंध असेल असे वाटत नाही. पांडवांची ज्या ठिकाणी वास्तव्य झाले होते ही केवळ दंतकथा वाटते. नाशिक जवळच्या पांडव लेण्यांमध्ये एकूण २४ लेणी कोरलेल्या आहेत. 

आज काही लेण्या जशाच्या तशा आहेत व त्यातील अनेक मूर्त्या चांगल्या यथास्थित स्वरुपात आहेत तर काही मुर्ति खंडीत स्वरुपात उरलेल्या आहेत. तिथे कोरलेल्या लेपांमध्ये बुध्दस्तुप आहेत, बौद्ध भिक्षूंना राहण्यासाठी निवासस्थाने कोरलेली आहेत, जैन तीर्थकर ऋषभदेव यांची मुर्ति ही कोरलेली आहे, वीर मणिभद्र यांच्या मुर्ति, अंबिकादेवी यांच्या मूर्त्या, पाच पांडवसदृश मूर्त्याही कोरलेल्या आहेत, भीमाची गदा, कौरवांच्या मूर्त्या, इंद्राची सभा, इतरही अनेक देवादिकांच्या अनेक मूर्त्या या सर्व लेण्यांमध्ये कोरलेल्या आहेत. त्या सर्व मूर्त्यांची शिल्पकला अवर्णनीय, अद्भुत असुन, वाखाणण्यासारखी आहे. 

यवतमाळ जिल्ह्यात सह्याद्री पर्वतावर पांडवलेणी नावाची लेणी आहे. तिथे ७०० वर्षांपूर्वी परब्रम्ह  परमेश्वर अवतार श्री चक्रधर स्वामी उत्तरेकडे निघून गेल्यानंतर परब्रह्म परमेश्वराचे अवतार श्रीगोविंद प्रभुंच्या आज्ञेने महानुभाव पंथाचे आद्य आचार्य श्रीनागदेवाचार्य हे माहूर येथे श्रीदत्तात्रय प्रभूंच्या दर्शनासाठी सह्याद्री पर्वतावर आले. तेव्हा त्यांनी त्या पांडव लेण्यांमध्ये तीन दिवस मुक्काम केला होता असा उल्लेख स्मृतीस्थळ या ग्रंथात आढळतो. 

नंदुरबार जिल्ह्यात शहादा तालुक्यात गोमाई नदीच्या तीरावर अशाच काही लेण्या कोरलेल्या आहेत त्यांनाही लोक पांडवलेणी असे म्हणतात. पण वास्तविक तिथे जैन तीर्थंकरांच्या मूर्ती आहेत. त्यावरून हे सिद्ध होते की दोन हजार वर्षाच्या आतच त्या लेण्या कोरलेल्या आहेत पांडवांचा त्या लेण्यांची काहीही संबंध नाही. 

पांडव लेणी' मधील 'पांडव' या शब्दाचा महाभारतातील पाच पांडवांशी काही संबंध नाही. संस्कृतात 'पण्ड्' ही एक धातु आहे. 'पण्डयति' म्हणजे 'ढीग करणे'. त्यावरून  'पण्डव'/'पाण्डव' असा शब्द तयार होतो. त्याचा अर्थ 'डोंगर' किंवा 'खडकाळ प्रदेश' असा होतो. ललितविस्तरसूत्रात 'पाण्डव' नामक डोंगराचा उल्लेख येतो. हा शब्द संस्कृतात फारसा वापरला जात नाही, पण प्राकृतांतून तो आधुनिक भाषांत आला. तर 'पांडव लेणी' म्हणजे 'डोंगरात/खडकात कोरलेली लेणी'. पुढे नामसाधर्म्यामुळे लोकांनी त्याचा संबंध महाभारतातल्या पांडवांशी आणि त्यांच्या वनवासाशी जोडला. 

या पांडव लेण्यांवर त्यासंदर्भात अनेक आख्यायिका रचल्या गेल्या. वास्तवात पांडव त्यांच्या वनवास आणि अज्ञातवासाच्या काळात महाराष्ट्रात जिथे लेणी आहेत त्या प्रदेशात कधी आलेच नाहीत. त्यांचा वनवासाचा बराचसा काळ उत्तरभारतातच गेला. असे संशोधकांचे म्हणणे आहे. पण पाण्डवांनी वनवास काळ बरेच वर्ष महाराष्ट्रात घालवला. हेही महाभारत पाहताना लक्षात येते. 

जसं आजचे एरंडोल हे तालुक्याचे शहर महाभारत काळात एकचक्रा नगरी म्हणून प्रसिद्ध होते. आणि दंडकारण्यात पांडव बरेच वर्षे होते. दंडकारण्य म्हणजेच आजचा मध्य महाराष्ट्र होए. द्रौपदी स्वयंवराच्या वेळी पांडव महाराष्ट्रातच होते. आणि अज्ञातवासाच्या काळात पांडव विराट नगरीत राहिले. आजचे वाई शहर त्या काळातली विराट नगरी होती. 

 पांडव लेणीतील शिल्पे

महाराष्ट्रातील बहुतांश लेणी ही मौर्य काळ आणि त्यानंतरची आहेत.

महाभारतातील अप्रसिद्ध महायोद्धा सात्यकी 👇 अर्जुनाचा एकमेव शिष्य 

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/06/mahabharatatla-ek-aprasiddh-yoddha.html


Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post