स्मृतीस्थळ चिंतन
स्मृती (५९) :- रामदेवां अटनि निर्गमणीं शरीरोष्णतानुवादूं
एक दिवशी रामदेव भटोबासांना म्हणतात. मी अटनक्रामास जाईल. (आकाईसांचे पुत्र रामदेव) मग भटोबासांनी त्यांना क्षेमलिंगन देऊन आज्ञा दिली. कारण त्याकाळी अटनाला गेलेला भिक्षुक दुर्लभ म्हणजे पुन्हा भेट होईल कि नाही सांगता येत नव्हते. क्षेमलिंगन देते वेळी रामदेवाला ताप आहे हे जाणून भटटोबासानीं त्यांना रोखून म्हणतात कि "मुंगीचे मढे ते मुंगीच काढी" तसे तुम्ही भिक्षुक आहात तर तुमची काळजी भिक्षुकच घेतील इतर कोणी घेणार नाही.
यावर रामदेव म्हणतात... देवाने सांगितलेला आचार करू कि ज्वर आला म्हणून तुम्ही म्हणाल ते करू..? (कारण विहित आचार करावयाला निघालेल्या साधकाचा अभिमान परमेश्वराला असतोच असतो म्हणून..) आणि मग ईश्वराने विहित केलेला आचार महत्वाचा आहे म्हणून... देवाने सांगितलेल्या आचारानेच तुमचा उद्धार होईल आणि मी जर तुम्हाला इथेच अडवून ठेवले तर माझा उद्धार कसा होईल.
*म्हणून भटटोबास म्हणतात... जे देवाने सांगितले तेच करा. आणि ज्वर आला असताना व श्रीभटोबासांनी सांगूनही रामदेवांनी ऐकले नाही कारण ते खूप विरागी पुरुष होते. अनुसरणा नंतर सर्व रसयूक्त पदार्था वर्ज केले व त्यांचे आई अकाईसांनी दिलेले भोजन सुद्धा त्यांनी स्वीकारले नाही. इतके कडक आचरण ते करत होते. मग रामदेव अटन करणेस निघून जातात. श्रीस्वामींच्या वचनाला अनुसरून रामदेव अटनास गेले परंतु भटटोबासांना त्यांची काळजी होती.
त्यांनी पंडितबास व केसराजबासांना बोलावून दोघांना रामदेवावर लक्ष ठेवण्यासाठी त्यांच्या मागोमाग पाठविले. आणि मग कधी हे दोघे मागे ते पुढे कधी हे पुढे ते मागे असा अटनक्रम सूरु झाला. पुढे रामदेव अशक्त झाले वाटेत पंडितबास व केसराजबास त्यांना बरे वाटावे म्हणून काही श्लोक काही दोहा म्हणत परंतु रामदेवांना ईश्वर नामाशिवाय कशातच चित्त लागत नव्हते. अशक्त असतानाही तशाच अवस्थेत रामदेव भिक्षेला जायचे मग किशोबास व पंडितबास रामदेवांना शिळे भिक्षान्न मुळे त्रास होईल व त्यांची तब्बेत चांगली रहावी म्हणून ..
त्यांचे पुढे जाऊन ज्या वाटेने ते जाणार तेथील लोकांना "एकला महात्मा येईल त्याला सोपस्कर भिक्षा दयावी" म्हणजे गरम तुपभाताचे पदार्थ देण्यास लोकांना सांगत असत परंतु असे सोपस्कर भिक्षान्न पाहून आपले अटन भंग होऊ नये म्हणून ते त्या गावाचा त्याग करून दुसऱ्या गावी जात तिथेही अशा पध्दतीने केशोबास व पंडीतबास पथ्याचा उपाय म्हणजे त्यांच्या भल्याचा विचार करायचे परंतु ते त्याचा त्याग करून पुन्हा दुसऱ्या गावी जात असत अशा पद्धतीने रामदेवांनी आपले अटन भंग होऊ दिले नाही.
अटनक्रम करत असताना पुढे जाऊन एका गावी दुसरे साधक अमृते माइंबा व रामदेवांची एका झाडाखाली भेट झाली. दोन्ही साधकांची गळाभेट झाल्यावर धर्मवार्ता व देवाच्या लीळा चिंतन सुरु झाले. मग माइंबा अमृतबासांनी त्यांना माहित असलेल्या श्रीस्वामींच्या अमृतमय अशा लीळा रामदेवांना सांगितल्या व ते लीळा ऐकून रामदेवांचे अंतःकरण आंतरबाह्य शांत झाले. अटन विजनातून झालेला शारीरिक ताप निवाला आणि त्यांचे डोळ्यातून आश्रू आले.
आणि ते समाधनपूर्वक माइंबा अमृतबासांना म्हणतात. तुम्ही भले केले मला देवाच्या अमृतमय लीळा सांगितल्या. मी ज्या ठिकाणी जायचो ज्या जागेवर बसायचो तिथे मला शांतता मिळत नव्हती. कुठे ठक ठक तर कुठे कुरकुर असा आवाज यायचा त्यामुळे माझ्या ईश्वराचे स्मरणात व्यत्यय येत होतो. स्मरण करताना लीळा आठवताना तो आवाज कानी पडत होता. परंतु तुम्ही ईश्वराच्या लीळा सांगून निवविलें.
आणि त्याच ठिकाणी एक दोन दिवसांनी पंडीतबास, केशोबास आणि अमृते मायंबास हे तिघेही रामदेवाचा सोबत एका झाडाखाली असताना रामदेव आता पूर्ण थकले आणि देह जाईल अशी त्यांची अवस्था झाली. आणि मग शेवटच्या क्षणाला केशोबासांनी त्यांना महावाक्याचे निरोपण केले आणि ईश्वराचे स्मरण करत करत त्यांनी आपले देह टाकले. (महानुभाव साधक संपूर्ण ब्रह्मविध्येचा अभ्यास करत असताना पूर्वी महावाक्य प्रकरण कुणीही गुरू सहजासहजी सांगत नव्हते कारण ते अधिकरणाचे प्रसन्नता व साधकाची आर्तता पाहून साधकाचे अगदी शेवटचे वेळी सांगितले जायचे.
सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींनी डोमेग्रामी असताना म्हाईंभट्टांना महावाक्य प्रकरण निरूपण केले. आणि भट्टोबासांनी सुद्धा म्हाईंभट्टांना शेवटच्या क्षणी पुन्हा महावाक्य प्रकरण निरूपण केले. आणि केशोबासांनी सुद्धा रामदेवांना शेवटच्या क्षणी महावाक्याचे निरोपण केले.) रामदेवांचे देहावसान झाले. मग या तिघांनी त्याच गावी नदीच्या कडेला त्यांचा निक्षेप केला. भूमिडाग दिला. आणि मग उदास अंतःकरणाने तिघेही गोवोनिगावे भट्टोबासांकडे आले.
त्यांना जड पावलांनी येताना पाहून भट्टोबासांनी जाणले कि काहीतरी घटना घडली रामदेव सरले याची जाणीव भट्टोबासांना झाली परंतु समोरून पंडीतबास, केशोबास आणि अमृते मायंबा तिघेही जड पावलाने येतात कि ज्या साधकाचा आम्ही निक्षेप केला त्यांची तपश्चचर्या पहिली आपल्या आईच्या घरी सुद्धा त्यांनी कधी भोजन केले नाही. आणि आजारी असताना सुद्धा अटनाचा असा ध्यास घेतला. कि ज्या अटनामुळे मला ईश्वर भेटणार आहे मी ईश्वराचे ऐकू कि तुमचे ऐकू असे म्हणून ज्यांनी भट्टोबासांना निवृत्त केले.. जे रामदेवला घडले आपलेला घडले पाहिजे.
मग भट्टोबासांन त्यांना पाहुन काहीतरी "कहाळे कांड" घडले म्हणजे रामदेवाचे शरीर पडले हे जाणतात. मग तिघांनी रामदेव सरले व रामदेवाचे अवघेच बोल सांगून क्षेमवार्ता सांगितली. त्यावर भट्टोबासां म्हणतात.. "जैसे आपणाते धिक्कारेती तैसे पुढीलाते धिक्कारिजे हे सौजन्याने कार्य कीं गां" म्हणजे जसे साधक आपल्या मनाला अंतःकरणाला धिक्कारून आचरणाचा ध्यास घेतो तसे पुढीलाचे मनाचा विचार न करता आचरणाचा ध्यास घेतला पाहिजे. आपल्या आचरणाचा जास्त महत्व दिले पाहिजे हेच सौजन्यचे कार्य आहे.
साधनदाता मुख्य करून पाची अवतारास चहुज्ञानिए आठाही भक्ताशी, सर्व संत, महंत, मार्ग मंडळीं तसे गृपवर अधिष्ठित माझ्या सर्व अच्युत गोत्रीय सुह्रदांना तसेच उपकार निमित्याशी व अशेषा गुरु कुळाशी माझे दंडवत प्रणाम।