कधीनाकधी भोगावीच लागतात पापकर्मांची फळे

कधीनाकधी भोगावीच लागतात पापकर्मांची फळे

कधीनाकधी भोगावीच लागतात पापकर्मांची फळे 


आपल्या जीवनात येणारी सुख दुःखे हे आपल्याला कोणी देत नाही नाही तर ती मागील जन्मात आपणच जोडलेली असतात त्याचे फळ आपण भोगत असतो. आपण जोडलेल्या भाग्यात कमी जास्त होत नाही ते जसेच्या तसेच मिळते.

माणसाने या दोन शंका कधीच करू नये. १) माझे पाप कमी होते आणि त्याची शिक्षा मला जास्त मिळाली किंवा २) मी तर कधीच पाप केले नाही मग मला अशी शिक्षा का मिळतेय? अशा शंका करण्यात काही अर्थ नाही कारण गीतेमध्ये सर्वज्ञ सर्वशक्तिमान परमेश्वराचे विधान आहे की पापापेक्षा जास्त शिक्षा कुणालाच मिळत नाही देवाच्या न्यायव्यवस्थेत ज्याने जितके सत्कर्म किंवा दुष्कर्म केलेले आहेत, त्याला तेवढेच मिळते. त्यापेक्षा अधिक मिळत नाही आणि कमीही मिळत नाही.

कोण्या एका गावात एक सज्जन मनुष्य राहत होता त्याच्या घरासमोर एका सोनाराचे दुकान होते. सोनारा जवळ सोने येत राहायचे लोकं त्याच्या जवळ येऊन दाग दागिने बनवून जात होते त्यातून थोडे थोडे सोने काढत असायचा. आणि दागिने बनविण्याची मजुरीही घ्यायचा.

अशा व्यवसायाच्या भरभराटी मुळे त्याच्याजवळ खूप सारे सोने जमा झाले. या सोनाराजवळ खूप सोने आहे ही गोष्ट गस्त घालणाऱ्या एका सैनिकाला समजली. त्याने रात्री त्या सोनाराची हत्या केली आणि पेटीत असलेले सगळे सोने घेऊन पसार झाला. त्याच वेळेला समोरच्या घरातले सज्जन लघुशंकेसाठी बाहेर आलेले होते. ते त्या पहारेकऱ्याल्या म्हणाले, “ तू या पेटीत काय घेऊन जात आहेस? आणि ही तर सोनाराच्या घरातली पेटी दिसते आहे तू कशी काय नेत आहेस?”

यावर तो पहारेकरी म्हणाला, “तू शांत राहा बोंबलू नकोस, यातले काही सोने तू घेऊन घे पण गप्प राहा तोंड उघडू नकोस.”

तो सज्जन म्हणाला, “हे मी कसे काय घेऊ? मी काय चोर आहे का? मी हे घेऊ नाही शकत आणि तुही घेऊ नको परत ठेवून दे”

यावर तो पहारेदार म्हणाला, “हे पहा चांगला विचार कर नाहीतर तुला हे खूप महागात पडेल” पण सज्जन काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. 

शेवटी त्या दुष्ट पहारेकऱ्याने सोन्याची पेटी खाली ठेवली आणि जोरात शिट्टी वाजून त्या सज्जनाला दोन्ही हातांनी पकडले. शिट्टी वाजवतातच दुसरीकडे पहारा देणारे सैनिक धावतच आले. त्या सर्वांना ज्या पहारेकऱ्याने सांगितले, “मी याला पकडले आहे, हा मनुष्य या घरातून ही पेटी घेऊन जात होता.”

सैनिकांनी घरात घुसून पाहिले तर सोनाराची हत्या झालेली होती. मग त्या सैनिकांनी त्या सज्जनाला पकडले आणि राजकीय सैनिकांच्या हवाली केले. सोनाराच्या हत्येचा आरोप त्याच्यावर आला. त्याने सत्य सांगण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याचे कुणीही ऐकले नाही, शेवटी त्या सज्जनाला कारागृहात टाकण्यात आले.  

दुसऱ्या दिवशी त्याला न्याय पालिकेसमोर हजर करण्यात आले. न्यायाधीशांसमोर चर्चा झाली. शिपायाने सज्जनाच्या विरोधात साक्ष दिली. 

सज्जन ओरडून म्हणाला, “मी त्या सोनाराला मारले नाही, या शिपायानेच मारले आहे आणि हाच ती सोन्याची पेटी घेऊन पळत जात होता, मी याला अडवले तर याने माझ्यावरच आरोप येतील असे नाटक केले. 

इतर सैनिकांनी ही सज्जनाच्या विरोधात साक्ष दिली, “यानेच या सोनाराला मारलेले आहे, आम्ही सोनाराच्या घराच्या बाहेर पकडले होते.” 

शेवटी त्या सज्जनाला फाशीची शिक्षा झाली कारण सर्व पुरावे त्याच्या विरोधात होते. यावर सज्जन म्हणाला, “हा माझ्यावर अन्याय होत आहे, मी निर्दोष आहे, देवाच्या दरबारात काहीच न्याय नाही, मी त्या सोनाराला मारले नाही तरी मला फाशीची शिक्षा होत आहे आणि या शिपायाने त्याला मारले तर याच्यावर साधा आरोपही कोणी घेत नाहीये, याला दंड ठोठावत नाहीये हा सरासर अन्याय आहे”

त्या न्यायाधीशाला सज्जनाचे बोलणे थोडेसे खरे वाटू लागले की, 'हा खरे बोलत आहे या घटणेविषयी पूर्ण शहानिशा झाली पाहिजे. न्यायाधीशाने लगेच त्याची फाशीची शिक्षा स्थगित केली व या  संपूर्ण प्रकरणाचा तपास केल्यावरच कारवाई होईल अशी घोषणा केली. 

'काहीतरी करावे' असा विचार करत न्यायाधीशाने एक युक्ती केली. दुसऱ्या दिवशी सकाळ झाल्यावर एक व्यक्ती रडत बोंबलत न्यायालयात आला आणि जोरजोराने सांगू लागला की, “सरकार माझ्या भावाची हत्या झाली आहे, या गोष्टीचा तपास झाला पाहिजे आरोपीला शिक्षा मिळाली पाहिजे.” 

तेव्हा न्यायाधीशाने त्या शिपायाला आणि सज्जनाला त्या मेलेल्या व्यक्तीचे शव आणण्यासाठी पाठवले.  ते दोघेही तिथे गेले जिथे तो माणूस मेलेला होता खाटेवर पडलेल्या माणसाच्या मुखावरील कपडा रक्ताने माखलेला होता. 

दोघांनीही ती खाट उचलली आणि निघाले रस्त्यात चालताना तो शिपाई त्या सज्जनाला म्हणतो, “पहा बरं, भल्या माणसा! माझे ऐकले असते तर आता तुला भरपूर सोनेही मिळाले असते आणि फाशीही झाली नसती, पाहिलं तुला खरं बोलण्याचं फळ तुला मृत्यू पत्करून भोगावे लागते आहे.” 

यावर तो सज्जन कैदी म्हणाला, “मी आपलं काम केले, मी खोटं बोलत नाही, मला फाशी झाली झाली तरी चालेल, पण एक गोष्ट मात्र मला खुप खटकते आहे की, त्या माणसाचा खून तू केला आणि शिक्षा मात्र मला भोगावी लागते आहे, देवाच्या दरबारात अन्याय आहे”

खाटेवर पडलेला मृत्यूचे सोंग घेतलेला व्यक्ती हे सर्व ऐकत होता. न्याय पालिकेत आल्यावर त्या दोघांनी खाट खाली ठेवली आणि खाटेवरचा व्यक्ती रक्तरंजित कपडे बाजूला करून उभा राहिला आणि न्यायाधीशाला त्या दोघांचे बोलणे सांगितले. 

शिपाई तर डोळे मोठे करून आ वासून पाहत होता. त्याला थरकाप सुटला होता. शिपायाला लगेच कैद केले गेले. पण त्या सज्जनाला न्यायाधीशाने एकांतात बोलावले व विचारले, तु निर्दोष आहेस असे मला आधीपासून वाटत होते म्हणूनच मी ही युक्ती केली पण खरं खरं सांग की तू या जन्मात कधी कुणाची हत्या केलेली आहे काय? 

सज्जन म्हणाला, “हो खूप वर्षांपूर्वीची घटना आहे, एकदा क्रोधात येऊन मी एका माणसाची हत्या करून त्याला नदीत फेकून दिले होते, पण पकडलो गेलो नाही, ही गोष्ट फक्त मलाच माहिती आहे.” 

हे ऐकून न्यायाधीश म्हणाला, “त्या अपराधाची शिक्षा तुला आता मिळेल, मीही विचार करत होतो की, मी कधी लाच खाल्ली नाही, निष्कारण कुण्या निरपराध्याला कधीही शिक्षा केली नाही, तरी मला तुला फाशी का द्यावीशी वाटली? माझ्याकडून तुझ्या फाशीचे ऐलान झालेच कसे? याचे मलाच आश्चर्य वाटत होते. पण आता मी समाधानी आहे, त्या पापाचे फळ तुला आता मिळेल आणि त्या शिपायालाही वेगळी फाशी दिली जाईल.” 

या कथेचे तात्पर्य असेच आहे की देवाच्या दरबारात कधीही अन्याय होत नाही आपल्याला मिळणारे दुःख हे आपल्या पापांचे फळ आहे आता जरी आपण पाप करीत नसलो तरी मागील अनंता जन्मी नाना प्रकारची असंख्य पापे करीत आलो त्याचे फळ आता आपल्याला मिळत आहे. पापाचे फळ भोगावेच लागते ते कोणालाच सुटत नाही.

बरेच लोक असे म्हणताना दिसतात की, आम्ही तर काहीच पाप केले नाही मग आम्हाला नियती एवढी कठोर शिक्षा का बरं देत आहे? मित्रांनो आपण आता काही केले नाही पण मागा अनंत जन्मी आपण असंख्य पापी केलेली आहेत, जीव हा विसराळू आहे मागील जन्मात किंवा याच जन्मात केलेले पाप तो सहज विसरून जातो. पण कर्माचा लेखाजोखा ठेवणारी सृष्टीव्यवस्था तिलाच आपण नियती म्हणतो ती काहीच विसरत नाही. 

पाप कर्मांच्या फळात सूतभरही कमी होत नाही ते जसेच्या तसे भोगावेच लागते. म्हणून कोणतेही पाप कर्म करीत असताना हजार वेळा विचार करायला पाहिजे.

हेही वाचा 👇

इतरांच्या मृत्यूचा आनंद साजरा करण मनुष्य

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/01/blog-post_78.html

कर्मांचे चित्र-विचित्र भोग

https://knowledgepanditji.blogspot.com/2022/01/blog-post_10.html

सावधान भगवंत क्षमा करतील, पण कर्म नाही👇

https://knowledgepanditji.blogspot.com/2021/12/blog-post_34.html

Thank you

Post a Comment (0)
Previous Post Next Post