संस्कृत सुभाषित रसग्रहण sunskrit Subhashit knowledgepandit
मात्रा समं नास्ति शरीरपोषणं
चिन्तासमं नास्ति शरीरशोषणम् ।
मित्रं विना नास्ति शरीरतोषणं ।
विद्यां विना नास्ति शरीरभूषणम् ॥
अर्थ:- आईसारखे शरीराचे पोषण करणारे दुसरे कोणी नाही, चिंतेसारखे शरीराचे शोषण
करणारे दुसरे कोणी नाही, मित्रासारखे
शरीराला आनंद देणारे दुसरे कोणी नाही व विद्येसारखे शरीराचे दुसरे भूषण नाही.
य: पठति लिखति परिपृच्छति
पण्डितानुपाश्रयति
तस्य दिवाकरकिरणै: नलिनीदलमिव विकास्यते
बुद्धि: ॥
अर्थ:- जो वाचतो, लिहितो, शंका विचारतो व पंडितांचा आश्रय घेतो, सूर्याच्या किरणांनी
कमळाच्या पाकळ्यांचा विकास होतो तशी त्याची बुद्धी (सर्व बाजूंनी) विकसित होते.
अशुश्रुषा त्वरा श्लाघा विद्याया:
शत्रवस्त्रय:
शुश्रुषा धीरता श्रद्धा विद्याया:
सुहृदस्त्रय: ॥
अर्थ:- न ऐकणे, घाई व आत्मप्रौढी हे विद्येचे तीन शत्रू आहेत तर
ऐकण्याची इच्छा,
धैर्य व श्रद्धा हे विद्येचे तीन मित्र आहेत.
विद्याधनं धनं श्रेष्ठं तन्मूलमितरं धनम्
दानेन वर्धते नित्यं न भाराय न नीयते ॥३-२९॥
अर्थ :- विद्याधन हे श्रेष्ठ धन आहे. इतर धनासाठी तेच
कारणीभूत आहे. ते दानाने नित्य वाढते. त्या धनाचा भार होत नाही व ते कोणी घेऊनही
जाऊ शकत नाही.
न हि ज्ञानसमं लोके पवित्रं चान्यसाधनम् ।
विज्ञानं सर्वलोकानामुत्कर्षाय स्मृतं खलु ॥
अर्थ :- या जगामध्ये ज्ञानासारखे दुसरे पवित्र साधन नाही. विज्ञान हेच सर्व लोकांच्या उत्कर्षाचे सधन म्हटले आहे.
अपि स्वर्णमयी लङ्का न मे लक्ष्मण रोचते ।
जननी जन्मभूमिश्च
स्वर्गादपि गरीयसी ॥
अर्थ - हे लक्ष्मणा लंका सोन्याची असली तरी ती मला
आवडत नाही. आई आणि जन्मभूमी स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ आहे.
प्राणान् त्यजन्ति देशार्थं पीडितानां सहायक: ।
य आचरति कल्याणं लोके मानं
स विन्दति ॥
अर्थ - जो देशासाठी स्वत:चे प्राण देतो, पीडित व दु:खी लोकांना सहाय्य
करतो आणि जो हितकारक गोष्टीचे आचरण करतो त्यालाच जगात मान मिळतो.
नानाधर्मनिगूढतत्वनिचिता यत्संस्कृती राजते
सेयं भारतभूर्नितान्तरुचिरा मातैव न: सर्वदा ।
तस्या उन्नतिहेतवे हि भवतां ज्ञानं तथा मे बलं
सम्पन्ना बलशालिनी विजयतां मे मातृभू: सर्वदा ॥
अर्थ - निरनिराळ्या धर्माच्या अत्यंत गूढ तत्वज्ञानाने परिपूर्ण असलेली अशी जिची संस्कृती शोभून दिसते, ती ही अत्यंत तेजस्वी व प्रसन्न असलेली भारतभूमी आमची नित्य माताच आहे. आपले ज्ञान व बल हे दोन्ही तिच्या उन्नतीसाठीच असू दे. सर्व प्रकारे समृद्ध असलेल्या आणि स्वसामर्थ्याने शोभणार्या आणि सर्व काही देणार्या अशा माझ्या मातृभूमीचा नेहेमी विजय होवो.
बलं रक्तं श्रमं स्वेदं देहि राष्ट्राभिवृद्धये
।
एकैकं श्रेयसे भूयात् किमु यत्र चतुष्टयम् ॥
अर्थ - राष्ट्राच्या अभिवृद्धीसाठी बल, रक्त, श्रम व घामही द्यावा. यातील एकेक गोष्ट सुद्धा कल्याणासाठी होते मग चारही गोष्टी दिल्या तर किती कल्याण होईल ?
राष्ट्रध्वजो राष्ट्रभाषा राष्ट्रगीतं तथैव च ।
एतानि मानचिह्नानि धार्यतां
हृदि सर्वदा ॥
अर्थ - राष्ट्रध्वज, राष्ट्रभाषा व राष्ट्रगीत ही मानचिन्हे आहेत. ती (सर्वांनी) हृदयात धारण करावीत.
स्वातन्त्र्यं हि मनुष्याणामधिकार: स्वभावज: ।
तमहं प्राप्नुयान्नित्यं लोकमान्यवचस्त्विदम् ॥
अर्थ - स्वातंत्र्य हा मनुष्याचा स्वाभाविक
(जन्मसिद्ध) अधिकार आहे.
आणि तो मी मिळावणारच हे लोकमान्य टिळकांचे वचन
आहे.
महाराष्त्राभिख्यो मधुरजलसान्द्रो निरुपम:
प्रकाशो देशोऽयं सुरपुरनिकाशो विजयते ।
गृहस्था यत्रामी गुणजलधय:
केऽपि विभवै:
समृद्धा: श्रद्धातो मुहुरतिथिपूजां विदधते॥
अर्थ - ज्याला उपमा नाही असा महाराष्ट्र नावाचा
स्वर्गाप्रमाणे असणारा, गोड
पण्याने युक्त, प्रकाशमान देश शोभून दिसतो. येथील गृहस्थ
गुणरूपी पाण्याचा समुद्र असणारे आहेत. काही ऐश्वर्याने समृद्ध श्रद्धाळू लोक
नेहेमी अतिथीची पूजा करतात.
गायन्ति देवा किल गीतकानि
धन्यास्तु ते भारतभूमिभागे ।
स्वर्गापवर्गास्पदहेतुभते
भवन्ति भूयो मनुजा: सुरत्वात् ॥
अर्थ - जी स्वर्ग व मोक्षाला कारणीभूत होते अशा
भारताच्या भूमीवर देवही गीते गातात ते देवही धन्य आहेत.