श्रीकृष्ण चरित्र - शकटासुर वध
श्रीकृष्ण देवाने पूतनेचा वध केल्यानंतर कंसाला खात्री झाली की आपला शत्रू नंदाच्या घरी जन्माला आला आहे. पण नंदराजाशी उघड उघड वैर करणे राजकीय दृष्ट्या हिताचे नव्हते. नंदराज एक प्रतिष्ठित गवळी होते. सैन्य पाठवून त्याला काहीही करता येत नव्हते. म्हणून त्याने गुप्तरित्या त्याचे राक्षस मित्र, बंधु गोकुळात पाठवायला सुरूवात केली.
श्रीकृष्णचंद्र भगवंत ज्या दिवशी पहिल्यांदाच आपल्या आपण कुशीवर वळलेे, त्या दिवशी माता यशोदेने मोठा उत्सव साजरा केला, त्याच दिवशी श्रीकृष्णदेवाच्या जन्माचे नक्षत्र पण होते. त्या आनंदोत्सवात गोकुळातील गोप तसेच गोपिकांची खूप गर्दी झाली होती. यशोदा मातेने श्रीकृष्णादेवाला दूध पाजून एका छकड्याखाली पाळणा ठेवून झोपवले; कारण श्रीकृष्णाने तेथे एकांतात सुखेच झोपी जावे. आणि बाळाला हवा लागत राहावी आणि छकड्याच्या सावलीत बाळाला ऊन लागणार नाही.
आणि काही मुलांना तेथे श्रीकृष्णदेवाच्या पाळण्याजवळ यशोदा मातेने त्यांच्यावर लक्ष ठेवायला सांगितले. आणि स्वतः गोप-गोपिकांच्या स्वागत-सत्कारासाठी गेली. कुणी म्हणते यमुनेत स्नान करण्यासाठी गेली. कंसाचा एक राक्षस सेवक होता. त्याचे नाव शकटासुर असे होते. त्याच्या ठिकाणी अदृश्य होण्याची मायावी शक्ती होती. तो आपल्या मायेने कुणालाच दिसत नसे. तो छकड्यात घूसून शत्रुचा वध करण्यात निपून होता.
कंसाच्या आज्ञेने गोकुळात आला आणि ज्या बैलगाडीखाली श्रीकृष्ण भगवंत शांत पहुडले होते. देवाला पहुडलेले पाहून तो खुप खुश झाला. आणि त्या बैलगाडीत घुसून बसला. त्याची इच्छा होती की बैलगाडीला जोरात दाबून पाडूया ज्यामुळे खाली झोपलेले बाळ श्रीकृष्ण दाबला जाईल. भगवान श्रीकृष्णाने राक्षसाच्या मनातील गोष्ट ओळखली. नंतर देवाने जणू काही भुकेने रडत आहे, अशी लीळा केली. देवाने रडणे स्वीकारले आणि श्रीचरण झाडू लागले.
आणि त्या भगवंताने आपल्या लहान आणि सुकुमार श्रीचरणाने त्या छकड्याला स्पर्श केला. आणि तो मोठा जड छकडा उलटून त्याच्या ठिकऱ्या उडाल्या. आणि छकड्यात लपून घुसलेला शकटासुर तेथेच मरण पावला. भगवंतांनी त्याला लीळादानाच्या फळाला पाठवले.
बैलगाडीवर दूध, दही, तूप इत्यादींची बरीचशी भांडी ठेवली होती. ती सर्व भांडी घरंगळत खाली पडली आणि फुटली. दूध, दही, चारी दिशांना वाहू लागले. बैलगाडीच्या पडण्याच्या मोठा आवाज ऐकून सर्व गोप-गोपिका तेथे धावत आल्या.
शेजारी खेळत असलेल्या इतर लहान मुलांनी धावत आलेल्या गोपींना सांगितले की कृष्णाने भरलेली गाडी श्रीचरणाने लत्ताप्रहार करून पलटी केली, पण त्या गोपिकांना त्या मुलांच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही. माता यशोदाही धावतच आली. तो मोडलेला छकडा पाहून घाबरली यशोदेने बाळकृष्णाला पटकन कडेवर उचलले. आणि पटापट रडत मुके घेतले. तर हा शकटासुर मागील जन्मी कोण होता?
पौराणिक कथा :- भगवान श्रीकृष्णाने शकटासुरचा वध केला. हा शकटासुर मागील जन्मात हिरण्यक्षाचा पुत्र होता. तेव्हा त्याचे नाव उत्कच होते. तो एकदा फिरता फिरता लोमासा मुनींच्या आश्रमात गेला आणि तेथील उपवनातील काही झाडांची तोडमोड केली आणि ऋषिंनी क्रुध्द होऊन त्याला अशरीर होण्याचा शाप दिला.
(त्याचे शरीर अतिप्रचंड होते). त्यानंतर त्या उपरती झाली तो ऋषिमुनींच्या पाया पडून उःशाप द्यावा याचना करू लागला. मुनींना त्याची किव आली. मुनींनी त्याला सांगितले की पुढील मन्वंतरामध्ये त्याला भगवंताच्या चरणस्पर्शाने मुक्ती मिळेल. अशा प्रकारे तो शापापासून मुक्त झाला.
पुढील भाग तृणावर्त राक्षसाचा वध लीळा वाचण्यासाठी खालिल लिंकवर क्लिक करा 👇
https://knowledgepanditji.blogspot.com/2023/01/05-shreekrishna-lila-marathi.html
पुतना वध लीळा
https://knowledgepanditji.blogspot.com/2023/01/03.html
महाबळ ब्राम्हणाची फजिती ही लीळा वाचण्यासाठी खालिल लिंकवर क्लिक करा 👇
https://knowledgepanditji.blogspot.com/2023/01/06-shreekrishna-charitra-marathi.html
ब्राह्मणांना विक्राळ रूप दाखवणे 👇
https://knowledgepanditji.blogspot.com/2023/01/09-shreekrishna-charitra-09-marathi.html