विद्या व विद्वान हेच खरे, समाजाचे कल्याण करणारे धन
भारतीय संस्कृती ही
विद्वानांचा गौरव तथा पुरस्कृत करणारी संस्कृती आहे.ज्या व्यक्तिने संपूर्ण जीवन
ज्ञानार्जाना साठी समर्पित केले आहे. ज्ञानार्जन करीत असतांना त्यांनी कधी सुखाचा
विचार केला नाही. केवळ ज्ञानसाधना हेच आपले ध्येय ठेवले,त्या ज्ञान साधनेसाठी शरीराची मान पाठ एक करून रात्रीचा दिवस करुन
ज्ञानाला एवं विद्येला आत्मसात केले. असे आत्मसात केलेले शास्त्र एवं विद्या जिज्ञासूंना एवं आर्तवंताना देखील
प्रदान केली. अशा विद्वान व्यक्तिचा गौरव समाज एक दिवस निश्चितच करीतच असतो. हे
मात्र तितकेच खरे आहे.
विद्याधन या
विश्वातील अतिशय सर्व श्रेष्ठ धन आहे. इतर
कितीही भौतिक धन मिळविलेले असो! मग ते भौतिक धनरूपी सोने असो की, पैसा असो! या धनाची चोरी कधीकाळी कदाचित् होऊ शकते. किंवा या धनाचे
संरक्षण करता करता प्राण जाऊ शकतो. किंवा जीवीत हानी होऊ शकते. विद्याधनाचे वैशिष्ट्य
एक असे की,विद्या
धनावर टॕक्स बसत नाही.एवं कर लागत नाही.
विद्याधनात आपला सख्खा भाऊ,बायको, मुले,
मुली, मैत्रीण वाटा मागू शकत नाही.
या संसारातील कोणताही "चोर" असो! मग तो अट्टल दरोडेखोर का असेना!तो विद्याधन "चोरुन नेऊ शकत नाही. एखाद्या देशाचा सम्राट राजा देखील हिरावून घेऊ शकत नाही. "विद्या" हि वस्तू ओझ्याप्रमाणे डोक्यावर भार होऊ शकत नाही. इतरांना प्रबोधन केल्याने, "विद्येत" अधिक वाढ होते. म्हणून सर्वधनात विद्याधन श्रेष्ठ आहे.
न
चोरहार्यं न च राजहार्यं
न
भ्रातृभाज्यं न च भारकारि।
व्यये
कृते वर्धत एव नित्यं
विद्याधनं
सर्वधनप्रधानम्।।
सर्व द्रव्यांमधे विद्या हेच अत्युत्तम धन आहे.
असे (सुज्ञ) लोक म्हणतात. कारण विद्याधन लूबडता येत नाही. त्याची किंमत करता येत
नाही. आणी ते कधी नाश पावत नाही.
सर्व
द्रवेषु विद्यैव द्रव्यमाहुरनुत्तमम्
अहार्यत्वादनर्घ्यत्वाद
क्षयत्वाच्च सर्वदा ।।
विद्या धनावाल्या व्यक्तीकडे
कोणातच डामडौल एवं दिखावा नसतो, लोकांवर
छाप टाकण्यासाठी चेले चाटूकांराची गरजही भासत नसते. "विद्याधन " मनुष्याच्या सौंदर्या पेक्षाही
चिरकाळ टिकणारे "धन" आहे, "सौंदर्य! हे
मनुष्याचे जो पर्यंत तरुण्य आवस्था आहे. तो
पर्यंतच " सौंदर्य टिकणारे आहे. एक
दिवस या शरीराचे "सौंदर्य" नष्ट होणारे आहे. "सौंदर्य नष्ट
झाल्यावर लोक त्या व्यक्तीकडे ढुंकून सुध्दा पाहात नसतात.
"विद्यारूपी
सौंदर्य" हे शरीर जोपर्यंत आहे, तो पर्यंत सौंदर्य" हे सतत तरतरीत तरुण राहाणारे आहे.पुन्हा ते गुप्त
धन आहे. "विद्याधन" कोणाच्या डोळ्याला दिसणारे नाही. इतर धनामुळे माणूस
कदाचित् माणसांच्या डोळ्यावर येऊ शकतो. पण विद्याधनाचा व्यक्तीला
पाहिल्याबरोबर मात्र माणसांच्या डोळ्यांत
प्रसन्नता निर्माण होत असते. "विद्याधन" माणसाला
या समाजात "किर्ती, यश मिळवून देणारे आहे. असा व्यक्ती
समाजत चैतन्य निर्माण करीत असतो.
"विद्या" हि माणसाची खरी गुरु आहे. विद्या देणारा देहधारी गुरु
कोणाच्या आयुष्याला पुरत नसतो. त्याचे शरीर निसर्ग नियमा प्रमाणे कधीतरी नष्ट
होणारे आहे. म्हणून "विद्यारुपी" गुरु जो पर्यंत चंद्र सूर्य आहे तो
पर्यंत शाश्वत राहाणार आहे. विद्येला बंधू म्हटलेले
आहे. परदेशात कदाचित आपला सख्खा बंधू काही कामे असल्यामूळे सोबती येणार नाही. पण विद्या मात्र माणसाच्या सतत
संगाती राहात असते. विद्या" हि येण्यासाठी कधीच तोंड मुरडणार नाही. मागे
सरकणार नाही.ऊलट ती माणसाला प्रोत्साहित करेल.
"विद्या" ही
स्वदेशात असो किंवा परदेशात असो! माणसाची कधीच साथ सोडणारी नाही. एखाद्याचा भाऊ
जसा भावाच्या पाठीमागे ऊभा राहातो तसी विद्या पाठिसी उभी राहते. म्हणून ती महान
देवा प्रमाणे आहे. राजे लोकांना सर्व धनात, विद्याधन पूजनीय
वाटते. अशा विद्वान व्यक्तिचा राजे लोक गौरव, तथा पुरस्कार
देऊन आदर करीत असतात. विद्या नसलेल्या व्यक्तिला पशू म्हटलेले आहे.
"विद्या
नाम नरस्य रुपमधिकं प्रच्छन्न गुप्तं धनं ।
विद्या
भोगकरी यशः सुखकरी विद्या गुरुणां गुरुः।
विद्या
बन्धुजनो विदेशगमने विद्या परा देवता।
विद्या
राजसु पुजिता न तु धनं विद्याविहीनः पशुः।।
म्हणून या विश्वात विद्ववान
तथा विद्येला सर्व श्रेष्ठ मानल्या गेले आहे.विद्ये मुळे माणसाचे आचरण देखील ऊत्तम
राहाते. सारासार विचार करण्याची शक्ति माणसामधे निर्माण होते. ज्ञानामुळे माणूस
सुशिक्षित व सुरक्षीत होतो. मनुष्याकडे विद्याधन असल्यामुळे त्या विद्येमुळे विनय
प्राप्त होतो.विनयाने पात्रता प्राप्त होते. पात्रतेने धन प्राप्त होते. धनाने
धर्म प्राप्त होतो. धर्माने सुख प्राप्त होते.
विद्या
ददाति विनयं विनयाद्याति पात्रताम्।
पात्रत्वाद्धनमाप्नोति
धनाद्धर्मं ततः सुखम् ।।
विद्येच्या संदर्भात बरेच
प्रमाण पाहाण्याला मिळतात. ते पुढीलप्रमाणे !
हर्तुर्याति
न गोचरं किमपि शं पुष्णाति यत्सर्वदा
ह्यर्थिभ्यः
प्रतिपाद्यमानमनिशं प्राप्नोति वृद्धि पराम् ।
कल्पान्तेष्वपि
न प्रयाति निधनं विद्याख्यमन्तर्धनं,
येषां
तान्प्रति मानमुज्झत नृपाः कस्तैः सह स्पर्धते ।।
या पद्यात विद्येच्या
संदर्भात वर्णन करतांना म्हटलेले आहे. ज्याच्या जवळ "विद्या" आहे. अशा
विद्वान व्यक्तिबरोबर कोणी स्पर्धा करू शकत नाही. कारण विद्या ही चोरणाऱ्याला दिसत नाही."विद्या" हि सूख शांतीला वाढविणारी आहे.
अभ्यासूंना विद्या दिल्या वर तिच्यात वाढ होणारी आहे, प्रलयकाळात
देखील नष्ट होणारी नाही. म्हणून भर्तृहारी
म्हणत आहे.
हे...राजांनो !
अशा विद्वानांच्या प्रति
आभिमान,
तथा तिरस्कार सोडून विद्वानांशी उत्तम व्यवहार करणे गरजेचे आहे. विद्वानांशी स्पर्धा कोणीच करू शकत
नाही. म्हणून विद्या" महान आहे. एखादा राजा आहे. किंवा सत्ताधारी परुष आहे. जो
पर्यंत सत्तास्थानावर आहे. तो पर्यंत त्याचा आदर सन्मान होतो. पण विद्वानाचे तसे
नाही. कुठल्याही देशात गेला.तरी त्याचा आदर होतो. आणि तो आदर मृत्यू होई पर्यंत
आणि मृत्यू नंतरही नावरूपाने टिकून राहात असतो.
पुढील पद्यात वरिल वर्णन
आलेले आहे.
विद्वत्वं
च नृपत्वं च नैव तुल्यं कदाचन ।
स्वदेशे
पूज्यते राजा विद्वान् सर्वत्र पूज्यते ।।
असी विद्येच्या संदर्भात
बरीच प्रमाण पहावयास मिळतात. ही लौकिक विद्या माणसाला भौतिक सुख देऊ शकतात. पण
पारलौकीक आंनद एवं शाश्वत मोक्ष देऊ शकत नाही. पारलौकीक मोक्ष एवं आनंद देणारी
ब्रम्हविद्या ही आध्यात्मिक ज्ञान आहे. गीतेमधे भगवंतानी स्पष्ट म्हटलेले आहे. अध्यात्मविद्या विद्यानां विद्यांमध्ये अध्यात्मविद्या जीवाला आनंद देणारी आहे.
परंतु सर्व विद्यांमध्ये एक ब्रम्हविद्या सोडून इतर सर्व
विद्या मानवला पतनशील सुख देणाऱ्या आहे. एवं मुक्ती देणाऱ्या आहे. पण जीवाला आंनद तथा
शाश्वत मोक्ष देणारी एकमेव विद्या" ती म्हणजे ब्रम्हविद्या! ब्रम्हविद्या हीच एकमेव परब्रम्ह परमेश्वराचा
मार्ग सांगणारी विद्याआहे. ही ब्रम्हविद्या कलीयुगात भगवान श्रीचक्रधर स्वामींनी
महानुभाव पंथाचे आद्य आचार्य भटोबांसाना सांगीतली.तसेच माइंमभटाला देखील निरोपिली.
स्रीयांमधे महादाईसा, प्रल्हादबाइसा निरोपली. परमेश्वरच परमेश्वराची जाणीव जीवाला करुन
देतात.देवतांची विद्या परमेश्वराची ओळख करुन देऊ शकत नाही. म्हणून परमेश्वर
ज्ञानाशिवाय जीवाचा ऊद्धार होऊ शकत नाही,
श्रीमद्भगवद्गीतेत ज्ञानाचा महिमा वर्णन करतां म्हटलेले आहे,
न
हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते ।।
या संसारात परमेश्वर ज्ञाना
शिवाय जीवाला कोणतीच वस्तू पवित्र करु शकत नाही. म्हणून मनुष्याने परमेश्वर ज्ञान
प्राप्त करण्यावर जास्त भर देऊन एवं ब्रम्हविद्या प्राप्त करुन घेतली, तर मानव जन्माला आल्याचे सार्थक झाले असे होईल. असो !
लेखक :- महंत श्री
जयराजशास्त्री! (बोरीखुर्दसाळवाडी)